वाराणसी इथल्या विविध विकास कामांच्या उद्‌घाटन आणि पायाभरणी समारंभात पंतप्रधानांचे संबोधन

July 14th, 06:28 pm

उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, इथले ओजस्वी, तेजस्वी, परिश्रमी आणि यशस्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री मंडळातले माझे सहकारी मनोज सिन्हा, संसदेतले माझे सहकारी आणि माझे जुने मित्र आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष महेंद्रनाथ पांडेय, जपानच्या दूतावासाचे हिरेका असारी आणि बनारस मधल्या माझ्या बंधु -भगिनींनो,

वाराणसीमधील विविध विकास प्रकल्पांचा कोनशिला समारंभ पंतप्रधानांच्या हस्ते संपन्न

July 14th, 06:07 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीतील एकूण ९०० कोटी रुपये लागत मूल्य असलेल्या विविध प्रकल्पचे उदघाटन करून कोनशिला ठेवली. यामध्ये वाराणसी सिटी गॅस वितरण प्रकल्प, वाराणसी-बलिया एमईएमयू रेल्वे अशा दोन प्रकल्पांचा समावेश असून या प्रकल्पांचे उदघाटन ही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. तर पंचक्रोशी परिक्रमा मार्ग, स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत विविध प्रकल्प आणि नमामीगंगे या अंतर्गत अनेक प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधानांनी केली. पंतप्रधानांनी वाराणसीमधील आंतरराष्ट्रीय परिषद केंद्राची कोनशीलाही ठेवली.