इकॉनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरम या जागतिक नेतृत्व मंचावर पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद

August 31st, 10:39 pm

ईटी वर्ल्ड लीडर्स फोरमच्या या कार्यक्रमात येणं म्हणजे…कितीतरी जुने चेहरे दिसताहेत…तर ही एक आनंदाची बाब आहे. मला विश्वास आहे की इथे भारताच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने खूप चांगली चर्चा झाली असेल. आणि ही चर्चा अशावेळी झालीय जेव्हा संपूर्ण जगात भारताविषयी एक विश्वास निर्माण झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे इकॉनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरमला केले संबोधित

August 31st, 10:13 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे इकॉनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरमला संबोधित केले.

महाराष्ट्रात पालघर येथील वाढवण बंदराच्या पायाभरणी समारंभातील पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर

August 30th, 01:41 pm

महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन जी, आमचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री राजीव रंजन सिंह जी, सर्बानंद सोनोवाल जी, महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, अजीत दादा पवार जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे इतर सहकारी, महाराष्ट्र सरकार मधील मंत्री, इतर मान्यवर आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील पालघर येथे सुमारे 76,000 कोटी रुपयांच्या वाढवण बंदराची केली पायाभरणी

August 30th, 01:40 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील पालघरमध्ये विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. आजच्या प्रकल्पांमध्ये सुमारे 76,000 कोटी रुपये खर्चाच्या वाढवण बंदराची पायाभरणी आणि सुमारे 1,560 कोटी रुपयांच्या 218 मत्स्यव्यवसाय प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी यांचा समावेश आहे. मोदी यांनी सुमारे 360 कोटी रुपये खर्चाच्या वेसल कम्युनिकेशन आणि सपोर्ट सिस्टीमचे राष्ट्रार्पण केले. पंतप्रधानांनी मासेमारी बंदरांचा विकास, सुधारणा आणि आधुनिकीकरण, फिश लँडिंग सेंटर आणि फिश मार्केटच्या बांधकामासह महत्त्वाच्या मत्स्यपालन पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचीही पायाभरणी केली. त्यांनी मच्छिमार लाभार्थ्यांना ट्रान्सपॉन्डर सेट आणि किसान क्रेडिट कार्डचे वितरण केले.

पंतप्रधान 30 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर

August 29th, 04:47 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्रातील मुंबई आणि पालघरला भेट देणार आहेत. सकाळी सुमारे 11 वाजता पंतप्रधान मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024 ला संबोधित करतील. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास पंतप्रधान पालघर मधील सिडको मैदानावर विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.

'महाराष्ट्रातील वाढवण येथे बारमाही ग्रीनफिल्ड डीपड्राफ्ट प्रमुख बंदराच्या विकासाला' केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

June 19th, 09:07 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील डहाणूजवळील वाढवण येथे मोठे बंदर उभारण्यास मंजुरी दिली. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए) आणि महाराष्ट्र सागरी मंडळ (एमएमबी) यांनी अनुक्रमे 74% आणि 26% समभागांद्वारे स्थापन केलेली विशेष उद्देश वाहन एसपीव्ही, वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड (व्हीपीपीएल) द्वारे हा प्रकल्प पूर्ण केला जाईल. वाढवण बंदर हे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वाढवण येथील बारमाही ग्रीनफिल्ड डीप ड्राफ्ट प्रमुख बंदर म्हणून विकसित केले जाईल.

PM expresses sadness on demise of MP from Palghar, Shri Chintaman Wanaga

January 30th, 03:57 pm

PM expressed sadness on demise of MP from Palghar, Shri Chintaman Wanaga. He said, Pained by the unfortunate demise of my colleague and MP from Palghar, Shri Chintaman Wanaga. He played an important role in building the BJP in the Thane region and did commendable work for the welfare of tribals. My thoughts are with his family and supporters in this sad hour.