अंमली पदार्थांच्या सेवनाविरुद्धच्या मोहिमेतील तरुणांचा वाढता सहभाग अतिशय उत्साहवर्धक: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
July 30th, 11:30 am
माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’मध्ये तुम्हां सर्वांचे खूप खूप स्वागत.जुलै महिना म्हणचे मान्सूनचा महिना, पावसाचा महिना. नैसर्गिक आपत्तींमुळे गेले काही दिवस चिंता आणि त्रासाने भरलेले होते.यमुनेसहअनेक नद्यांना आलेल्या पुरामुळे बऱ्याच भागांमधल्या लोकांना त्रास झाला. डोंगराळ भागात भूस्खलन होण्याच्या घटना देखील घडल्या. याच दरम्यान, काही काळापूर्वी देशाच्या पश्चिम भागात, पूर्व गुजरातच्या काही क्षेत्रामध्ये बिपरजॉय चक्रीवादळ देखील आले. पण मित्रांनो, या संकटांच्या काळात पुन्हा एकदा आपण सर्व देशवासीयांनी दाखवून दिले की, सामुहिक प्रयत्नांमध्ये किती शक्ती असते. स्थानिक लोकांनी, आपल्या एनडीआरएफच्या जवानांनी, स्थानिक प्रशासनात कार्यरत लोकांनी रात्रंदिवस झगडून अशा संकटांचा सामना केला आहे. कोणत्याही संकटातून बाहेत पडण्यासाठी आपले सामर्थ्य आणि साधनसंपत्ती यांची भूमिका फार मोठी असते – मात्र त्याबरोबरच आपली संवेदनशीलता आणि एकमेकांचा हात धरुन ठेवण्याची भावना देखील तितकीच महत्त्वाची असते. ‘सर्वजन हिताय’ ची हीच भावना भारताची ओळख देखील आहे आणि भारताची शक्ती देखील आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मा. स्कॉट मॉरिसन यांच्या दरम्यान दुसऱ्या भारत ऑस्ट्रेलिया आभासी शिखर परिषदेचे आयोजन
March 21st, 06:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मा. स्कॉट मॉरिसन यांनी आज दुसऱ्या भारत ऑस्ट्रेलिया आभासी शिखर परिषदेचे आयोजन केले होते ज्यात त्यांनी दोन्ही देशांमधील बहुआयामी संबंधांचा आढावा घेतला आणि प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर विचारांची देवाणघेवाण केली.युवा चित्रकाराच्या पेंटिंग्सचे आणि सार्वजनिक आरोग्याविषयी त्याने व्यक्त केलेल्या चिंतेबद्दल पंतप्रधानांनी केले कौतूक
August 26th, 06:02 pm
बंगळुरूचा विद्यार्थी असलेल्या स्टीव्हन हॅरिसच्या पत्राला उत्तर देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे आणि त्याच्या पेंटिंगचे कौतूक केले आहे. या 20 वर्षांच्या युवकाने पंतप्रधान मोदी यांची स्वतः काढलेली दोन चित्रे आणि एक पत्र त्यांना पाठवले होते. त्यावर, मोदी यांनी त्याला प्रोत्साहन देणारे आणि कौतूक करणारे उत्तर दिले आहे.