18 व्या लोकसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर लोकसभेत पंतप्रधानांनी केलेले भाषण
June 26th, 11:30 am
या सदनाचे हे सौभाग्य आहे की आपण दुसऱ्यांदा या आसनावर विराजमान होत आहात. आपले आणि या संपूर्ण सदनाचे मी खूप खूप अभिनंदन करतो.लोकसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर पंतप्रधानांनी लोकसभेत केले संबोधन
June 26th, 11:26 am
लोकसभेच्या अध्यक्षपदी श्री ओम बिर्ला यांची सदनाने निवड केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेला संबोधित केले.नवी दिल्लीत आयोजित नवव्या जी-20 संसदीय अध्यक्ष शिखर परिषदेच्या उद्घाटन वेळी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद
October 13th, 11:22 am
भारतात सध्याचा हा काळ उत्सवांचा हंगाम असतो. या दिवसांमध्ये संपूर्ण भारतात खूप मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरे केले जातात. मात्र जी-20 ने यावेळेस हे उत्सवी वातावरण आणि त्याचा उत्साह संपूर्ण वर्षभर निर्माण केला. आम्ही पूर्ण वर्षभर जी-20 च्या प्रतिनिधींचे भारताच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये आतिथ्य केले आहे. यामुळे या शहरांमध्ये कायम उत्सवी वातावरण टिकून राहिले. त्यानंतर भारताने चंद्रावर स्वारी केली. यामुळे संपूर्ण देशात आनंदाचे आणखी उधाण आले. त्यानंतर, आम्ही इथे दिल्लीतच जी-20 शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन केले. आणि आता ही पी-20 शिखर परिषद इथे होत आहे. कोणत्याही देशाची सर्वात मोठी ताकद ही तेथील नागरिक, या नागरिकांची इच्छाशक्ती असते. आज ही परिषद, लोकांसाठी, ही ताकद देखील साजरी करण्याचे एक माध्यम बनले आहे.पंतप्रधानांनी केले 9व्या जी20 संसदीय अध्यक्षांच्या शिखर परिषदेचे (पी20) उद्घाटन
October 13th, 11:06 am
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी जी20 संसदीय अध्यक्षांच्या शिखर परिषदेतील मान्यवरांचे 140 कोटी जनतेच्या वतीने स्वागत केले. “ही शिखर परिषद जगभरातील सर्व संसदीय पद्धतींचा महाकुंभ आहे, असे पंतप्रधान म्हणाले. विविध देशातील संसदीय चौकटींचा अनुभव असलेले सर्व प्रतिनिधी येथे उपस्थित असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आजच्या कार्यक्रमाबद्दल मोदी यांनी अतिशय समाधान व्यक्त केले.