पंतप्रधान 7 ऑक्टोबर रोजी पीएम केअर्स अंतर्गत स्थापन पीएसए ऑक्सिजन संयंत्रे राष्ट्राला समर्पित करणार

October 06th, 02:54 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता उत्तराखंड मधील एम्स ऋषिकेश येथे आयोजित कार्यक्रमात 35 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पीएम केअर्स अंतर्गत स्थापन 35 प्रेशर स्विंग ऍडसॉरप्शन (पीएसए) ऑक्सिजन संयंत्रे राष्ट्राला समर्पित करणार आहेत. यामुळे आता देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये पीएसए ऑक्सिजन संयंत्रे असतील. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.

कोविड परिस्थितीसंबंधी पूर्वोत्तर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधानांनी साधलेला संवाद

July 13th, 03:53 pm

श्री मनसुखभाई मांडवीय हे आता आपले नवीन आरोग्य मंत्री आहेत. त्यांच्याबरोबर राज्यमंत्री म्हणून जबाबदारी असलेल्या डॉक्टर भारती पवार या बसलेल्या आहेत. त्या आपल्या आरोग्य मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून काम करत आहेत. आणखी दोन व्यक्तींबरोबर तुमचा सतत संबंध येणार आहे. ते आहेत DONER मंत्रालयाचे नवीन मंत्री किशन रेड्डी जी, आणि त्यांच्याबरोबर बसले आहेत ते राज्यमंत्री बी. एल. वर्मा जी. यांचा परिचय करून घेणेसुद्धा आपल्याला आवश्यक आहे.

कोविड -19 परिस्थितीबाबत ईशान्येकडील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद

July 13th, 01:02 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोविड -19 परिस्थितीबाबत ईशान्येकडील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या संभाषणामध्ये नागालँड, त्रिपुरा, सिक्कीम, मेघालय, मिझोरम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला. कोविड महामारीची परिस्थिती हाताळताना वेळेवर केलेल्या कार्यवाहीबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. मुख्यमंत्र्यांनी ईशान्येकडील राज्यांबद्दलच्या पंतप्रधानांच्या विशेष आस्थेबद्दल आणि काळजीबद्दल त्यांचे कौतुक केले. या संभाषणादरम्यान मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त केंद्रीय गृह, संरक्षण, आरोग्य, ईशान्य प्रांत विकास व अन्य मंत्री उपस्थित होते.

‘कस्टमाईज क्रॅश कोर्स प्रोग्रॅम फॉर कोविड 19 फ्रंटलाईन वर्कर्स’ कार्यक्रमाचा प्रारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

June 18th, 09:45 am

कोरोनाच्या विरोधामध्ये सुरू केलेल्या महायुद्धामध्ये आज एका महत्वपूपर्ण मोहिमेचा पुढचा टप्पा प्रारंभ होत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्यावेळी देशामध्ये हजारो व्यावसायिक, कौशल्य विकास मोहिमेशी जोडले गेले. अशा प्रकारे केलेल्या प्रयत्नांमुळे देशाला कोरोनाच्या विरोधात लढा देण्यासाठी खूप मोठी शक्ती मिळाली. आता कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये कोरोना विषाणूचे वारंवार बदलणारे स्वरूप आपल्यासमोर नवनवीन आव्हाने कशा पद्धतीने निर्माण करीत आहे, हे तुम्ही लोकांनी पाहिले आहे.

कोविड-19 फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांसाठी विशेष अभ्यासक्रम कार्यक्रमाचा पंतप्रधानांनी केला आरंभ

June 18th, 09:43 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोविड-19 फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांसाठी विशेष अभ्यासक्रम कार्यक्रमाचा आज दुरदृष्य प्रणालीद्वारे आरंभ केला. 26 राज्यात 111प्रशिक्षण केंद्रांवर हा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येईल. या उपक्रमांतर्गत एक लाख फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे. केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री डॉ महेंद्रनाथ पांडे यांच्या सह इतर केंद्रीय मंत्री, राज्यांचे मंत्री, तज्ञ आणि इतर संबंधित यावेळी उपस्थित होते.

राज्ये आणि जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी कोविड-19 व्यवस्थापनाबाबतच्या चर्चेदरम्यान पंतप्रधानांनी साधलेला संवाद

May 18th, 11:40 am

आपण सगळ्यांनी कोविडच्या दुसऱ्या लाटेचा सामना करतांना अत्यंत कठोर परिश्रम केले आहेत आणि सातत्याने करत आहात. आपल्यापैकी अनेक लोक असे आहेत, जे स्वतः कोरोना पॉझिटिव्ह असूनही आपल्या जिल्ह्याची परिस्थिती सांभाळण्यासाठी सातत्याने काम करत आहेत. यामुळे जिल्ह्यातील इतर लोकांची उमेद वाढली आणि त्यांना आपल्यापासून प्रेरणा मिळाली.

कोविड स्थितीविषयी चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी देशभरातील डॉक्टरांशी साधला संवाद

May 18th, 11:39 am

कोविड स्थितीविषयी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील डॉक्टरांच्या गटाशी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला.

कोविड आणि लसीकरण संबंधित परिस्थितीबाबत पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक

May 15th, 02:42 pm

देशातील कोविड आणि लसीकरण संबंधित परिस्थितीबद्दल चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. देशातील कोविडशी संबंधित सद्यस्थितीबाबत अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली.