नवी दिल्ली इथे झालेल्या बी 20 शिखर परिषद भारत 2023 मधील पंतप्रधानांचे भाषण
August 27th, 03:56 pm
आपण सर्व जण उद्योग जगतातील अग्रणी नेते अशा वेळी भारतात आला आहात , जेव्हा संपूर्ण देशभरात एखाद्या महोत्सवाप्रमाणे वातावरण आहे. भारतात दर वर्षी येणारा महोत्सवाचा कालावधी काहीसा आधीच सुरु झाला आहे. हा सणासुदीचा काळ असा असतो, जो आमचा समाज देखील साजरा करतो आणि आमचे उद्योग देखील.. आणि या वर्षी हा 23 ऑगस्ट पासूनच सुरु झाला आहे. आणि हा उत्सव आहे चंद्रावर चांद्रयान पोहोचण्याचा. भारताच्या यशस्वी चांद्रयान मोहिमेत आमची अंतराळ संशोधन संस्था इस्रो ची अत्यतं महत्वपूर्ण भूमिका आहे. मात्र या मोहिमेला भारतातील उद्योगांनी देखील मोठे योगदान दिले आहे. चांद्रयानासाठी वापरलेले अनेक घटक आणि भाग आमच्या उद्योगांनी, आमच्या खाजगी कंपन्यांनी, आमच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी आवश्यकतेनुसार तयार करून अगदी वेळेत उपलब्ध करून दिले. म्हणजेच हे यश, विज्ञान आणि उद्योग या दोघांचे आहे. आणि महत्वाचे म्हणजे या वेळी हे यश भारतासोबतच संपूर्ण जगात साजरे केले जात आहे. हा उत्सव देशाच्या विकासाला गती देण्याबद्दल साजरा केला जात आहे आणि हा सोहळा एक जबाबदार अंतराळ कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्याचा आहे. हा उत्सव नवोन्मेषाचा आहे. हा सोहळा अंतराळ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाश्वतता आणि समानता आणण्याचा आहे. आणि या बी 20 शिखर परिषदेची संकल्पना देखील तीच आहे - RAISE अर्थात जबाबदारी, वेग, नवोन्मेष, शाश्वतता आणि समानता. आणि, हे मानवतेबद्दल आहे. हे एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य याबद्दल आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बी-20 परिषद भारत 2023,च्या बैठकीला केले संबोधित
August 27th, 12:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत बी-20 परिषद भारत 2023, या बैठकीला संबोधित केले. भारतातील या बी-20 परिषदेने, जगभरातील धोरणकर्ते, आघाडीचे व्यावसायिक-उद्योजक आणि तज्ञांना, बी-20 भारताच्या घोषणापत्रावर चर्चा आणि विचारमंथनासाठी एकत्र आणले आहे. जी-20 मध्ये सादर करावयाच्या, 54 शिफारशी आणि 172 धोरणात्मक कार्यवाहींचा, या घोषणापत्रात समावेश आहे.आपल्या ग्रहाला अधिक उत्तमतेकडे नेणाऱ्या सर्वांच्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी वसुंधरा दिनाच्या निमित्ताने केले कौतुक
April 22nd, 09:53 am
वसुंधरा दिनाच्या आजच्या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली पृथ्वी ही अधिक चांगली राखण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत त्यांचे कौतुक केले आहे.Lifestyle of the planet, for the planet and by the planet: PM Modi at launch of Mission LiFE
October 20th, 11:01 am
At the launch of Mission LiFE in Kevadia, PM Modi said, Mission LiFE emboldens the spirit of the P3 model i.e. Pro Planet People. Mission LiFE, unites the people of the earth as pro planet people, uniting them all in their thoughts. It functions on the basic principles of Lifestyle of the planet, for the planet and by the planet.PM launches Mission LiFE at Statue of Unity in Ekta Nagar, Kevadia, Gujarat
October 20th, 11:00 am
At the launch of Mission LiFE in Kevadia, PM Modi said, Mission LiFE emboldens the spirit of the P3 model i.e. Pro Planet People. Mission LiFE, unites the people of the earth as pro planet people, uniting them all in their thoughts. It functions on the basic principles of Lifestyle of the planet, for the planet and by the planet.वसुंधरा दिनाच्या निमित्ताने पृथ्वीमाते प्रति कृतज्ञता व्यक्त करणारी एक चित्रफीत पंतप्रधानांनी सामायिक केली
April 22nd, 11:29 am
जागतिक वसुंधरा दिन हा पृथ्वीमातेच्या दयाळूपणाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा तसेच तिची योग्य काळजी घेण्याच्या वचनबद्धतेला उजाळा देण्याचा दिवस आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी याप्रसंगी एक चित्रफीतही सामायिक केली आहे.जागतिक आरोग्य संघटनेच्या जामनगर येथील पारंपरिक औषध वैश्विक केंद्राच्या शिलान्यास कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
April 19th, 03:49 pm
मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंदकुमार जुगनाथ जी, जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक- डॉक्टर टेड्रोस, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी सर्वानंद सोनोवाल, डॉक्टर मनसुख मांडवीय, मुंजपारा महेंद्रभाई आणि इथे उपस्थित असलेले इतर मान्यवर, महिला आणि सज्जन हो!!पंतप्रधानांच्या हस्ते जागतिक आरोग्य संघटनेच्या जामनगर येथील पारंपरिक औषध केंद्राचा कोनशीला समारंभ संपन्न
April 19th, 03:48 pm
मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ आणि जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांच्या उपस्थितीत आज जामनगर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जागतिक आरोग्य संघटनेच्या पारंपरिक औषध केंद्राच्या स्थापनेचा कोनशीला समारंभ संपन्न झाला. जगभरातील अशा प्रकारचे हे जागतिक पातळीवरील पारंपरिक औषधांचे पहिले आणि एकमेव बाह्यस्थ केंद्र असणार आहे. हे केंद्र जागतिक स्वास्थ्यासाठीचे आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून उदयाला येईल. बांगलादेश, भूतान, नेपाळ या देशांचे पंतप्रधान आणि मालदीवचे राष्ट्रपती यांनी पाठविलेले व्हिडीओ संदेश यावेळी उपस्थितांसमोर सादर करण्यात आले. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय, सर्वानंद सोनोवाल, डॉ. मुंजपारा महेंद्रभाई आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यावेळी उपस्थित होते.