Prime Minister Narendra Modi to visit Rajasthan and Haryana
December 08th, 09:46 am
Prime Minister Shri Narendra Modi will visit Rajasthan and Haryana on 9th December. He will travel to Jaipur and at around 10:30 AM, he will inaugurate the Rising Rajasthan Global Investment Summit 2024 at Jaipur Exhibition and Convention Centre (JECC). Thereafter, Prime Minister will travel to Panipat and at around 2 PM, he will launch LIC’s Bima Sakhi Yojana and lay the foundation stone of the Main campus of Maharana Pratap Horticultural University.देशातील शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली ग्वाही
August 11th, 04:50 pm
देशातील शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. नवी दिल्लीत आज पिकांच्या 109 नवीन वाणांचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. पिकांच्या, हवामानाला अनुरुप आणि जास्त उत्पादन देणाऱ्या या वाणांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, असेही त्यांनी पुढे सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत सुपीक, हवामानास अनुकूल आणि जैव संवर्धन करणाऱ्या पिकांच्या 109 वाणांचे केले वाटप
August 11th, 02:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याआधी आज नवी दिल्लीतल्या भारत कृषी संशोधन संस्था येथे पिकांच्या अत्यंत सुपीक, हवामानास अनुकूल आणि जैवसंवर्धन केलेल्या 109 वाणांचे वाटप केले.पीएम - किसान योजनेच्या आर्थिक लाभाचा 10 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 01st, 12:31 pm
उपस्थित सर्व आदरणीय मान्यवर व्यक्ती, सर्वात पहिले मी माता वैष्णो देवी परिसरात झालेल्या दुःखद घटनेविषयी शोक व्यक्त करतो. चेंगराचेंगरीत ज्यांनी आपले जवळचे लोक गमावले, जे जखमी झाले आहेत, त्यांच्याप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. केंद्र सरकार जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे. नायब राज्यपाल मनोज सिन्हाजींशी देखील माझं बोलणं झालं आहे. मदत कार्य सुरु आहे, जखमींच्या उपचाराची संपूर्ण काळजी घेतली जात आहे.पंतप्रधानांकडून पीएम-किसानचा दहावा हप्ता जारी
January 01st, 12:30 pm
तळागळातील शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या संकल्पाने आणि सातत्यपूर्ण बांधिलकीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रधानमंत्री किसान सन्मान निधी(पीएम- किसान) योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीचा दहावा हप्ता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जारी केला. यामुळे सुमारे 10 कोटींपेक्षा जास्त शेतकरी कुटुंबांच्या खात्यात 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा झाली आहे. यावेळी पंतप्रधानांनी 351 एफपीओ अर्थात कृषी उत्पादक संघटनांना 14 कोटी रुपयांहून अधिक रक्कमही हस्तांतरित केली. यामुळे 1.24 लाखाहून जास्त शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. यावेळी पंतप्रधानांनी काही कृषी उत्पादक संघटनांशी संवाद साधला. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि मुख्यमंत्री, नायब राज्यपाल, कृषीमंत्री आणि विविध राज्यांमधील शेतकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते.पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीच्या पुढील हप्त्याच्या वितरणप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
August 09th, 12:31 pm
केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी मी गेले काही दिवस संवाद साधत आहे. यातून सरकारने ज्या योजना सुरु केल्या आहेत त्यांचा लाभ सामान्य लोकांपर्यंत कशा प्रकारे पोहोचतो आहे हे आपल्याला अधिक उत्तम पद्धतीने समजून घेता येते. जनता जनार्दनाशी थेट संपर्क ठेवण्याचा हा फायदा आहे. या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी, देशभरातील अनेक राज्यांतून या कार्यक्रमात सहभागी झालेला माननीय मुख्यमंत्री, नायब राज्यपाल आणि उपमुख्यमंत्री, विविध राज्य सरकारांतील मंत्री, अन्य प्रतिष्ठित व्यक्ती आणि देशभरातून या कार्यक्रमात सहभागी झालेले शेतकरी तसेच बंधू आणि भगिनींनो,पंतप्रधानांच्या हस्ते पीएम-किसान योजनेचा नववा हप्ता जाहीर
August 09th, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात, या योजनेच्या पुढच्या टप्प्याचे पैसे जमा करण्यात आले. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमात, पंतप्रधानांनी लाभार्थी शेतकऱ्यांशीही संवाद साधला. या कार्यक्रमाअंतर्गत, 9.75 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात, 19,500 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी थेट जमा करण्यात आला आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा हा नववा हप्ता होता.PM to release commemorative coin of Rs 75 denomination to mark the 75th Anniversary of FAO
October 14th, 11:59 am
On the occasion of 75th Anniversary of Food and Agriculture Organization (FAO) on 16th October 2020, Prime Minister Shri Narendra Modi will release a commemorative coin of Rs 75 denomination to mark the long-standing relation of India with FAO. Prime Minister will also dedicate to the Nation 17 recently developed biofortified varieties of 8 crops.