संयुक्त अरब अमिराती मध्ये अबू धाबी इथे अहलान मोदी कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले संबोधन

February 13th, 11:19 pm

आज अबू धाबी मध्ये आपण सर्वांनी नवा इतिहास घडवला आहे.आपण सर्वजण संयुक्त अरब अमिरातीच्या विविध भागातून आले आहात आणि भारताच्या विविध राज्यांमधून आला आहात.मात्र आपण सर्वजण मनाने जोडलेले आहात.या ऐतिहासिक स्टेडीयममध्ये प्रत्येक जण मनापासून हेच म्हणत आहे भारत- युएई मैत्री झिंदाबाद !प्रत्येक श्वासागणिक म्हणत आहे भारत- युएई मैत्री झिंदाबाद ! प्रत्येक आवाज म्हणत आहे, भारत- युएई मैत्री झिंदाबाद ! हा एक क्षण अनुभवायचा आहे.भरभरून जगायचा आहे.आपल्या बरोबर आयुष्यभर राहतील अशा आठवणी आज इथून घेऊन जायच्या आहेत.

संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारतीय समुदायाच्या "अहलान मोदी" या कार्यक्रमात पंतप्रधानांचा संवाद

February 13th, 08:30 pm

संयुक्त अरब अमिरातीमधील भारतीय समुदायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या 'अहलान मोदी' या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीमधील भारतीय समुदायाला संबोधित केले. या कार्यक्रमात 7 अमिरातीमधील अनिवासी भारतीय सहभागी झाले होते आणि त्यात सर्व समुदायातील भारतीयांचा समावेश होता. प्रेक्षकांमध्ये अमिराती मधील नागरिकांचाही समावेश होता.

पंतप्रधान मोदींना प्रदान करण्यात आलेले सर्वोच्च नागरी पुरस्कार

May 22nd, 12:14 pm

अनेक देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरव केला आहे. त्यांच्या या गौरवात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे आणि दूरदृष्टीचे प्रतिबिंब दिसून येते. या पुरस्कारांमुळे जागतिक स्तरावर होत असलेल्या भारताच्या उदयाला अधिक बळ मिळाले आहे. जगभरातील देशांबरोबर भारताचे वृद्धिंगत होत असलेले संबंधही त्यातून प्रतीत होतात.