कुवेतमधील भारतीय समुदायाशी संवादाचा कार्यक्रम ‘हाला मोदी’ मधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण
December 21st, 06:34 pm
मी आत्ताच अवघ्या अडीच तासांपूर्वी कुवेतला पोहोचलो आणि इथे पाऊल ठेवल्यापासून आजूबाजूला एक वेगळीच आपुलकी, एक वेगळीच मायेची ऊब जाणवत आहे. तुम्ही सर्व भारतातील विविध राज्यांतून आला आहात. पण तुम्हा सगळ्यांकडे बघून असं वाटतंय की जणू भारताचे लघुरूपच (मिनी इंडिया) माझ्यासमोर उभे राहिले आहे. इथे भारताच्या उत्तर-दक्षिण-पूर्व पश्चिमे कडील प्रत्येक प्रदेशातून वेगवेगळ्या भाषा आणि बोली बोलणारे लोक माझ्यासमोर दिसत आहेत. पण प्रत्येकाच्या हृदयात एकच पडसाद आहे…. प्रत्येकाच्या हृदयात एकच निनाद आहे - भारत मातेचा विजय असो….,.भारत मातेचा विजय असो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेतमध्ये 'हाला मोदी' या कार्यक्रमात भारतीय समुदायाला केले संबोधित
December 21st, 06:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कुवेतमधील शेख साद अल - अब्दुल्ला या क्रीडा संकुलात आयोजित 'हाला मोदी' या विशेष कार्यक्रमात मोठ्या संख्येने आलेल्या, कुवेतमध्ये स्थायिक भारतीय समुदायाला संबोधित केले. कुवेतमधील तिथल्या समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधित्व करणारे भारतीय नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.संविधानाच्या स्वीकाराला 75 वर्ष झाल्यानिमित्त लोकसभेत झालेल्या विशेष चर्चेमधले पंतप्रधानांचे संबोधन
December 14th, 05:50 pm
आपणा सर्वांसाठी आणि सर्व देशवासीयांसाठी इतकेच नव्हे तर जगभरातल्या लोकशाहीप्रेमी नागरिकांसाठीही हा अभिमानाचा क्षण आहे. लोकशाहीचा हा उत्सव मोठ्या अभिमानाने साजरा करण्याची ही वेळ आहे. संविधानाचा 75 वर्षांचा अविस्मरणीय प्रवास आणि जगातल्या सर्वात महान आणि विशाल लोकशाहीचा प्रवास, यामागे असलेली आपल्या संविधान निर्मात्यांची दूर दृष्टी, आपल्या संविधान निर्मात्यांचे योगदान घेऊन आपण आज आगेकूच करत आहोत. 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त उत्सव साजरा करण्याचा हा क्षण आहे.संसदही या उत्सवात सहभागी होऊन आपल्या भावना व्यक्त करत आहे याचा मला आनंद आहे. मी सर्व माननीय सदस्यांचे आभार मानतो. ज्यांनी या उत्सवात सहभाग घेतला त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो.संविधान स्विकृतीच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष चर्चासत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेला केले संबोधित
December 14th, 05:47 pm
संविधान स्विकृतीच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत विशेष चर्चासत्राला संबोधित केले. आपण लोकशाहीचा हा उत्सव साजरा करत आहोत, ही भारतातील सर्व नागरिकांसाठी आणि लोकशाहीचा आदर करणाऱ्या जगभरातील सर्व लोकांसाठी अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे असे उद्गार मोदी यांनी सभागृहाला संबोधित करताना काढले. आपल्या राज्यघटनेच्या 75 वर्षांच्या या उल्लेखनीय आणि महत्त्वपूर्ण प्रवासात आपल्या राज्यघटनेच्या रचनाकारांची दूरदृष्टी, द्रष्टेपणाचे आणि प्रयत्नांचे आभार मानून ते म्हणाले की, 75 वर्षे यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याची वेळ आली आहे. हा सोहळा साजरा करण्यात संसद सदस्यही सहभागी होत आहेत आणि आपले विचार व्यक्त करत आहेत याबद्दल मोदी यांनी आनंद व्यक्त केला तसेच त्यांचे आभार मानले आणि अभिनंदन केले.नवी दिल्ली येथे अष्टलक्ष्मी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 06th, 02:10 pm
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा जी, मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा जी, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा जी, सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी ज्योतिरादित्य सिंधिया जी, सुकांता मुजूमदार जी, अरुणाचल प्रदेशचे उप-मुख्यमंत्री, मिजोरम आणि नागालँडच्या सरकारचे मंत्रीगण, अन्य लोकप्रतिनिधी, ईशान्य प्रदेशातून आलेले सर्व बंधू आणि भगिनी, स्त्री आणि पुरुषगण,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन
December 06th, 02:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात सर्व मान्यवरांचे स्वागत करताना मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस असल्याचे नमूद केले. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण झाली असून ती सर्व नागरिकांसाठी प्रेरणादायी आहे असे ते म्हणाले.सर्वोच्च न्यायालयात झालेल्या संविधान दिवस कार्यक्रमात पंतप्रधानांचे संबोधन
November 26th, 08:15 pm
भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना जी, न्यायमूर्ती बी. आर. गवई जी, न्यायमूर्ती सुर्यकांत जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी अर्जुन राम मेघवाल जी, अटर्नी जनरल वेंकटरमणी जी, बार कौन्सिलचे अध्यक्ष मनन कुमार मिश्र जी, सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष कपिल सिब्बल जी, सर्वोच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती गण, माजी न्यायाधीश वर्ग, उपस्थित इतर मान्यवर, स्त्री आणि पुरुष वर्ग,पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या संविधान दिनाच्या कार्यक्रमात झाले सहभागी
November 26th, 08:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयात झालेल्या संविधान दिनाच्या कार्यक्रमात भाग घेतला. सरन्यायाधीश संजीव खन्ना, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि न्यायमूर्ती सूर्यकांत, कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल, भारताचे ऍटर्नी जनरल आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.मुंबईतील ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
August 30th, 12:00 pm
भारतीय रिझर्व्ह बँक गव्हर्नर श्री शक्तिकांत दास जी, नियामक मंडळ सदस्य ख्रिस गोपालकृष्णनजी, वित्त उद्योगातील नेते, फिनटेक आणि स्टार्ट-अप जगतातील माझे सहकारी, इतर सर्व मान्यवर, भगिनी आणि सज्जनहो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात मुंबई येथे ग्लोबल फिनटेक फेस्ट (जीएफएफ) 2024 ला केले संबोधित
August 30th, 11:15 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रात मुंबई येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ग्लोबल फिनटेक फेस्ट (जीएफएफ) 2024 ला संबोधित केले. यावेळी आयोजित प्रदर्शनाला देखील पंतप्रधानांनी भेट दिली. पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडिया, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि फिनटेक कन्व्हर्जन्स कौन्सिल यांनी संयुक्तपणे ग्लोबल फिनटेक फेस्ट चे आयोजन केले आहे. फिनटेकमधील भारताची प्रगती प्रदर्शित करणे आणि या क्षेत्रातील प्रमुख हितधारकांना एकत्र आणणे हे याचे उद्दिष्ट आहे.पोलंडमधील वॉर्सा इथे भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
August 21st, 11:45 pm
हे दृश्य खरोखरच अद्भुत आहे आणि तुमचा उत्साह देखील अद्भुत आहे . मी इथं पाय ठेवल्यापासून पाहतो आहे तुम्ही थकतच नाही आहात. तुम्ही सर्व जण पोलंडच्या वेगवेगळ्या भागातून आला आहात, सर्वांची भाषा, बोली, खाण्याच्या सवयी भिन्न आहेत. मात्र प्रत्येकजण भारतीयत्वाच्या भावनेने जोडलेला आहे. तुम्ही माझे येथे इतके छान स्वागत केले आहे, या स्वागतासाठी मी तुम्हा सर्वांचा, पोलंडच्या जनतेचा खूप आभारी आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले पोलंडमधील भारतीय समुदायाला संबोधित
August 21st, 11:30 pm
त्याआधी पोलंडमधल्या भारतीय समुदायाने पंतप्रधानांचे मोठ्या जल्लोष आणि उत्साहात स्वागत केले. सुमारे 45 वर्षांनंतर भारताचे पंतप्रधान पोलंडच्या भेटीवर आल्याची बाब पंतप्रधानांनी आपल्या संबोधनात नमूद केली. या भेटीत आपण पोलंडचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेज डुडा आणि पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांची भेट घेण्यासाठी, तसेच भारत आणि पोलंडमधली संबंध अधिक दृढ करण्यासाठी आतुर असल्याचे त्यांनी सांगितले. भारत ही लोकशाहीची जननी आहे, या नात्याने तसेच भारत आणि पोलंडमधली एकसामाईक मूल्ये दोन्ही देशांना78 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून राष्ट्राला संबोधित केले
August 15th, 03:04 pm
त्यांच्या संबोधनातील काही ठळक मुद्दे:78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
August 15th, 01:09 pm
आज अत्यंत शुभ क्षण आहे, ज्या वेळी आपण देशासाठी बलिदान देणाऱ्या, देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचे जीवन समर्पित करणाऱ्या, आयुष्यभर त्यासाठी संघर्ष करणाऱ्या, फाशीच्या तख्तावर ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा देणाऱ्या, असंख्य स्वातंत्र्य प्रेमींना वंदन करण्याचा हा उत्सव आहे, त्यांचे पुण्यस्मरण करण्याचा हा प्रसंग आहे. स्वातंत्र्य सैनिकांनी आज आपल्याला ह्या प्रसंगी स्वातंत्र्यासह श्वास घेण्याचे भाग्य दिले आहे. हा देश त्यांचा ऋणी आहे. अशा प्रत्येक महान व्यक्तीप्रती आपण श्रद्धेची भावना व्यक्त करूया.भारतात साजरा झालेला 78 वा स्वातंत्र्यदिन सोहळा
August 15th, 07:30 am
पंतप्रधान मोदींनी 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या आपल्या भाषणात भारताच्या भविष्याबद्दलच्या व्हिजनची रुपरेषा मांडली. 2036 च्या ऑलिम्पिकचे आयोजन करण्यापासून ते धर्मनिरपेक्ष नागरी संहिता अंमलात आणण्यापर्यंतच्या मुद्द्यांसह भारताची सामूहिक प्रगती आणि प्रत्येक नागरिकाचे सक्षमीकरण यावर पंतप्रधान मोदींनी प्रकर्षाने भर दिला. भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा नव्या जोमाने सुरू ठेवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. नवोन्मेष, शिक्षण आणि जागतिक नेतृत्व या गोष्टी केंद्रस्थानी ठेवल्यास 2047 पर्यंत भारताला विकसित भारत बनण्यापासून काहीही रोखू शकत नाही याचा त्यांनी पुनरुच्चार केला.Tamil Nadu will shatter the false confidence and pride of the I.N.D.I alliance: PM Modi
March 15th, 11:45 am
On his visit to Tamil Nadu, PM Modi addressed a public rally in Kanyakumari. He said, There is a wave of confidence among the people of Tamil Nadu to reject any mandate that goes against the interests of India. He added, Tamil Nadu will shatter the false confidence and pride of the I.N.D.I. alliance. He said that he had embarked on an ‘Ekta Rally’ in 1991 from Kanyakumari to Kashmir and today I have returned from Kashmir to Kanyakumari.People of Tamil Nadu welcome PM Modi with an open heart as he addresses a public rally in Kanyakumari, Tamil Nadu
March 15th, 11:15 am
On his visit to Tamil Nadu, PM Modi addressed a public rally in Kanyakumari. He said, There is a wave of confidence among the people of Tamil Nadu to reject any mandate that goes against the interests of India. He added, Tamil Nadu will shatter the false confidence and pride of the I.N.D.I. alliance. He said that he had embarked on an ‘Ekta Rally’ in 1991 from Kanyakumari to Kashmir and today I have returned from Kashmir to Kanyakumari.हरियाणातील गुरुग्राम येथे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या उद्घाटन/ पायाभरणी प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन
March 11th, 01:30 pm
हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय जी, कष्टाळू मुख्यमंत्री मनोहर लाल जी, केंद्रातील माझे वरिष्ठ सहकारी नितीन गडकरी जी, राव इंद्रजीत सिंह, कृष्ण पाल गुर्जर जी, हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत जी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि संसदेतील माझे सहकारी नायब सिंह सैनी जी, इतर सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो!पंतप्रधानांच्या हस्ते विविध राज्यांतील सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या 112 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी
March 11th, 01:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरयाणातील गुरुग्राम येथे देशभरातील सुमारे एक लाख कोटी रुपये खर्चाच्या 112 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी केली. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशभरातून लाखो लोक या कार्यक्रमाशी जोडले गेले.The next 25 years are crucial to transform India into a 'Viksit Bharat': PM Modi
January 25th, 12:00 pm
PM Modi addressed the people of India at Nav Matdata Sammelan. He said, “The age between 18 to 25 shapes the life of a youth as they witness dynamic changes in their lives”. He added that along with these changes they also become a part of various responsibilities and during this Amrit Kaal, strengthening the democratic process of India is also the responsibility of India’s youth. He said, “The next 25 years are crucial for both India and its youth. It is the responsibility of the youth to transform India into a Viksit Bharat by 2047.”