जी20 आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीत पंतप्रधानांनी दिलेला व्हिडिओ संदेश

August 18th, 02:15 pm

गांधीजींनी आरोग्य हा इतका महत्त्वाचा मुद्दा मानला की त्यांनी या विषयावर 'की टू हेल्थ' (आरोग्याची गुरुकिल्ली) या नावाचे पुस्तक लिहिले. निरोगी असणे म्हणजे मन आणि शरीर सुसूत्र आणि समतोल स्थितीत असणे म्हणजेच आरोग्य हा जीवनाचा मोठा पाया आहे, असे त्यांनी सांगितले होते. आपल्याकडे संस्कृतमध्ये एक श्लोक आहे:

जी 20 आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीला पंतप्रधानांनी केले संबोधित

August 18th, 01:52 pm

या बैठकीला संबोधित करताना पंतप्रधानांनी, भारतातील आरोग्य सेवा क्षेत्रातील 2.1 दशलक्ष डॉक्टर, 3.5 दशलक्ष परिचारिका, 1.3 दशलक्ष निमवैद्यकीय कर्मचारी, 1.6 दशलक्ष औषध उत्पादक आणि विक्रेते तसेच इतर लाखो लोकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

मध्य प्रदेशात सागर इथे विकासात्मक प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर

August 12th, 04:42 pm

कार्यक्रमात उपस्थित मध्य प्रदेशचे राज्यपाल श्रीयुत मंगुभाई पटेल, मुख्यमंत्री श्रीयुत शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्रीमंडळातील माझे सहकारी श्री वीरेंद्र खटीकजी, ज्योतिरादित्य सिंदियाजी, प्रल्हाद पटेलजी, मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री, सर्व खासदार, वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेली सर्व पूज्यनीय संत मंडळी आणि खूप मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!

पंतप्रधानांच्या हस्ते मध्य प्रदेशातील सागर येथे विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण

August 12th, 03:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील सागर येथे विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. या प्रकल्पांमध्ये 100 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून बांधण्यात येणार्‍या संत शिरोमणी गुरुदेव श्री रविदास जी स्मारकाची पायाभरणी, 1580 कोटींहून अधिक खर्चासह विकसित केले जाणारे दोन रस्ते प्रकल्प आणि 2475 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चून विकसित करण्यात आलेले कोटा-बिना रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे लोकार्पण यांचा समावेश आहे.

मध्य प्रदेशातील शाहडोल येथे सिकलसेल अॅनिमिया निर्मूलन अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

July 01st, 10:56 pm

कार्यक्रमात उपस्थित मध्यप्रदेशचे राज्यपाल श्रीमान मंगू भाई पटेल, मुख्यमंत्री भाई शिवराजजी, केंद्रातील मंत्रीमंडळामधील माझे सहकारी श्री मनसुख मांडवियाजी, फग्गन सिंह कुलस्तेजी, प्रोफेसर एस पी सिंह बघेलजी, श्रीमती रेणुका सिंह सरुताजी, डॉक्टर भारती पवारजी, श्री बीश्वेश्वर टूडूजी, खासदार श्री वी डी शर्माजी, मध्य प्रदेश सरकारातील मंत्रीगण, सर्व आमदार, देशभरातून या कार्यक्रमात जोडले जात असलेले अन्य सर्व मान्यवर, आणि इतक्या प्रचंड संख्येने आम्हा सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!

पंतप्रधानांनी मध्य प्रदेशमधील शहडोल येथे राष्ट्रीय सिकलसेल ऍनेमिया निर्मूलन मोहिमेचा केला शुभारंभ

July 01st, 03:29 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेश मधील शहडोल येथे राष्ट्रीय सिकलसेल ऍनेमिया निर्मूलन मोहिमेचा शुभारंभ केला आणि लाभार्थ्यांना सिकलसेल जनुकीय स्थिती कार्डचे वाटप केले. पंतप्रधानांनी मध्य प्रदेशात सुमारे 3.57 कोटी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) कार्डचे वितरण सुरू केले. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी सोळाव्या शतकाच्या मध्यावर गोंडवाना येथे राज्य करणाऱ्या राणी दुर्गावती यांचा गौरव केला. मेळाव्याला संबोधित करताना, पंतप्रधानांनी राणी दुर्गावती यांना आदरांजली वाहिली आणि सांगितले की त्यांच्या प्रेरणेने राष्ट्रीय सिकलसेल ऍनेमिया निर्मूलन मोहीम आज सुरू होत आहे. मध्य प्रदेशमधल्या नागरिकांसाठी एक कोटी आयुष्मान कार्ड वितरित केली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, दोन मोठ्या उपक्रमांचे सर्वात मोठे लाभार्थी गोंड, भिल्ल आणि इतर आदिवासी समाजातील लोक आहेत. यावेळी त्यांनी मध्य प्रदेशातील जनता आणि डबल इंजिन सरकारचे अभिनंदन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’(भाग 102) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

June 18th, 11:30 am

मित्रांनो, खूप लोकं सांगतात की, पंतप्रधान म्हणून मी अमुक एक चांगले काम केले आहे, एखादे मोठे काम केले आहे. ‘मन की बात’ चे कित्येक श्रोते पत्र लिहून खूप कौतुक करतात. कोणी म्हणतात हे केले, कोणी म्हणते ते काम केले, हे चांगले केले, हे अधिक चंगले केले, हे उत्कृष्ट केले परंतु, जेव्हा मी भारतातील सामान्य नागरिकांचे प्रयत्न, त्यांचे परिश्रम, त्यांची इच्छाशक्ती बघतो तेव्हा मी भारावून जातो. कोणतेही मोठे ध्येय असो, कठीणातील कठीण आव्हान असू दे, भारतीय जनतेची सामूहिक शक्ती प्रत्येक आव्हानावर तोडगा शोधून काढते. दोन-तीन दिवसांपूर्वी देशाच्या पश्चिमेकडे किती मोठे चक्रीवादळ आले हे आपण सगळ्यांनीच पाहिले. जोरदार वारा, मुसळधार पाऊस. बिपरजॉय ने कच्छमध्ये किती मोठे नुकसान केले, परंतु कच्छ मधील लोकांनी हिंमतीने आणि सतर्कतेने इतक्या धोकादायक चक्रीवादळाचा सामना केला हे खूपच अभूतपूर्व आहे. दोन दिवसांनी कच्छ मधील लोकं, त्यांचे नवीन वर्ष अर्थात आषाढ बीज साजरे करणार आहेत. आषाढ बीज, कच्छ मध्ये पावसाच्या आगमनाचे प्रतिक मानले जाते हा देखील एक संयोगच आहे. मी इतकी वर्षे कच्छला येत-जातो, तिथल्या लोकांची सेवा करण्याचे भाग्यही मला लाभले आहे आणि म्हणूनच मला कच्छच्या लोकांची हिंमत आणि उपजीविकेविषयी माहिती आहे. दोन दशकांपूर्वी झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर हा कच्छ पुन्हा कधीच सावरणार नाही, असे म्हंटले जायचे, तोच जिल्हा आज देशातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या जिल्ह्यांपैकी एक आहे. मला खात्री आहे कच्छमधील लोक बिपरजॉय चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसातून देखील त्याच वेगाने बाहेर पडतील.

गुवाहाटी येथील एम्स रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

April 14th, 12:45 pm

आसामचे राज्यपाल श्री गुलाबचंद कटारिया जी, मुख्यमंत्री श्री हिमंता बिस्वा सरमा जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, देशाचे आरोग्य मंत्री मनसुख मांडविया जी आणि डॉ. भारती पवार जी, आसाम सरकारचे मंत्री केशब महंता जी, वैद्यकीय जगतातील सर्व मान्यवर व्यक्ती, विविध ठिकाणांहून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जोडलेले सर्व मान्यवर आणि आसामच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो.

पंतप्रधानांनी आसाममध्ये गुवाहाटी येथे 3400 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या प्रकल्पांची केली पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण

April 14th, 12:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममध्ये गुवाहाटी येथे 3400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी केली आणि विविध प्रकल्पांचे राष्ट्रार्पण केले. पंतप्रधानांनी एम्स गुवाहाटी आणि इतर तीन वैद्यकीय महाविद्यालयांचे राष्ट्रार्पण केले. त्यांनी आसाम ऍडव्हान्स्ड हेल्थ केअर इनोवेशन इन्स्टीट्युटची(AAHII) देखील पायाभरणी केली आणि पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना(AB-PMJAY) कार्ड वितरित करून ‘आपके द्वार आयुष्मान’ या मोहिमेचा शुभारंभ केला.

वाराणसी इथल्या रुद्राक्ष संमेलन सभागृहात ‘वैश्विक क्षयरोग शिखर परिषदेत’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

March 24th, 10:20 am

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री श्रीमान योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय आरोग्य मंत्री श्री मनसुख मांडविया जी, उपमुख्‍यमंत्री श्री बृजेश पाठक जी, विविध देशांचे आरोग्य मंत्री, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रादेशिक संचालक, उपस्थित सर्व मान्यवर तसेच ‘स्टॉप टीबी पार्टनरशिप’ सह विविध संस्थांचे प्रतिनिधी, बंधू आणि भगिनींनो..

उत्तर प्रदेशात वाराणसी येथे वन वर्ल्ड टीबी समिटमध्ये पंतप्रधानांचे संबोधन

March 24th, 10:15 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी येथे रुद्राक्ष कन्वेन्शन सेंटरमध्ये वन वर्ल्ड टीबी समिट या शिखर परिषदेला संबोधित केले. यावेळी पंतप्रधानांनी क्षयरोग प्रतिबंधक अल्पकालीन उपचार आणि क्षयासाठी कुटुंब केंद्रित मॉडेलला देशभरात राबवणाऱ्या अधिकृत क्षयमुक्त पंचायत सह विविध उपक्रमांचा देखील त्यांनी प्रारंभ केला आणि भारताच्या वार्षिक क्षयरोग अहवाल 2023 चे प्रकाशन केले. पंतप्रधानांनी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि उच्च प्रतिबंधित प्रयोगशाळेची पायाभरणी केली आणि वाराणसीमधील महानगरी सार्वजनिक आरोग्य देखरेख केंद्राचे उद्घाटन केले. क्षयरोग संपवण्यासाठी केलेल्या प्रगतीबद्दल निवडक राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि जिल्ह्यांना पंतप्रधानांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले. राज्य/ केंद्रशासित प्रदेशांच्या पातळीवर कर्नाटक आणि जम्मू काश्मीर या पुरस्कारांचे मानकरी ठरले आणि जिल्हा पातळीवर निलगिरी, पुलवामा आणि अनंतनाग जिल्ह्यांना पुरस्कार प्राप्त झाला.

पंतप्रधान 24 मार्च रोजी वाराणसी दौऱ्यावर

March 22nd, 04:07 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 मार्च रोजी वाराणसीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी 10:30 वाजता पंतप्रधान रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर येथे वन वर्ल्ड टीबी शिखर परिषदेला संबोधित करतील. पंतप्रधान दुपारी 12 वाजता, संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठाच्या मैदानावर 1780 कोटींहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत.