क्वाड नेत्यांच्या कर्करोग मूनशॉट कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवेदन
September 22nd, 06:25 am
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल मी राष्ट्राध्यक्ष बायडन यांचे हार्दिक अभिनंदन करतो. परवडण्याजोग्या, सहज उपलब्ध होण्याजोग्या आणि गुणवत्ता पूर्ण आरोग्य सेवे बाबतच्या आमच्या ठाम दृढ निश्चयाची यातून प्रचिती मिळत आहे. कोविड साथीदरम्यान आम्ही इंडो पॅसिफिक क्षेत्रासाठी ‘क्वाड लसीकरण उपक्रम’ राबवला होता आणि मला हे सांगताना आनंद होतो आहे की क्वाड च्या माध्यमातून आम्ही सर्व्हायकल कॅन्सर सारख्या समस्यांचा एकत्र येऊन सामना करायचा निर्णय घेतला आहे.क्वाड कर्करोग मूनशॉट कार्यक्रमात पंतप्रधान राहिले उपस्थित
September 22nd, 06:10 am
डेलावेर मध्ये विल्मिंग्टन येथे क्वाड शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आर बायडेन ज्युनियर यांनी आयोजित केलेल्या क्वाड कर्करोग मूनशॉट कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले.व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर परिषद 3.0 मध्ये प्रमुख नेत्यांच्या उद्घाटनपर सत्रात पंतप्रधानांनी व्यक्त केलेले विचार
August 17th, 10:00 am
140 कोटी भारतीयांतर्फे मी या तिसऱ्या व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ शिखर परिषदेत तुम्हा सर्वांचे स्वागत करतो.गायत्री परिवार अश्वमेध यज्ञ कार्यक्रमात पंतप्रधानांनी दिलेला व्हिडिओ संदेश
February 25th, 09:10 am
गायत्री परिवाराचे कोणतेही आयोजन इतके पवित्र असते की त्यामध्ये सहभागी व्हायला मिळणे ही देखील खरोखरच खूप मोठी भाग्याची गोष्ट असते. आज देव संस्कृती विद्यापीठाद्वारे आयोजित अश्वमेध यज्ञाचा एक भाग बनायला मिळत असल्याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे. जेव्हा मला गायत्री परिवाराकडून या अश्वमेध यज्ञात सहभागी होण्यासाठी निमंत्रण मिळाले होते, तेव्हा, वेळेच्या अभावाबरोबरच माझ्यासमोर एक दुविधा देखील होती. व्हिडिओच्या माध्यमातून देखील या कार्यक्रमात सहभागी होण्यात एक समस्या ही होती की सामान्य माणूस अश्वमेध यज्ञाचा संबंध सत्तेच्या विस्ताराशी जोडून पाहतो. सध्या निवडणुकीच्या दिवसात तर हे स्वाभाविकच आहे की अश्वमेध यज्ञाचे इतर काही अर्थ देखील काढले गेले असते. पण नंतर मग मी पाहिले की हा अश्वमेध यज्ञ, आचार्य श्रीराम शर्मा यांच्या भावनांचा पुरस्कार करत आहे. अश्वमेध यज्ञाचा नवा अर्थ प्रस्थापित करत आहे, तशा माझ्या सर्व दुविधा दूर झाल्या.गायत्री परिवाराने आयोजित केलेल्या अश्वमेध यज्ञाला पंतप्रधानांनी व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून केले संबोधित
February 25th, 08:40 am
गायत्री परिवाराने आयोजित केलेल्या अश्वमेध यज्ञाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. पंतप्रधानांनी ‘अश्वमेध यज्ञा’शी जोडले जाण्याबाबत आपल्या संबोधनाची सुरुवात करताना द्विधा मनस्थितीचा उल्लेख केला कारण आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्याचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो असे ते म्हणाले. मात्र जेव्हा आपण आचार्य श्री राम शर्मा यांच्या भावना जपण्यासाठी अश्वमेध यज्ञ पाहिला आणि त्यातला अभिप्रेत अर्थ जाणून घेतला, तेव्हा आपल्या शंका दूर झाल्या.असे त्यांनी सांगितले.भारताच्या जी-20 अध्यक्षपदामुळे देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या क्षमता जगासमोर आल्या : पंतप्रधान
August 15th, 02:24 pm
77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या बुरुजावरून आज देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, भारताला मिळालेल्या जी-20 अध्यक्षपदामुळे, देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या क्षमता जगासमोर कशा आल्यात हे सविस्तर सांगितले. भारताच्या क्षमता आणि देशात उपलब्ध असलेल्या संधी - नवी ऊंची ओलांडणार असून, या वाढलेल्या आत्मविश्वासातून आणखी नव्या संधी निर्माण होतील, हे निश्चित आहे, असे पंतप्रधान म्हणाले. “भारताच्या जी-20 अध्यक्षपदामुळे, भारताच्या सर्वसामान्य लोकांची ताकद जगाला कळली आहे. आज भारताला जी-20 परिषदेचे यजमानपद भूषवण्याची जबाबदारी मिळाली आहे. आणि गेल्या वर्षभरापासून, ज्या प्रकारे जी-20 च्या अनेक बैठका देशाच्या कानाकोपऱ्यातल्या अनेक शहरात आयोजित केल्या जात आहेत, त्यामुळे सगळ्या जगाला देशातील सर्वसामान्य माणसाची क्षमता आणि ताकद कळली आहे.”वाराणसी इथल्या रुद्राक्ष संमेलन सभागृहात ‘वैश्विक क्षयरोग शिखर परिषदेत’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
March 24th, 10:20 am
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री श्रीमान योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय आरोग्य मंत्री श्री मनसुख मांडविया जी, उपमुख्यमंत्री श्री बृजेश पाठक जी, विविध देशांचे आरोग्य मंत्री, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रादेशिक संचालक, उपस्थित सर्व मान्यवर तसेच ‘स्टॉप टीबी पार्टनरशिप’ सह विविध संस्थांचे प्रतिनिधी, बंधू आणि भगिनींनो..उत्तर प्रदेशात वाराणसी येथे वन वर्ल्ड टीबी समिटमध्ये पंतप्रधानांचे संबोधन
March 24th, 10:15 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी येथे रुद्राक्ष कन्वेन्शन सेंटरमध्ये वन वर्ल्ड टीबी समिट या शिखर परिषदेला संबोधित केले. यावेळी पंतप्रधानांनी क्षयरोग प्रतिबंधक अल्पकालीन उपचार आणि क्षयासाठी कुटुंब केंद्रित मॉडेलला देशभरात राबवणाऱ्या अधिकृत क्षयमुक्त पंचायत सह विविध उपक्रमांचा देखील त्यांनी प्रारंभ केला आणि भारताच्या वार्षिक क्षयरोग अहवाल 2023 चे प्रकाशन केले. पंतप्रधानांनी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि उच्च प्रतिबंधित प्रयोगशाळेची पायाभरणी केली आणि वाराणसीमधील महानगरी सार्वजनिक आरोग्य देखरेख केंद्राचे उद्घाटन केले. क्षयरोग संपवण्यासाठी केलेल्या प्रगतीबद्दल निवडक राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि जिल्ह्यांना पंतप्रधानांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले. राज्य/ केंद्रशासित प्रदेशांच्या पातळीवर कर्नाटक आणि जम्मू काश्मीर या पुरस्कारांचे मानकरी ठरले आणि जिल्हा पातळीवर निलगिरी, पुलवामा आणि अनंतनाग जिल्ह्यांना पुरस्कार प्राप्त झाला.नवी दिल्ली येथे इकॉनॉमिक टाइम्स ग्लोबल बिझनेस समिट 2023 मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 17th, 08:59 pm
टाइम्स समूहाचे समीर जैन जी, विनीत जैन जी, ग्लोबल बिझनेस समिट साठी आलेले सर्व मान्यवर, उद्योग क्षेत्रातील मित्र, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ, माध्यम क्षेत्रातील लोक, इतर मान्यवर, स्त्री आणि पुरुषगण,पंतप्रधानांनी दिल्ली येथे इकॉनॉमिक टाइम्स ग्लोबल बिझनेस समिटला केले संबोधित
February 17th, 08:02 pm
उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी नमूद केले की तीन वर्षांपूर्वी इकॉनॉमिक टाइम्स ग्लोबल बिझनेस समिटमध्ये जेव्हा ते शेवटचे सहभागी झाले होते, त्यानंतरच्या काळात अनेक बदल झाले आहेत. त्यांनी आठवण करून दिली की शेवटच्या शिखर परिषदेनंतर अवघ्या तीन दिवसांतच जागतिक आरोग्य संघटनेने कोविड हा रोग महामारी असल्याचे घोषित केले होते आणि त्यामुळे जागतिक स्तरावर आणि भारतात जलद गतीने मोठे बदल झाले.Vision of self-reliant India embodies the spirit of global good: PM Modi in Indonesia
November 15th, 04:01 pm
PM Modi interacted with members of Indian diaspora and Friends of India in Bali, Indonesia. He highlighted the close cultural and civilizational linkages between India and Indonesia. He referred to the age old tradition of Bali Jatra” to highlight the enduring cultural and trade connect between the two countries.इंडोनेशियातील बाली येथे भारतीय समुदाय आणि भारत मित्रांशी पंतप्रधानांचा संवाद
November 15th, 04:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 नोव्हेंबर 2022 रोजी इंडोनेशियातील बाली येथे भारतीय समुदाय आणि भारत मित्रांच्या 800 हून अधिक सदस्यांना संबोधित केले आणि त्यांच्याशी संवाद साधला. संपूर्ण इंडोनेशियामधून उत्साही आणि वैविध्यपूर्ण अशी गर्दी जमली होती.जी-20 शिखर परिषदेत, भारताच्या नेतृत्वासंदर्भातले बोधचिन्ह, संकल्पना आणि संकेतस्थळाचे उद्घाटन करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
November 08th, 07:31 pm
जी-20 हा अशा देशांचा समूह आहे, ज्याचे आर्थिक सामर्थ्य जगातील एकूण सकल उत्पादनापैकी 85 टक्के सकल उत्पादनाचे प्रतिनिधित्व करतो. जी-20 अशा 20 देशांचा समूह आहे, ज्यात जगातील 75 टक्के व्यापाराचे प्रतिनिधित्व केले जाते. जी-20 अशा 20 देशांचा समूह आहे, ज्यात जगातील दोन तृतीयांश लोकवस्ती आहे. आणि आता यावर्षी भारत या जी-20 समूहाचे नेतृत्व करणार आहे, त्याचे अध्यक्षपद भूषवणार आहे.पंतप्रधानांनी भारताच्या जी -20 अध्यक्षपदाचे बोधचिन्ह, संकल्पना आणि संकेतस्थळाचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केले अनावरण
November 08th, 04:29 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे भारताच्या जी -20 अध्यक्षपदाच्या बोधचिन्ह, संकल्पना आणि संकेतस्थळाचे अनावरण केले.आरोग्य क्षेत्रावर केंद्रीय अर्थसंकल्प 2022 चा सकारात्मक परिणाम या वरच्या वेबिनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 26th, 02:08 pm
मंत्रिमंडळातले माझे सहकारी, देशभरातून सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रामध्ये आरोग्यसेवा क्षेत्राशी संबंधित सर्व व्यावसायिक, निमवैद्यकीय कर्मचारी, परिचारक, आरोग्य व्यवस्थापक, तंत्रज्ञान आणि संशोधनाशी जोडले गेलेले महनीय, महिला आणि सज्जन हो!पंतप्रधानांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अर्थसंकल्पपश्चात वेबिनारचे केले उद्घाटन
February 26th, 09:35 am
पंतप्रधानांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अर्थसंकल्पपश्चात वेबिनारचे आज उद्घाटन केले. पंतप्रधानांद्वारे संबोधित होत असलेल्या अर्थसंकल्पपश्चात वेबिनारच्या मालिकेतील हा पाचवा वेबिनार आहे. केंद्रीय मंत्री, सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील आरोग्य सेवा व्यावसायिक तसेच निम-वैद्यकीय क्षेत्र शुश्रुषा, आरोग्य व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि संधोधन क्षेत्रातील व्यावसायिक देखील या प्रसंगी उपस्थित होते.कोविन जागतिक परिषद 2021 मध्ये पंतप्रधानांचे संबोधन
July 05th, 03:08 pm
कोविड-19 विरोधातल्या आपल्या लढ्यात तंत्रज्ञान हा अविभाज्य भाग आहे. सुदैवाने सॉफ्टवेअर हे असे एक क्षेत्र आहे ज्यामध्ये संसाधनांची मर्यादा नाही. म्हणूनच तांत्रिक दृष्ट्या साध्य झाल्यावर लगेचच आम्ही कोविड ट्रॅकिंगआणि ट्रेसिंग अॅप ओपन सोर्स केले. सुमारे 200 दशलक्ष वापरर्कर्त्यांसह हे आरोग्य सेतू अॅप, विकासकांसाठी सहज उपलब्ध पॅकेज आहे. भारतात वापर होत असल्याने वेग आणि प्रमाण यासाठी वास्तव जगात याची कसोटी झाली आहे याबाबत आपण निश्चिंत राहा.पंतप्रधानांनी केले कोविन जागतिक परिषदेला संबोधित, कोविन मंच म्हणजे कोविड-19 शी दोन हात करण्यासाठी भारताने जगाला प्रदान केलेली सार्वजनिक डिजिटल सामग्री असल्याचे प्रतिपादन
July 05th, 03:07 pm
कोविन मंच म्हणजे कोविड-19 शी दोन हात करण्यासाठी भारताने जगाला प्रदान केलेली सार्वजनिक डिजिटल सामग्री आहे, अश्या शब्दात कोविन मंचाचे वर्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविन जागतिक परिषदेला संबोधित करताना केले.जगाच्या कानाकोपऱ्यात योगशास्त्र पोहचेल यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत : पंतप्रधान
June 21st, 08:40 am
योगाचार्य, योगप्रचारक आणि योगाभ्यासाशी संबंधित प्रत्येकाने योगशास्त्र, जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. सातव्या जागतिक योगदिनानिमित्त त्यांनी आज दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून सर्वांशी संवाद साधला.कोरोना महामारीने ग्रस्त जगामध्ये योग एक आशेचा किरण बनला आहे: पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन
June 21st, 08:37 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने महामारीच्या काळात योगाने पार पाडलेल्या भूमिकेबद्दल विचार मांडले. या कठीण काळात योग हा लोकांसाठी सामर्थ्य आणि संयम यांचा मोठा स्त्रोत बनून राहिला आहे असे ते म्हणाले. जगातील अनेक देशांच्या संस्कृतीमध्ये योग हा अविभाज्य घटक म्हणून अंतर्भूत नसल्यामुळे महामारीच्या काळात अनेक देशांतील जनतेला योग दिनाचे विस्मरण होणे साहजिक आहे, पण त्याऐवजी योगाबद्दल जगात असलेली उत्सुकता वाढली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.