गुजरातमध्ये अहमदाबाद येथील विकासकार्यांची पायाभरणी/उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
March 12th, 10:00 am
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रतजी, गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेलजी, संसदेतील माझे सहकारी आणि गुजरात प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सी.आर.पाटील आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून या कार्यक्रमाशी जोडले गेलेले सर्व राज्यपाल, आदरणीय मुख्यमंत्रीगण, संसद सदस्य, आमदार, मंत्रीगण आणि मला माझ्यासमोर दिसत आहेत,ते 700 हून अधिक ठिकाणांहून तेथील खासदारांच्या नेतृत्वात, तेथील मंत्र्यांच्या नेतृत्वात लाखो लोक आज या कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत. कदाचित रेल्वेच्या इतिहासात एकाच वेळी भारताच्या कानाकोपऱ्यात इतका मोठा कार्यक्रम कधी झालेला नसेल. 100 वर्षांत पहिल्यांदाच असा कार्यक्रम होत असेल. या भव्य प्रमाणातील आयोजनासाठी मी रेल्वे विभागाचे देखील खूप खूप अभिनंदन करतो.गुजरातमध्ये अहमदाबाद येथे पंतप्रधानांच्या हस्ते 1,06,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी तसेच लोकार्पण
March 12th, 09:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये अहमदाबाद येथील समर्पित मालवाहतूक मार्गिकेच्या परिचालन नियंत्रण केंद्रात 1,06,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी तसेच लोकार्पण केले. या प्रकल्पांमध्ये रेल्वेच्या पायाभूत सुविधा, जोडणी सुविधा आणि पेट्रोकेमिकल्स या क्षेत्रांसह विविध क्षेत्रांतील प्रकल्पांचा समावेश आहे. पंतप्रधानांनी आज 10 नव्या वंदे भारत रेल्वे गाड्यांच्या सेवेची देखील सुरुवात केली.रेल्वेच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण कार्यक्रमामध्ये दूरदृश्य प्रणालीव्दारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 26th, 01:25 pm
नमस्कार! आजचा हा कार्यक्रम म्हणजे, नवीन भारताच्या नव्या प्रकारच्या कार्य संस्कृतीचे प्रतीक आहे. आज जे काम भारत करीत आहे, ते अभूतपूर्व वेगाने करीत आहे. आज भारत जे काही करतो, त्याचे प्रमाणही अभूतपूर्व असते. आजच्या भारताने लहान-सहान स्वप्ने पाहणे कधीच सोडून दिले आहे. आम्ही मोठी- भव्य स्वप्ने पाहतो आणि ती स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी रात्रं- दिवस काम करतो. हाच संकल्प या विकसित भारत- विकसित रेल्वे कार्यक्रमामध्ये दिसून येत आहे. या कार्यक्रमामध्ये देशभरातून सहभागी झालेल्या सर्व मंडळीचे मी अभिनंदन करतो. आपल्या बरोबर देशभरातील 500 पेक्षा अधिक रेल्वे स्थानके आणि दीड हजारांपेक्षा जास्त इतर स्थानांवरून लक्षावधी लोक जोडले गेले आहेत. वेगवेगळ्या राज्यांचे माननीय राज्यपाल, सर्व मुख्यमंत्री, केंद्र आणि राज्य सरकारांचे मंत्री, खासदार, आमदार मंडळी, आणि स्थानिक लोक प्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक, ज्यांना पद्म पुरस्कार मिळाला आहे, अशी वरिष्ठ मंडळी, भारताचे महत्वपूर्ण लोक, आपल्या आयुष्याची उमेदीची वर्ष, तरूणपणाचा काळ देशासाठी खर्च करणारे आमचे स्वातंत्र्य सेनानी आणि आपली भावी पिढी, युवा सहकारी आज आपल्याबरोबर आहेत.पंतप्रधानांच्या हस्ते 41,000 कोटी रुपयांच्या 2000 हून अधिक रेल्वेविषयक पायाभूत सुविधा प्रकल्पांची कोनशीला, उद्घाटन आणि लोकार्पण
February 26th, 12:58 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 41,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह देशातील 2000 हून अधिक रेल्वेविषयक पायाभूत सुविधा प्रकल्पांची कोनशीला, उद्घाटन आणि लोकार्पण झाले. देशभरातील 500 रेल्वे स्थानके आणि 1500 इतर ठिकाणांहून लाखो लोक या विकसित भारत विकसित रेल्वे कार्यक्रमाशी जोडले गेले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 508 रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पांच्या पायाभरणी कार्यक्रमात केलेले भाषण
August 06th, 11:30 am
देशाचे रेल्वेमंत्री श्री अश्विनी वैष्णव जी, कार्यक्रमात देशाच्या कानाकोपऱ्यातून सहभागीझालेले केंद्रीय मंत्रिमंडळातील इतर सदस्य, विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री गण, राज्य मंत्रिमंडळातील मंत्रीमहोदय, खासदारगण, आमदारगण, इतर सर्व मान्यवर आणि माझ्या प्रियबंधू आणि भगिनींनो!विकसित होण्याच्या लक्ष्याच्या दिशेने पुढचे पाऊल टाकणारा भारत आपल्या अमृतकाळाच्या प्रारंभात आहे.पंतप्रधानांच्या हस्ते देशभरात 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा आरंभ
August 06th, 11:05 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशभरातल्या 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची कोनशीला बसवत एक ऐतिहासिक पाऊल उचलले. 24,470 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या या पुनर्विकासात 27 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण 508 स्थानकांचा समावेश आहे. यात इतर काही राज्यांसह उत्तर प्रदेश आणि राजस्थानातील प्रत्येकी 55, बिहार मधील 49, महाराष्ट्रातील 44, पश्चिम बंगाल मधील 37, मध्य प्रदेशातील 34, आसाममधील 32, ओदिशातील 25, पंजाब 22, गुजरात आणि तेलंगणात प्रत्येकी 21, झारखंडमध्ये 20, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू प्रत्येकी 18, हरियाणा 15 आणि कर्नाटकातल्या 13 स्थानकांचा समावेश आहे.आसामच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
May 29th, 12:22 pm
आज आसामसह ईशान्येकडील संपूर्ण राज्यांच्या रेल्वे संपर्क सुविधेसाठी फार महत्वपूर्ण दिवस आहे. आज ईशान्येकडील राज्यांच्या संपर्क सुविधेशी संबंधित तीन महत्वाची कामे एकाच वेळी होत आहेत. पहिले काम,पंतप्रधानांनी गुवाहाटी ते जलपायगुडी यांना जोडणाऱ्या आसामच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस गाडीला झेंडा दाखवून केले रवाना
May 29th, 12:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसामच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झेंडा दाखवून रवाना केले. ही वंदे एक्सप्रेस रेल्वे गाडी न्यू जलपायगुडीला गुवाहाटीशी जोडणार आहे आणि हा प्रवास 5 तास 30 मिनिटात होईल. यावेळी पंतप्रधानांनी 182 रुट किलोमीटरच्या नव्याने विद्युतीकरण झालेल्या विभागांचे आणि आसाममध्ये लुमडिंग येथे नव्याने बांधण्यात आलेल्या डेमू/मेमू शेडचे लोकार्पण देखील केले.Congress Party has only indulged in appeasement politics: PM Modi in Badami
May 06th, 03:30 pm
PM Modi addressed a public rally at Badami in Bagalkot, Karnataka by greeting the residents in Kannada while also acknowledging Badami as the capital of the Chalukya Dynasty. While addressing the crowd PM Modi said, “Your persistent encouragement and support gives me the belief that the BJP will once again come to power in the upcoming elections.”PM Modi addresses public rallies at Badami and Haveri in Karnataka
May 06th, 03:08 pm
PM Modi addressed two public rallies at Badami and Haveri in Karnataka. PM Modi outlined BJP's focus on good governance and urged people to elect a stable and development oriented BJP Government in the state with a full majority.भोपाळ ते नवी दिल्ली दरम्यानच्या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पंतप्रधानांचे संबोधन
April 01st, 03:51 pm
इंदूर मधल्या मंदिरात रामनवमीला जी दुर्घटना झाली त्याबद्दल मी आधी दुःख व्यक्त करतो. या दुर्घटनेत आपल्यातून अकाली निघून गेलेल्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांच्या कुटुंबियांप्रती शोक भावना व्यक्त करतो.जे भाविक जखमी झाले आहेत, ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी सदिच्छा मी व्यक्त करतो.पंतप्रधानांनी मध्य प्रदेशात भोपाळमधील राणी कमलापती स्थानक येथे वंदे भारत एक्सप्रेसला दाखवला हिरवा झेंडा
April 01st, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील भोपाळ येथील राणी कमलापती रेल्वे स्थानकावर भोपाळ आणि नवी दिल्ली दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधानांनी कार्यक्रमस्थळी आल्यानंतर राणी कमलापती - नवी दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेसची पाहणी केली आणि रेल्वेगाडीमधील मुले तसेच कर्मचारी यांच्याशी संवादही साधला.