रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दोन अभिनव आणि ग्राहकाभिमुख योजनांच्या उदघाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण
November 12th, 11:01 am
कोरोनाच्या या आव्हानात्मक काळात देशाच्या अर्थमंत्रालयाने, रिझर्व्ह बँक आज इतर आर्थिक संस्थांनी अत्यंत कौतुकास्पद काम केले आहे. अमृत महोत्सवाचा हा काळ, एकविसाव्या शतकातील हे महत्वाचे दशक देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँकेची भूमिका देखील अतिशय महत्त्वाची आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की रिझर्व्ह बँकेचा चमू या अपेक्षा नक्कीच पूर्ण करेल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रिझर्व्ह बँकेच्या दोन अभिनव ग्राहक केंद्रीत उपक्रमांचा प्रारंभ
November 12th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून रिझर्व्ह बँकेच्या दोन अभिनव ग्राहक केंद्रीत उपक्रमांचा प्रारंभ केला. यामध्ये किरकोळ थेट गुंतवणूक योजना आणि रिझर्व्ह बँक- एकात्मिक लोकपाल योजना यांचा समावेश आहे. केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारमण आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास या कार्यक्रमाला उपस्थित होते.