संयुक्त अरब अमिराती मध्ये अबू धाबी इथे अहलान मोदी कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले संबोधन
February 13th, 11:19 pm
आज अबू धाबी मध्ये आपण सर्वांनी नवा इतिहास घडवला आहे.आपण सर्वजण संयुक्त अरब अमिरातीच्या विविध भागातून आले आहात आणि भारताच्या विविध राज्यांमधून आला आहात.मात्र आपण सर्वजण मनाने जोडलेले आहात.या ऐतिहासिक स्टेडीयममध्ये प्रत्येक जण मनापासून हेच म्हणत आहे भारत- युएई मैत्री झिंदाबाद !प्रत्येक श्वासागणिक म्हणत आहे भारत- युएई मैत्री झिंदाबाद ! प्रत्येक आवाज म्हणत आहे, भारत- युएई मैत्री झिंदाबाद ! हा एक क्षण अनुभवायचा आहे.भरभरून जगायचा आहे.आपल्या बरोबर आयुष्यभर राहतील अशा आठवणी आज इथून घेऊन जायच्या आहेत.संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारतीय समुदायाच्या "अहलान मोदी" या कार्यक्रमात पंतप्रधानांचा संवाद
February 13th, 08:30 pm
संयुक्त अरब अमिरातीमधील भारतीय समुदायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या 'अहलान मोदी' या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीमधील भारतीय समुदायाला संबोधित केले. या कार्यक्रमात 7 अमिरातीमधील अनिवासी भारतीय सहभागी झाले होते आणि त्यात सर्व समुदायातील भारतीयांचा समावेश होता. प्रेक्षकांमध्ये अमिराती मधील नागरिकांचाही समावेश होता.जी 20 पर्यटन मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान पंतप्रधानांचा व्हिडिओ संदेश
June 21st, 03:00 pm
अतुल्य भारतात मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो ! पर्यटन मंत्री म्हणून, जागतिक स्तरावर दोन ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचे क्षेत्र हाताळताना, तुम्हाला स्वतः पर्यटक बनण्याची संधी मिळणे दुर्मिळ आहे. पण, तुम्ही गोव्यात आहात - भारतातील एक प्रमुख पर्यटन आकर्षण. म्हणूनच, मी तुम्हाला तुमच्या गंभीर चर्चेतून थोडा वेळ काढून गोव्याचे नैसर्गिक सौंदर्य आणि आध्यात्मिक बाजू पाहण्याची विनंती करतो !जी 20 पर्यटन मंत्र्यांच्या बैठकीला पंतप्रधानांनी केले संबोधित
June 21st, 02:29 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोव्यात आयोजित जी 20 पर्यटन मंत्र्यांच्या बैठकीला चित्रफितीच्या माध्यमातून संदेशाद्वारे संबोधित केले.नवी दिल्ली येथे आयोजित जागतिक भरडधान्य (श्री अन्न) परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
March 18th, 02:43 pm
आजच्या या परिषदेत उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील माझे सहकारी नरेंद्र तोमरजी, मनसुख मांडवीयाजी, पियुष गोयलजी, कैलास चौधरीजी! विदेशातून आलेले काही मंत्रीगण, गयाना, मालदीव, मॉरिशस श्रीलंका, सुदान, सूरिनाम आणि गाम्बियाचे सर्व माननीय मंत्रीगण, जगातील वेगवेगळ्या भागातून शेती पोषण आणि आरोग्याच्या क्षेत्रात काम करणारे वैज्ञानिक आणि तज्ञ, वेगवेगळे आणि FPO’s आणि Starts-Ups मधील युवा मित्र देशातील कानाकोपऱ्यातून इथे जोडले गेलेले लाखो शेतकरी, इतर मान्यवर आणि आपणं सर्वजण.पंतप्रधानांनी केले जागतिक भरडधान्य (श्री अन्न) परिषदेचे उद्घाटन
March 18th, 11:15 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक भरडधान्य श्री अन्न परिषदेचे उद्घाटन केले. नवी दिल्लीत पुसा येथे सुब्रमण्यम हॉल, एन ए एस सी कॉम्प्लेक्स, आय ए आर आय कॅम्पस येथे ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.जी– 20 देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीप्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन
March 02nd, 09:38 am
जी–20 देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. भारताने आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळासाठी ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ ही संकल्पना निवडली आहे. उद्देश आणि कृती या दोन्हींसाठी आपल्यातल्या एकवाक्यतेची गरज ही संकल्पना अधोरेखित करते. सामायिक आणि ठोस उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एकत्र येण्याची ही भावना आजच्या बैठकीत प्रतीत होईल अशी आशा मी करतो.जी-20 च्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
March 02nd, 09:37 am
जी-20 समूह सदस्यांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले.भारताच्या अध्यक्षतेखालील G20 देशातील अर्थमंत्री आणि सेंट्रल बँक गव्हर्नर यांच्या पहिल्या बैठकीदरम्यान पंतप्रधानांच्या व्हिडिओ संदेशाचा मजकूर
February 24th, 09:25 am
मी जी 20 अर्थमंत्र्यांचे आणि सेंट्रल बँकेच्या गव्हर्नरांचे भारतात स्वागत करतो. तुमची बैठक ही भारताच्या जी 20 अध्यक्षतेखालील मंत्री-स्तरीय संवादाची पहिलीच बैठक आहे. फलदायी बैठकीसाठी तुम्हाला माझ्या शुभेच्छा देत असताना तुमच्यासमोर असलेल्या आव्हानांची मला जाणीव आहे. जग गंभीर आर्थिक अडचणींना तोंड देत असताना तुम्ही जागतिक वित्त आणि अर्थव्यवस्थेच्या नेतृत्वाचे प्रतिनिधित्व करता. कोविड साथीच्या रोगाने जागतिक अर्थव्यवस्थेला या शतकात न भूतो न भविष्यती असा धक्का दिला आहे. अनेक देश, विशेषत: विकसनशील अर्थव्यवस्था, अजूनही त्याच्या परिणामांचा सामना करत आहेत. आपण जगाच्या विविध भागांमध्ये वाढत्या भौगोलिक - राजकीय तणावाचे साक्षीदार आहोत. जागतिक पुरवठा साखळीत अनेक व्यत्यय येत आहेत. दरवाढीमुळे अनेक समुदाय त्रस्त आहेत. आणि, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा ही जगभरातील प्रमुख चिंता बनली आहे. अनेक देशांची आर्थिक व्यवहार्यता देखील अनिश्चित कर्ज पातळीमुळे धोक्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांवरील विश्वास देखील उडाला आहे. ते स्वतःमध्ये सुधारणा करण्यात खुपच धीमे आहेत, काही अंशी हे देखील याचे कारण आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत स्थिरता, आत्मविश्वास आणि वृद्धी परत आणणे हे आता जगातील आघाडीच्या अर्थव्यवस्था आणि चलन प्रणालींचे संरक्षक असलेल्या तुमच्यावर अवलंबून आहे. हे काही सोपे काम नाही.भारताच्या जी-20 अध्यक्षतेखालील अर्थमंत्री आणि सेंट्रल बँकेच्या गव्हर्नरांच्या पहिल्या बैठकीला पंतप्रधानांनी केले संबोधित.
February 24th, 09:15 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ संदेशाद्वारे भारताच्या जी 20 अध्यक्षपदाखालील देशातील अर्थमंत्री आणि सेंट्रल बँक गव्हर्नर यांच्या पहिल्या बैठकीला संबोधित केले.जी-20 शिखर परिषदेत, भारताच्या नेतृत्वासंदर्भातले बोधचिन्ह, संकल्पना आणि संकेतस्थळाचे उद्घाटन करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
November 08th, 07:31 pm
जी-20 हा अशा देशांचा समूह आहे, ज्याचे आर्थिक सामर्थ्य जगातील एकूण सकल उत्पादनापैकी 85 टक्के सकल उत्पादनाचे प्रतिनिधित्व करतो. जी-20 अशा 20 देशांचा समूह आहे, ज्यात जगातील 75 टक्के व्यापाराचे प्रतिनिधित्व केले जाते. जी-20 अशा 20 देशांचा समूह आहे, ज्यात जगातील दोन तृतीयांश लोकवस्ती आहे. आणि आता यावर्षी भारत या जी-20 समूहाचे नेतृत्व करणार आहे, त्याचे अध्यक्षपद भूषवणार आहे.पंतप्रधानांनी भारताच्या जी -20 अध्यक्षपदाचे बोधचिन्ह, संकल्पना आणि संकेतस्थळाचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केले अनावरण
November 08th, 04:29 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे भारताच्या जी -20 अध्यक्षपदाच्या बोधचिन्ह, संकल्पना आणि संकेतस्थळाचे अनावरण केले.