माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त, 25 डिसेंबर रोजी मध्य प्रदेशात केन-बेतवा नदी जोड राष्ट्रीय प्रकल्पाची पंतप्रधान करणार पायाभरणी

December 24th, 11:46 am

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 डिसेंबर रोजी मध्यप्रदेशला भेट देणार आहेत. पंतप्रधान दुपारी 12:30 वाजता खजुराहो मधील अनेक विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी यावेळी करणार आहेत.