कोलकातामधील नूतनीकरण करण्यात आलेल्या चार वारसा इमारतींच्या लोकार्पण प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 11th, 05:31 pm
आज तुमच्याबरोबर असताना, या सर्व गोष्टींकडे पाहत होतो तेव्हा मन त्या भावनांनी भरून गेले होते. आणि हे प्रदर्शन, असे वाटत होते जणू काही ते क्षण मी स्वतः जगत आहे , जे त्या महान चित्रकारांनी, कलाकारांनी , रंगकारानी रचले आहेत, जगले आहेत. बांग्ला भूमीची, बंगालच्या मातीची ही अद्भुत शक्ति, आकर्षित करणारा सुगंध यांना वंदन करण्याची ही मला संधी आहे. याच्याशी निगडित भूतकाळातील आणि वर्तमानातील सर्वांना मी आदरांजली अर्पण करतो.पंतप्रधानांनी कोलकाता मधील चार पुनर्विकसित वारसा इमारती राष्ट्राला केल्या समर्पित
January 11th, 05:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोलकातामधील चार पुनर्विकसित इमारती राष्ट्राला समर्पित केल्या. यामध्ये ओल्ड करंसी इमारत, बेलवेडियर हाउस, विक्टोरिया मेमोरियल हॉल आणि मेटकाफ हाउस यांचा समावेश आहे.