जर तुम्ही 10 तास काम केले तर मी 18 तास काम करेन आणि ही मोदींची 140 कोटी भारतीयांना गॅरंटी आहे : पंतप्रधान मोदी प्रतापगढ येथे
May 16th, 11:28 am
उत्तर प्रदेशातील प्रतापगढ येथील सभेत पंतप्रधान मोदींनी यापूर्वीच्या INDI आघाडीच्या कारभारावर टीका करत त्यांचे अनेक गोष्टींतील अपयश अधोरेखित केले. आपल्या सरकारने जागतिक स्तरावर तिसरे स्थान मिळवण्याचे लक्ष्य ठेवून भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यात साध्य केलेले यश स्पष्ट केले. त्यांनी काँग्रेस आणि सपा यांच्या विकासाबाबतच्या उदासीन वृत्तीवर टीका केली, मेहनत न करता प्रगती होते या त्यांच्या मतावर त्यांनी उपरोधिकपणे टीका केली. ते पुढे म्हणाले, देशाचा आपसूकच विकास होईल, त्यासाठी कष्ट करण्याची काय गरज आहे?, असे सपा आणि काँग्रेसला वाटते, सपा आणि काँग्रेसच्या मानसिकतेचे दोन पैलू आहेत, हे आपसूकच होत राहील आणि याचा उपयोग काय? असे ते म्हणतातभदोहीमध्ये काँग्रेस-सपा विजयी होण्याची सुतराम शक्यता नाही: पंतप्रधान मोदी यूपीच्या भदोही येथील सभेत
May 16th, 11:14 am
उत्तर प्रदेशातील भदोही येथे जाहीर सभेला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले, भदोहीमधील निवडणुकीची आज राज्यभर चर्चा होत आहे. लोक विचारत आहेत की, भदोहीमध्ये ही टीएमसी अचानक कुठून आली? याआधी यूपीमध्ये काँग्रेसचे अस्तित्व नव्हते, आणि या निवडणुकीत आपल्यासाठी काहीच आशा उरलेली नाही हे सपाने देखील मान्य केले आहे, म्हणूनच त्यांनी भदोहीच्या रिंगणातून पळ काढला आहे , भदोहीमध्ये सपा आणि काँग्रेसला आपली अनामत रक्कम वाचवणे देखील कठीण झाले, म्हणून ते भदोहीमध्ये हा राजकीय प्रयोग करत आहेत.उत्तर प्रदेशातील लालगंज, जौनपूर, भदोही आणि प्रतापगढ येथे पंतप्रधान मोदींच्या जोरदार प्रचार सभा
May 16th, 11:00 am
लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्र्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूपीमध्ये लालगंज, जौनपूर, भदोही आणि प्रतापगढ येथे घेतलेल्या निवडणूक रॅलींमध्ये उत्साही आणि उत्स्फूर्तपणे जमलेल्या जनसमुदायाला संबोधित केले. ते म्हणाले, मोदींना लोकांचा पाठिंबा आणि आशीर्वाद मिळत असल्याचे जगाला दिसत आहे. 'फिर एक बार मोदी सरकार' येणार याची जगाला खात्री पटली आहे, असेही ते पुढे म्हणाले .