डॉ. हरेकृष्ण महताब यांनी लिहिलेल्या ‘ओडिशा इतिहास’ या पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

April 09th, 12:18 pm

कार्यक्रमाला माझ्याबरोबर उपस्थित असलेले लोकसभेतले केवळ खासदारच नाही तर संसदीय जीवनामध्ये एक उत्तम खासदार कशा पद्धतीने काम करू शकतो, याचे आदर्श उदाहरण ज्यांना म्हणता येईल असे भाई भर्तृहरी महताब जी, धर्मेंद्र प्रधान जी, इतर वरिष्ठ मान्यवर, देवी आणि सज्जन हो! मला ‘ उत्कल केसरी’ हरेकृष्ण महताब यांच्याशी संबंधित असलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळतेय, हा माझ्यासाठी आनंदाचा विषय आहे. जवळपास दीड वर्षांपूर्वी आम्ही सर्वांनी ‘उत्कल केसरी’ हरेकृष्ण महताब जी यांची 120 वी जयंती आम्ही अतिशय प्रेरणादायी संधी म्हणून साजरी केली होती. आज आपण त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ ‘ओडिशा इतिहास’ याची हिंदी आवृत्ती लोकार्पण करीत आहोत. ओडिशाचा व्यापक आणि विविधतेने नटलेला इतिहास देशातल्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, हे काम करणे खूप आवश्यक आहे.ऊडिया आणि इंग्रजी यांच्यानंतर आता हिंदी आवृत्तीच्या माध्यमातून आपण ही आवश्यकता पूर्ण केली आहे. या नाविन्यपूर्ण प्रयत्नासाठी भाई भर्तृहरी महताब यांना, हरेकृष्ण महताब प्रतिष्ठानला आणि विशेषत्वाने शंकरलाल पुरोहित यांना त्यांनी केलेल्या या कार्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो.

डॉ. हरेकृष्ण महताब यांच्या ‘ओदिशा इतिहास’ च्या हिंदी आवृत्तीचे पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन

April 09th, 12:17 pm

‘उत्कल केसरी’ डॉ हरेकृष्ण महताब यांनी लिहिलेल्या ‘ओदिशा इतिहास’ या पुस्तकाच्या हिंदी अनुवादाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रकाशन केले. ओडिया आणि इंग्लिश भाषेत उपलब्ध असलेल्या या पुस्तकाचा हिंदी अनुवाद शंकरलाल पुरोहित यांनी केला आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि कटक लोकसभा मतदारसंघाचे खासदार भर्तृहरी महताब यावेळी उपस्थित होते.

पंतप्रधान 9 एप्रिल 2021 रोजी डॉ. हरेकृष्ण महताब यांच्या ओदिशा इतिहासची हिंदी आवृत्ती प्रकाशित करणार

April 07th, 01:56 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 एप्रिल 2021 रोजी दुपारी 12 वाजता आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र, जनपथ, नवी दिल्ली येथून ‘उत्कल केसरी’ डॉ. हरेकृष्ण महताब यांनी लिहिलेल्या ‘ओदिशा इतिहास’ पुस्तकाचा हिंदी अनुवाद प्रकाशित करतील. ओडिया आणि इंग्रजी भाषेत आतापर्यंत उपलब्ध असलेल्या या पुस्तकाचे हिंदी भाषांतर शंकरलाल पुरोहित यांनी केले आहे . केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि भर्तृहरी महताब खासदार (लोकसभा ), कटक हे या वेळी उपस्थित राहणार आहेत. हिंदी आवृत्ती प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन हरेकृष्ण महताब फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.