पंतप्रधान 7 सप्टेंबर रोजी शिक्षक पर्वच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करणार
September 05th, 02:32 pm
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 7 सप्टेंबर, 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून शिक्षक पर्वच्या उद्घाटन कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान ते शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रमुख उपक्रमांचाही प्रारंभ करतील. भारतीय सांकेतिक भाषा शब्दकोश (श्रवणदोष असलेल्यांसाठी ध्वनी आणि मजकूर अंतर्भूत असलेली सांकेतिक भाषा चित्रफीत ,शिकण्याच्या सार्वत्रिक रचनेच्या अनुरूप), बोलणारी पुस्तके (दृष्टिहीनांसाठी ध्वनी पुस्तके), सीबीएसईचा शालेय गुणवत्ता हमी आणि मूल्यांकन आराखडा ,निपुण भारत आणि विद्यांजली पोर्टलसाठी निष्ठा (NISHTHA) शिक्षकांचा प्रशिक्षण कार्यक्रम (शालेय विकासासाठी शिक्षण स्वयंसेवक/ देणगीदार/ सामाजिक उत्तरदायित्व योगदान देणाऱ्यांच्या सोयीसाठी) आदींचे पंतप्रधान उद्घाटन करतील. गुणवत्ता आणि शाश्वत शाळा: भारतातील शाळांमधील शिक्षण ही 'शिक्षक पर्व -2021' ची संकल्पना आहे. सर्व स्तरांवर केवळ शिक्षणाच्या सातत्यासह देशभरातील शाळांमध्ये गुणवत्ता, सर्वसमावेशक पद्धती आणि शाश्वत सुधारणा सुनिश्चित करण्यासाठी नाविन्यपूर्ण पद्धतींना हा शिक्षण पर्व उत्सव प्रोत्साहन देईल . या कार्यक्रमाला केंद्रीय शिक्षण मंत्री आणि केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री देखील उपस्थित राहतील.