केरळमधील वायनाड येथील भूस्खलनग्रस्त भागांना भेट दिल्यानंतर पंतप्रधानांनी व्यक्त केलेल्या भावना
August 10th, 07:40 pm
आदरणीय मुख्यमंत्री महोदय, राज्यपाल महोदय, केंद्र सरकारमधील माझे सहकारी मंत्री आणि या भूमीचे पुत्र सुरेश गोपी जी! जेव्हापासून मी या आपत्तीबद्दल ऐकले आहे, तेव्हापासून मी भागासोबत सातत्याने संपर्कात आहे. मी प्रत्येक क्षणा-क्षणाची माहिती घेत आहे आणि या परिस्थितीत मदत करू शकणारे केंद्र सरकारचे जे काही घटक आहेत ते सर्व या स्थितीत मदतगार बनू शकतील त्या सर्वांनी ताबडतोब एकत्र यावे आणि या भीषण आपत्तीत या समस्येने वेढलेल्या आपल्या कुटुंबातील सदस्यांना आपण सर्वांनी त्वरित तातडीने मदत करावी.केंद्र सरकार वायनाड येथील भूस्खलनग्रस्तांच्या पाठीशी असून, त्यांच्या मदतकार्यात कोणतीही कसर ठेवली जाणार नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आश्वासन
August 10th, 07:36 pm
केंद्र सरकार वायनाड येथील भूस्खलनग्रस्तांच्या पाठीशी असून, त्यांच्या मदतकार्यात कोणतीही कसर ठेवली जाणार नाही असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. मदत आणि बचाव कार्यात केंद्र सरकार राज्य सरकारला सर्वतोपरी सहाय्य करेल, असे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी आज केरळमध्ये वायनाड येथील भूस्खलनग्रस्त भागाची हवाई पाहणी केल्यानंतर आपत्तीग्रस्त भागांना भेट दिली आणि पाहणी केली.पंतप्रधानांनी बालकांसोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण
August 30th, 04:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या निवासस्थानी, 7, लोककल्याण मार्ग येथे बालकांसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला.2022-23 ते 2025-26 या आर्थिक वर्षांसाठी 4800 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीसह “व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम” या केंद्र पुरस्कृत योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी
February 15th, 03:51 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 2022-23 ते 2025-26 या आर्थिक वर्षांसाठी 4800 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीसह “व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम” या केंद्र पुरस्कृत योजनेला मंजुरी दिली आहे.10 सप्टेंबर रोजी पंतप्रधान 'केंद्र-राज्य विज्ञान परिषदे'चे करणार उदघाटन
September 09th, 12:30 pm
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी उद्या दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता केंद्र-राज्य विज्ञान परिषदेचे उदघाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करणार आहेत. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.