18 व्या लोकसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर लोकसभेत पंतप्रधानांनी केलेले भाषण

June 26th, 11:30 am

या सदनाचे हे सौभाग्य आहे की आपण दुसऱ्यांदा या आसनावर विराजमान होत आहात. आपले आणि या संपूर्ण सदनाचे मी खूप खूप अभिनंदन करतो.

लोकसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर पंतप्रधानांनी लोकसभेत केले संबोधन

June 26th, 11:26 am

लोकसभेच्या अध्यक्षपदी श्री ओम बिर्ला यांची सदनाने निवड केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेला संबोधित केले.

17 व्या लोकसभेच्या शेवटच्या बैठकीत पंतप्रधानांनी केलेले संबोधन

February 10th, 04:59 pm

आजचा हा दिवस लोकशाहीच्या महान परंपरेचा महत्वाचा दिवस आहे.सतराव्या लोकसभेने पाच वर्षे देश सेवेत ज्या प्रकारे अनेक विविध महत्वपूर्ण निर्णय घेतले, अनेक आव्हानांना सर्वांनी आपल्या सामर्थ्याने देशाला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न केला,एका प्रकारे आजचा हा दिवस आपणा सर्वांचा हा पाच वर्षांचा वैचारिक प्रवास, राष्ट्राला समर्पित तो काळ, देशाला पुन्हा एकदा आपले संकल्प राष्ट्र चरणी समर्पित करण्याची ही संधी आहे. ही पाच वर्षे देशात रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म,हे फार क्वचितच घडते.सुधारणाही होतात,कामगिरीही होते आणि परिवर्तन होताना आपण स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहतो,एक नवा विश्वास निर्माण होतो. हे सतराव्या लोकसभेद्वारे देश अनुभवत आहे.मला विश्वास आहे की देश सतराव्या लोकसभेला नक्कीच आशीर्वाद देत राहील. या सर्व प्रक्रियेत सदनाच्या सर्व माननीय सदस्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. सर्व माननीय सदस्यांच्या या चमूचा नेता या नात्यानेही आणि आपणा सर्वांचा एक सहकारी या नात्यानेही मी आपणा सर्वांचे अभिनंदन करतो.

17 व्या लोकसभेच्या शेवटच्या बैठकीला पंतप्रधानांनी केले संबोधित

February 10th, 04:54 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सभागृहाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, आजचा हा प्रसंग भारताच्या लोकशाहीसाठी महत्त्वपूर्ण आहे. पंतप्रधान मोदी यांनी 17 व्या लोकसभेच्या सर्व सदस्यांनी महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आणि देशाला दिशा देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. ते म्हणाले की, आजचा दिवस हा वैचारिक प्रवास आणि हा काळ राष्ट्राच्या उन्नतीसाठी समर्पित करण्याचा एक विशेष प्रसंग आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात ' 'रीफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म' ' हा मंत्र राहिला आहे आणि आज संपूर्ण देश ते अनुभवत असल्याचे ते म्हणाले. 17 व्या लोकसभेत करण्यात आलेल्या प्रयत्नांना भारतातील जनता यापुढेही आशीर्वाद देत राहील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. सभागृहातील सर्व सदस्यांचे योगदान अधोरेखित करत मोदी यांनी त्यांच्याप्रती विशेषतः अध्यक्षांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. पंतप्रधानांनी सभापतींचे आभार मानले आणि सभागृहाचे कामकाज हसतमुखाने , संतुलित आणि निष्पक्ष पद्धतीने हाताळल्याबद्दल त्यांची प्रशंसा केली.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 31st, 10:45 am

या नव्या संसद भवनात जे पहिले अधिवेशन झाले होते, त्याच्या शेवटच्या दिवसात या संसदेने एक मोठा गौरवशाली निर्णय घेतला होता, आणि तो निर्णय होता - नारी शक्ती वंदन कायदा. आणि त्यानंतर 26 जानेवारीला देखील आपण पाहिले, कशाप्रकारे देशाने कर्तव्यपथावर नारी शक्ती सामर्थ्याचा, नारी शक्तीच्या शौर्याचा, नारी शक्तीच्या संकल्पाच्या शक्तीचा अनुभव घेतला. आणि आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे तेव्हा राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांचे मार्गदर्शन आणि उद्या निर्मला सीतारामन जी यांच्याद्वारे हंगामी अर्थसंकल्प सादर केला जाणे, हा एक प्रकारे नारीशक्तीच्या साक्षात्काराचाच पर्व आहे.

संसदेच्या अधिवेशनापूर्वी पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांसमोर केलेले निवेदन

January 31st, 10:30 am

यावेळी बोलताना पंतप्रधानांनी संसदेच्या नवीन इमारतीत झालेल्या पहिल्या अधिवेशनाचे स्मरण केले आणि या पहिल्या अधिवेशनात घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांवर प्रकाश टाकला. महिला सक्षमीकरणाचा नारीशक्ती वंदन कायदा संमत होणे हा आपल्या देशासाठी एक महत्त्वाचा क्षण आहे.” असे मोदी म्हणाले. 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचा संदर्भ देत त्यांनी, नारी शक्तीचे सामर्थ्य, शौर्य आणि दृढनिर्धार याची अनुभूती देशाने घेतली आहे असे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाचे आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अंतरिम अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले आणि त्याचे महिला सक्षमीकरणाचा उत्सव असे वर्णन केले.

तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे पायाभरणी आणि विकास कामांचे उद्घाटन करतानाचे पंतप्रधानांचे भाषण

January 02nd, 12:30 pm

तामीळनाडूचे राज्यपाल श्री. आर. एन. रवीजी, मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिनजी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, ज्योतिरादित्य सिंधिया जी आणि या मातीतील माझे सहकारी, एल. मुरुगन जी, तामीळनाडू सरकारमधील मंत्री, खासदार आणि आमदार, आणि तामीळनाडूतील माझ्या कुटुंबियांनो!

पंतप्रधानांच्या हस्ते तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे 20,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी

January 02nd, 12:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे 20,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी केली. विकास प्रकल्पांमध्ये तामिळनाडूमधील रेल्वे, रस्ते, तेल आणि वायू आणि जहाजबांधणी क्षेत्रांचा समावेश आहे.

काशी तामिळ संगमम 2.0 च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

December 17th, 06:40 pm

व्यासपीठावरील उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, काशी आणि तामिळनाडू येथील विद्वान, तामिळनाडू येथून माझ्या काशी मध्ये आलेले बंधू आणि भगिनी, इतर सर्व सन्माननीय व्यक्ती, महिला आणि पुरुष, आपण सर्वजण शेकडो किलोमीटरचा प्रवास करून एवढ्या मोठ्या संख्येने काशी येथे आले आहात. काशीमध्ये तुम्ही सर्वजण पाहुणे म्हणून नव्हे, तर माझ्या कुटुंबातील सदस्य म्हणून आले आहात. काशी-तमिळ संगमम मध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो.

पंतप्रधानांनी काशी तमिळ संगमम् 2023 चे केले उद्घाटन

December 17th, 06:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे काशी तमिळ संगमम् 2023 चे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी या कार्यक्रमात कन्याकुमारी – वाराणसी तमिळ संगमम् रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला तसेच थिरुक्कुरल, मनिमेकलाई आणि इतर उत्कृष्ट तमिळ साहित्याचे विविध भाषेतील तसेच ब्रेल लिपीतील अनुवादाचे लोकार्पणही केले. पंतप्रधानांनी कार्यक्रमस्थळी भरवलेल्या प्रदर्शनात फेरफटका मारला आणि सांस्कृतिक कार्यक्रमही पाहिला. देशातील दोन सर्वात महत्त्वाची आणि शिक्षणाची प्राचीन ठिकाणे असलेल्या तामिळनाडू आणि काशी यांच्यातील जुने दुवे पुन्हा शोधणे, त्या दुव्यांची पुष्टी करणे आणि त्यांचा उत्सव साजरा करणे हे काशी तमिळ संगमम् चे उद्दिष्ट आहे.

संसदेचे हिवाळी सत्र सुरु होण्याआधी पंतप्रधानांनी माध्यमांना दिलेले निवेदन

December 04th, 11:56 am

जे देशातील सामान्य जनतेच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहेत, देशाच्या उज्ज्वल भविष्याप्रती समर्पित आहेत त्यांच्यासाठी हे निकाल उत्साहवर्धक आहेत. विशेषतः, संपूर्ण समाजातील सर्व घटकांतील शहरी आणि ग्रामीण भागांतील महिला, समाजाच्या सर्व स्तरांतील शहरी तसेच ग्रामीण युवक, प्रत्येक समुदायातील शेतकरी, तसेच माझ्या देशातील गरीब जनता, हे असे चार महत्त्वपूर्ण घटक आहेत ज्यांना सक्षम करणाऱ्या, त्यांचे भविष्य सुनिश्चित करणाऱ्या ठोस योजना तयार करणे आणि या योजनांच्या लाभांचे प्रत्येक व्यक्तीपर्यंत वितरण होईल याची खात्री करणे या तत्वांसाठी जे तत्पर राहतात त्यांना समाजाचा भरपूर पाठींबा मिळत जातो. आणि जेव्हा उत्तम प्रशासन व्यवस्था असते, जन हिताला संपूर्णपणे पाठबळ मिळालेले असते तेव्हा सत्ताविरोधी हा शब्दच अप्रस्तुत होऊन जातो. आम्ही हे सतत पाहतो आहोत, कोणी याला सत्तेच्या बाजूचे म्हणो, कोणी उत्तम प्रशासन म्हणो, कोणी पारदर्शकता म्हणो, तर कोणी याला देशहिताच्या, जनहिताच्या ठोस योजना म्हणो, पण सतत हा अनुभव येतो आहे. आणि इतक्या उत्तम जनादेशानंतर आज आपण संसदेच्या या नव्या मंदिरात भेटतो आहोत.

Congress does not have development roadmap for Madhya Pradesh: PM Modi

November 09th, 11:26 am

The political landscape in Madhya Pradesh is buzzing as Prime Minister Narendra Modi takes centre-stage ahead of the assembly election. Today, the PM addressed a huge public gathering in Satna. PM Modi said, “Your one vote has done such wonders that the courage of the country’s enemies has shattered. Your one vote is going to form the BJP government here again. Your one vote will strengthen Modi in Delhi.”

PM Modi addresses public meetings in Madhya Pradesh’s Satna, Chhatarpur & Neemuch

November 09th, 11:00 am

The political landscape in Madhya Pradesh is buzzing as Prime Minister Narendra Modi takes centre-stage with his numerous campaign rallies ahead of the assembly election. Today, the PM addressed huge public gatherings in Satna, Chhatarpur & Neemuch. PM Modi said, “Your one vote has done such wonders that the courage of the country’s enemies has shattered. Your one vote is going to form the BJP government here again. Your one vote will strengthen Modi in Delhi.”

The soil of India creates an affinity for the soul towards spirituality: PM Modi

October 31st, 09:23 pm

PM Modi participated in the programme marking the culmination of Meri Maati Mera Desh campaign’s Amrit Kalash Yatra at Kartavya Path in New Delhi. Addressing the gathering, PM Modi said, Dandi March reignited the flame of independence while Amrit Kaal is turning out to be the resolution of the 75-year-old journey of India’s development journey.” He underlined that the 2 year long celebrations of Azadi Ka Amrit Mahotsav are coming to a conclusion with the ‘Meri Maati Mera Desh’ Abhiyan.

PM participates in program marking culmination of Meri Maati Mera Desh campaign’s Amrit Kalash Yatra

October 31st, 05:27 pm

PM Modi participated in the programme marking the culmination of Meri Maati Mera Desh campaign’s Amrit Kalash Yatra at Kartavya Path in New Delhi. Addressing the gathering, PM Modi said, Dandi March reignited the flame of independence while Amrit Kaal is turning out to be the resolution of the 75-year-old journey of India’s development journey.” He underlined that the 2 year long celebrations of Azadi Ka Amrit Mahotsav are coming to a conclusion with the ‘Meri Maati Mera Desh’ Abhiyan.

द्वारका, दिल्ली येथे विजयादशमी सोहळ्यात पंतप्रधानांनी केलेले भाषण

October 24th, 06:32 pm

मी सर्व भारतीयांना शक्तीपूजनाच्या नवरात्रीच्या आणि विजय पर्व असलेल्या विजयादशमी सणाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. विजयादशमीचा हा सण अन्यायावर न्यायाचा विजय , अहंकारावर नम्रतेचा विजय आणि क्रोधावर संयमाच्या विजयाचा सण आहे. अत्याचारी रावणावर प्रभू श्रीरामाच्या विजयाचा हा सण आहे. या भावनेने आपण दरवर्षी रावण दहन करतो. पण हे इतके पुरेसे नाही. हा सण आपल्यासाठी संकल्पांचाही सण आहे, आपल्या संकल्पांची पुनरावृत्ती करण्याचाही सण आहे.

दिल्लीत द्वारका इथे आयोजित विजयादशमी सोहळ्याला पंतप्रधानांनी केले संबोधित

October 24th, 06:31 pm

या सोहळ्याला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की विजयादशमी हा सण अन्यायावर न्यायाच्या, अहंकारावर मानवतेच्या, क्रोधावर संयमाने मिळवलेल्या विजयाचा सण आहे. हा दिवस आपण घेतलेल्या शपथा, आपण केलेले संकल्प यांना नवीन झळाळी देण्याचा सुद्धा आहे असे ते म्हणाले.

नवी दिल्लीत आयोजित नवव्या जी-20 संसदीय अध्यक्ष शिखर परिषदेच्या उद्घाटन वेळी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद

October 13th, 11:22 am

भारतात सध्याचा हा काळ उत्सवांचा हंगाम असतो. या दिवसांमध्ये संपूर्ण भारतात खूप मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरे केले जातात. मात्र जी-20 ने यावेळेस हे उत्सवी वातावरण आणि त्याचा उत्साह संपूर्ण वर्षभर निर्माण केला. आम्ही पूर्ण वर्षभर जी-20 च्या प्रतिनिधींचे भारताच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये आतिथ्य केले आहे. यामुळे या शहरांमध्ये कायम उत्सवी वातावरण टिकून राहिले. त्यानंतर भारताने चंद्रावर स्वारी केली. यामुळे संपूर्ण देशात आनंदाचे आणखी उधाण आले. त्यानंतर, आम्ही इथे दिल्लीतच जी-20 शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन केले. आणि आता ही पी-20 शिखर परिषद इथे होत आहे. कोणत्याही देशाची सर्वात मोठी ताकद ही तेथील नागरिक, या नागरिकांची इच्छाशक्ती असते. आज ही परिषद, लोकांसाठी, ही ताकद देखील साजरी करण्याचे एक माध्यम बनले आहे.

पंतप्रधानांनी केले 9व्या जी20 संसदीय अध्यक्षांच्या शिखर परिषदेचे (पी20) उद्घाटन

October 13th, 11:06 am

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी जी20 संसदीय अध्यक्षांच्या शिखर परिषदेतील मान्यवरांचे 140 कोटी जनतेच्या वतीने स्वागत केले. “ही शिखर परिषद जगभरातील सर्व संसदीय पद्धतींचा महाकुंभ आहे, असे पंतप्रधान म्हणाले. विविध देशातील संसदीय चौकटींचा अनुभव असलेले सर्व प्रतिनिधी येथे उपस्थित असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आजच्या कार्यक्रमाबद्दल मोदी यांनी अतिशय समाधान व्यक्त केले.

जी 20 विद्यापीठ कनेक्ट फिनालेमध्ये पंतप्रधानांनी केले भाषण

September 26th, 04:12 pm

दोन आठवड्यांपूर्वी याच भारत मंडपमध्ये जोरदार घडामोडी घडत होत्या. हे भारत मंडपम एकदम ‘हॅपनिंग’ ठिकाण होते आणि मला आनंद आहे की आज माझा भावी भारत त्याच भारत मंडपमध्ये उपस्थित आहे. जी-20 च्या आयोजनाला भारताने ज्या उंचीवर नेले आहे ते पाहून जग आश्चर्यचकित झाले आहे.पण तुम्हाला माहीत आहे की , मी अजिबात थक्क नाही ,मला अजिबात आश्चर्य वाटले नाही.कदाचित तुमच्या मनात असेल की इतके मोठे आयोजन झाले तुम्ही खुश नाही , काय कारण आहे ? माहीत आहे का ? कारण कार्यक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी तुमच्यासारखे तरुण विद्यार्थी घेतात , तरुणाईचा यात सहभाग असेल तर तो यशस्वी होणार हे निश्चित असते. .