विकसित भारत विकसित पश्चिम बंगाल' कार्यक्रमात सिलीगुडी इथे पंतप्रधानांनी केलेले भाषण
March 09th, 04:10 pm
नैसर्गिक सौंदर्य आणि चहासाठी प्रसिद्ध असलेल्या उत्तर बंगालच्या या भूमीला भेट देताना मला खूप आनंद होत आहे. आज येथे हजारो कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी झाली. विकसित बंगालच्या दिशेने हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. या विकासकामांसाठी मी बंगाल आणि उत्तर बंगालमधील जनतेचे अभिनंदन करतो.पंतप्रधानांनी पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे ‘विकसित भारत विकसित पश्चिम बंगाल’ कार्यक्रमाला केले संबोधित
March 09th, 03:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे ‘विकसित भारत विकसित पश्चिम बंगाल’ कार्यक्रमाला संबोधित केले. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये 4500 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या रेल्वे आणि रस्ते क्षेत्रातील विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले.आसामच्या पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मे रोजी दाखवणार हिरवा झेंडा
May 28th, 05:35 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आसामच्या पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेस या रेल्वेगाडीला 29 मे रोजी दुपारी 12 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवणार आहेत.हावडा आणि न्यू जलपायगुडीला जोडणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना करताना आणि कोलकाता मेट्रोच्या पर्पल लाईनवरील जोका- तराताला पट्ट्याच्या उदघाटन प्रसंगी पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केलेले भाषण
December 30th, 11:50 am
आज मला तुम्हा सर्वांना प्रत्यक्ष भेटायचे होते, मात्र माझ्या खासगी कारणास्तव मी तुमच्यामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहू शकलो नाही, यासाठी मी तुमची, बंगालची माफी मागतो. बंगालच्या पुण्य भूमीला, कोलकाताच्या ऐतिहासिक भूमीला वंदन करण्याची आज मला संधी आहे. बंगालच्या कणा-कणांमध्ये स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास समाहित आहे. ज्या भूमीवरून वंदे मातरमचा जयघोष झाला, त्या भूमीवर आज वंदे भारत गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. आज 30 डिसेंबर तारखेलाही इतिहासात खूप महत्व आहे. 30 डिसेंबर, 1943, या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमान बेटावर तिरंगा ध्वज फडकवला आणि भारताच्या स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले होते.PM flags off Vande Bharat Express connecting Howrah to New Jalpaiguri via video conferencing
December 30th, 11:25 am
PM Modi flagged off the Vande Bharat Express, connecting Howrah to New Jalpaiguri as well as inaugurated other metro and railway projects in West Bengal via video conferencing. The PM linked reforms and development of Indian Railways with the development of the country. He said that the central government was making record investments in the modern railway infrastructure.पंतप्रधान 30 डिसेंबर रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर
December 29th, 12:35 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबर 2022 रोजी पश्चिम बंगालला भेट देतील. सकाळी 11:15 वाजता पंतप्रधान हावडा रेल्वे स्थानकावर पोहोचतील. तिथे हावडा ते न्यू जलपाईगुडीला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला ते हिरवा झेंडा दाखवतील. कोलकाता मेट्रोच्या पर्पल लाईनच्या जोका-तरताला मार्गाचे उद्घाटनही करतील आणि विविध रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी करुन ते राष्ट्राला समर्पित करतील. पंतप्रधान, दुपारी 12 वाजता, आयएनएस नेताजी सुभाष येथे पोहोचतील. तिथे ते नेताजी सुभाष यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करतील नंतर डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी – राष्ट्रीय जल आणि स्वच्छता संस्थेचे (डीएसपीएम – एनआयडब्लूएएस) उद्घाटन करतील. राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियाना अंतर्गत ते पश्चिम बंगालमधील सांडपाणी वाहून नेणाऱ्या अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी करुन ते राष्ट्राला समर्पित करतील. दुपारी 12:25 च्या सुमारास पंतप्रधान राष्ट्रीय गंगा परिषदेच्या दुसऱ्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील.