नुतन भारत परिषदेला पंतप्रधानांचे संबोधन

July 16th, 08:10 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे Y4D नुतन भारत परिषदेला संबोधित केले. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, आज देश परिवर्तनाच्या प्रक्रियेतून जात आहे. एका आंतरराष्ट्रीय अहवालानुसार भारतातील दारिद्रय उल्लेखनीय कमी झाले असून भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील अत्यंत वेगवान अर्थव्यवस्था म्हणून ओळखण्यात येते. सरकारतर्फे जर कुठली भूमिका निभवायची असेल तर फक्त तरुणवर्गच अशा भूमिकांना पात्र असतो.

नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे नवीन भारत परिषदेच्या समारोप समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

July 16th, 08:10 am

मंचावर उपस्थित दालमिया भारत समूहाचे व्यवस्थापकीय संचालक भाई दालमिया, युथ फॉर डेव्हलपमेंटचे मार्गदर्शक मृत्युंजय सिंह जी , अध्यक्ष प्रफुल निगम, ग्रामीण यशस्वीता मिळवलेले चैत राम पवार, इथे उपस्थित अन्य सर्व मान्यवर आणि माझे प्रिय युवा मित्र, इथे देशभरातल्या काही उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या लोकांना सन्मानित करण्याची संधी मला लाभली आहे जे या विशेष उपक्रमाला सहकार्य करत आहेत. एक वाचनालय सुरु करण्यात आले. आणि ग्रामीण भारतासंबंधी एक श्वेतपत्रिका देखील जारी करण्यात आली आहे. तुम्ही सर्व देशाच्या गरजा ओळखून , त्या गरजांना प्राधान्य देत आपल्या कार्याची रचना करत आहात हे पाहून मला आनंद झाला आहे. तुम्ही सर्वानी आतापर्यंत जे साध्य केले आहे त्यासाठी मी तुमचे खूप-खूप अभिनंदन करतो. आणि हे प्रयत्न यशस्वी होवोत आणि निरंतर पुढे सुरु राहोत यासाठी सरकारचे सहकार्य देखील मिळेल आणि माझ्या शुभेच्छा देखील असतील.