हॉर्नबिल महोत्सवाला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले नागालँडच्या जनतेचे अभिनंदन

December 05th, 11:10 am

नागालँडमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या हॉर्नबिल महोत्सवाला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागालँडच्या जनतेचे अभिनंदन केले आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महोत्सवासाठी नागालँडवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. यंदाच्या महोत्सवात कचरा व्यवस्थापन आणि शाश्वततेच्या संकल्पनेवर भर दिला गेला असल्याबद्दलही पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आहे. काही वर्षांपूर्वी आपण या महोत्सवाला भेट दिल्याच्या आठवणींनांही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उजाळा दिला असून, इतरांनी देखील या महोत्सवाला भेट द्यावी आणि नागा संस्कृतीचे चैतन्य आणि विविधता अनुभवण्याचे आवाहन केले आहे.

नागालँडचे मुख्यमंत्री नेफियु रियो यांनी पंतप्रधानांची घेतली भेट

August 09th, 02:23 pm

नागालँडचे मुख्यमंत्री नेफियु रिओ यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

नागालँडच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

December 19th, 02:17 pm

नागालँडचे मुख्यमंत्री नेफियु रिओ यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

नागालँडच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

March 13th, 06:33 pm

नागालँडचे मुख्यमंत्री नेफियु रिओ यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधानांनी नागालँडमधील लोकांचे महत्त्वाच्या क्षेत्रातील विकास कामांसाठी केले अभिनंदन

January 07th, 04:00 pm

संपर्क सुविधा, शिक्षण, पर्यटन आणि ऊर्जा यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांतील विकासकामांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागालँडमधील लोकांचे अभिनंदन केले आहे.