पंतप्रधानांनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रात मूल्य निर्मितीचे चक्र अधिक मजबूत करण्यासाठी वैज्ञानिक समुदायाला केले आवाहन
January 04th, 03:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्यासाठी विज्ञानाच्या मूल्य-निर्मिती चक्राला प्रोत्साहन देण्यासाठी वैज्ञानिक समुदायाला प्रेरित केले. ते आज राष्ट्रीय मेट्रोलॉजी (मापनशास्त्र) परिषद 2021 मध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राष्ट्रीय अणु टाइमस्केल आणि भारतीय निर्देशक द्रव्य प्रणाली राष्ट्राला समर्पित केली आणि राष्ट्रीय पर्यावरण मानक प्रयोगशाळेची पायाभरणी केली.राष्ट्रीय मापन शास्त्र परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 04th, 11:01 am
राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेच्या हीरक महोत्सवी समारंभाच्या तुम्हा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा . आज आपले वैज्ञानिक ‘राष्ट्रीय आण्विक कालदर्शिका’ आणि ‘भारतीय निर्देशक द्राव्य प्रणाली' राष्ट्राला समर्पित करत आहेत आणि त्याचबरोबर देशाच्या पहिल्या राष्ट्रीय पर्यावरणीय मानक प्रयोगशाळेची पायाभरणी देखील झाली आहे. नव्या दशकात हे शुभारंभ, देशाचा गौरव वाढवणार आहेत.राष्ट्रीय मापन शास्त्र परिषदेच्या बैठकीत पंतप्रधानांचे उद्घाटनपर भाषण
January 04th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय मापन शास्त्र परिषद 2021 ला उद्घाटनपर भाषणाने संबोधित केले. याप्रसंगी त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे राष्ट्रीय अणु कालमापक आणि भारतीय निर्देशक द्रव्य प्रणाली राष्ट्राला अर्पण केली तसेच राष्ट्रीय पर्यावरणीय मानक प्रयोगशाळेची कोनशीला बसविली. ही परिषद नवी दिल्लीच्या सीएसआयआर-एनपीएल अर्थात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन मंडळ -राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा यांनी त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केली होती. ‘देशाच्या सर्वसमावेशक विकासासाठी मापनशास्त्र’ ही या वर्षीच्या परिषदेची संकल्पना होती. केंद्रीय मंत्री डॉ.हर्ष वर्धन आणि मुख्य शास्त्रीय सल्लागार डॉ.विजय राघवन या प्रसंगी उपस्थित होते.पंतप्रधानांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल प्राणीसंग्रहालयाचे उद्घाटन
October 30th, 06:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवडिया येथे सरदार पटेल प्राणीसंग्रहालयाचे आणि जिओडेसिक आयव्हरी पद्धतीच्या घुमटाचे उद्घाटन केले. त्यांनी केवडिया एकात्मिक विकास अंतर्गत, 17 प्रकल्प देशाला समर्पित केले आणि 4 नवीन प्रकल्पांसाठी पायाभरणी केली. या प्रकल्पांमध्ये जलपर्यटन मार्ग, न्यू गोरा ब्रिज, गरुडेश्वर बंधारा, सरकारी निवासस्थाने, बस बे टर्मिनस, एकता नर्सरी, खलवानी इको टूरिझम (पर्यावरणीय पर्यटन), आदिवासी होम स्टे यांचा समावेश आहे. त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीला एकता सागरी पर्यटन जहाज सेवेचा झेंडा दाखविला.