Experts and investors around the world are excited about India: PM Modi in Rajasthan
December 09th, 11:00 am
PM Modi inaugurated the Rising Rajasthan Global Investment Summit 2024 and Rajasthan Global Business Expo in Jaipur, highlighting India's rapid economic growth, digital advancements, and youth power. He emphasized India's rise as the 5th largest economy, doubling exports and FDI, and the transformative impact of tech-driven initiatives like UPI and DBT.PM Modi inaugurates Rising Rajasthan Global Investment Summit
December 09th, 10:34 am
PM Modi inaugurated the Rising Rajasthan Global Investment Summit 2024 and Rajasthan Global Business Expo in Jaipur, highlighting India's rapid economic growth, digital advancements, and youth power. He emphasized India's rise as the 5th largest economy, doubling exports and FDI, and the transformative impact of tech-driven initiatives like UPI and DBT.सामूहिक प्रयत्नांमुळे भारतातील वाघांची संख्या कालपरत्वे वाढत आहे : पंतप्रधान
December 03rd, 07:10 pm
वाघांच्या संवर्धनाच्या सामूहिक प्रयत्नांचे कौतुक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले की भारतातील वाघांची संख्या गेल्या काही काळात वाढत आहे. ते म्हणाले की भारतातील 57 व्या व्याघ्र प्रकल्पाची भर ही निसर्गाची काळजी घेण्याच्या आपल्या शतकानुशतकाच्या जुन्या प्रथेनुसार आहे.श्री खोडलधाम ट्रस्ट- कर्करोग रुग्णालयाच्या पायाभरणी समारंभातील पंतप्रधानांचा व्हिडिओ संदेश
January 21st, 12:00 pm
आजच्या या विशेष कार्यक्रमात खोडलधामची पावन भूमी आणि खोडल मातेच्या भक्तांचा सहवास लाभणे माझ्यासाठी परम भाग्याची बाब आहे. जनकल्याण आणि सेवा क्षेत्रात श्री खोडलधाम ट्रस्टने आज आणखी एक महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे. अमरेलीमध्ये आज पासून कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्राचे काम सुरू होत आहे. येत्या काही आठवड्यात श्री खोडलधाम ट्रस्ट-कागवड च्या स्थापनेला 14 वर्षे पूर्ण होत आहेत. तुम्हा सर्वांना या आयोजनाच्या खुप खुप शुभेच्छा.श्री खोडलधाम ट्रस्ट-कर्करोग रुग्णालयाच्या पायाभरणी समारंभाला पंतप्रधानांनी ध्वनीचित्रफित संदेशाद्वारे केले संबोधित
January 21st, 11:45 am
खोडल धामच्या पवित्र भूमीशी आणि खोडल मातेच्या भक्तांशी जोडले जाणे, हा आपला बहुमान असल्याची भावना, पंतप्रधानांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. श्री खोडलधाम ट्रस्टने अमरेली इथे कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्राची पायाभरणी करून लोक कल्याण आणि सेवेच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकल्याचे मोदी यांनी अधोरेखित केले. श्री खोडलधाम ट्रस्ट-कागवाड आपल्या स्थापनेला 14 वर्षे पूर्ण करणार असल्याचे नमूद करत त्यांनी शुभेच्छा दिल्या.देहराडून इथे उत्तराखंड ग्लोबल इन्व्हेस्टर्स शिखर परिषद 2023 च्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
December 08th, 12:00 pm
उत्तराखंड चे गव्हर्नर श्री गुरमीत सिंह जी, इथले लोकप्रिय आणि युवा मुख्यमंत्री श्री पुष्कर सिंह धायमी, सरकारमधील मंत्री, विविध देशांचे प्रतिनिधी, उद्योग जगतातील मान्यवर, बंधू आणि भगिनींनो, देवभूमी उत्तराखंड इथे येऊन मनाला धन्यता वाटते. काही वर्षांपूर्वी जेव्हा मी बाबा केदारनाथच्या दर्शनासाठी गेलो होतो, तेव्हा अचानक माझ्या तोंडातून निघालं होतं, की एकविसाव्या शतकातील हे तिसरं दशक, उत्तराखंडचे दशक आहे. आणि मला आनंद आहे, की माझ्या ह्या नळकत बोललेल्या शब्दांना प्रत्यक्षात साकार होतांना मी सातत्याने बघतो आहे. उत्तराखंडच्या या गौरवाशी आपण सगळे ही जोडले जात आहात, उत्तराखंडच्या विकासाच्या यात्रेचा भाग होण्याची एक खूप मोठी संधी आपल्याला मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी उत्तरकाशी इथे बोगद्यात अडकलेल्या आमच्या श्रमिक बांधवांना सुरक्षित काढण्यासाठी जे यशस्वी अभियान चालवले गेले, त्यासाठी मी राज्य सरकार सहित, सर्वांचे विशेष अभिनंदन करतो.पंतप्रधानांनी ‘उत्तराखंड जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषद 2023’ चे केले उद्घाटन
December 08th, 11:26 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंडमध्ये डेहराडून येथील वन संशोधन संस्थेत होत असलेल्या उत्तराखंड जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषद 2023 चे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधानांनी या प्रदर्शनाची पाहणी केली. यावेळी पंतप्रधानांनी सशक्त उत्तराखंड नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन देखील केले आणि हाऊस ऑफ हिमालयाज या ब्रँडचे उद्घाटन केले. ‘पीस टू प्रॉस्पेरिटी’(शांततेतून समृद्धीकडे) ही या शिखर परिषदेची संकल्पना आहे.अंमली पदार्थांच्या सेवनाविरुद्धच्या मोहिमेतील तरुणांचा वाढता सहभाग अतिशय उत्साहवर्धक: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
July 30th, 11:30 am
माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’मध्ये तुम्हां सर्वांचे खूप खूप स्वागत.जुलै महिना म्हणचे मान्सूनचा महिना, पावसाचा महिना. नैसर्गिक आपत्तींमुळे गेले काही दिवस चिंता आणि त्रासाने भरलेले होते.यमुनेसहअनेक नद्यांना आलेल्या पुरामुळे बऱ्याच भागांमधल्या लोकांना त्रास झाला. डोंगराळ भागात भूस्खलन होण्याच्या घटना देखील घडल्या. याच दरम्यान, काही काळापूर्वी देशाच्या पश्चिम भागात, पूर्व गुजरातच्या काही क्षेत्रामध्ये बिपरजॉय चक्रीवादळ देखील आले. पण मित्रांनो, या संकटांच्या काळात पुन्हा एकदा आपण सर्व देशवासीयांनी दाखवून दिले की, सामुहिक प्रयत्नांमध्ये किती शक्ती असते. स्थानिक लोकांनी, आपल्या एनडीआरएफच्या जवानांनी, स्थानिक प्रशासनात कार्यरत लोकांनी रात्रंदिवस झगडून अशा संकटांचा सामना केला आहे. कोणत्याही संकटातून बाहेत पडण्यासाठी आपले सामर्थ्य आणि साधनसंपत्ती यांची भूमिका फार मोठी असते – मात्र त्याबरोबरच आपली संवेदनशीलता आणि एकमेकांचा हात धरुन ठेवण्याची भावना देखील तितकीच महत्त्वाची असते. ‘सर्वजन हिताय’ ची हीच भावना भारताची ओळख देखील आहे आणि भारताची शक्ती देखील आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’(भाग 102) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
June 18th, 11:30 am
मित्रांनो, खूप लोकं सांगतात की, पंतप्रधान म्हणून मी अमुक एक चांगले काम केले आहे, एखादे मोठे काम केले आहे. ‘मन की बात’ चे कित्येक श्रोते पत्र लिहून खूप कौतुक करतात. कोणी म्हणतात हे केले, कोणी म्हणते ते काम केले, हे चांगले केले, हे अधिक चंगले केले, हे उत्कृष्ट केले परंतु, जेव्हा मी भारतातील सामान्य नागरिकांचे प्रयत्न, त्यांचे परिश्रम, त्यांची इच्छाशक्ती बघतो तेव्हा मी भारावून जातो. कोणतेही मोठे ध्येय असो, कठीणातील कठीण आव्हान असू दे, भारतीय जनतेची सामूहिक शक्ती प्रत्येक आव्हानावर तोडगा शोधून काढते. दोन-तीन दिवसांपूर्वी देशाच्या पश्चिमेकडे किती मोठे चक्रीवादळ आले हे आपण सगळ्यांनीच पाहिले. जोरदार वारा, मुसळधार पाऊस. बिपरजॉय ने कच्छमध्ये किती मोठे नुकसान केले, परंतु कच्छ मधील लोकांनी हिंमतीने आणि सतर्कतेने इतक्या धोकादायक चक्रीवादळाचा सामना केला हे खूपच अभूतपूर्व आहे. दोन दिवसांनी कच्छ मधील लोकं, त्यांचे नवीन वर्ष अर्थात आषाढ बीज साजरे करणार आहेत. आषाढ बीज, कच्छ मध्ये पावसाच्या आगमनाचे प्रतिक मानले जाते हा देखील एक संयोगच आहे. मी इतकी वर्षे कच्छला येत-जातो, तिथल्या लोकांची सेवा करण्याचे भाग्यही मला लाभले आहे आणि म्हणूनच मला कच्छच्या लोकांची हिंमत आणि उपजीविकेविषयी माहिती आहे. दोन दशकांपूर्वी झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर हा कच्छ पुन्हा कधीच सावरणार नाही, असे म्हंटले जायचे, तोच जिल्हा आज देशातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या जिल्ह्यांपैकी एक आहे. मला खात्री आहे कच्छमधील लोक बिपरजॉय चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसातून देखील त्याच वेगाने बाहेर पडतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’(100 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
April 30th, 11:31 am
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. आज मन की बातचा शंभरावा भाग आहे. मला आपल्या सर्वांची हजारो पत्रं मिळाली आहेत, लाखो संदेश आले आहेत आणि मी असा प्रयत्न केला आहे की जास्तीत जास्त पत्रे वाचेन, पाहीन आणि संदेशांना जरा समजण्याचा प्रयत्न करावा. आपली पत्रं वाचताना मी कित्येकदा तर अतिशय भावनावश झालो, भावनांनी ह्रदय उचंबळून आलं आणि भावनामध्ये वाहूनही गेलो आणि स्वतःला पुन्हा सावरलं. आपण माझं मन की बातच्या शंभराव्या भागासाठी अभिनंदन केलं आहे. परंतु मी खरोखर सांगतो की वास्तविक पहाता अभिनंदनास पात्र तर आपण सर्व मन की बातचे श्रोते आहात, आमचे देशवासी आहेत. मन की बात कोटी कोटी भारतीयांची मन की बात आहे त्यांच्या भावनांचं प्रकटीकरण आहे.आपल्या ग्रहाला अधिक उत्तमतेकडे नेणाऱ्या सर्वांच्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी वसुंधरा दिनाच्या निमित्ताने केले कौतुक
April 22nd, 09:53 am
वसुंधरा दिनाच्या आजच्या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली पृथ्वी ही अधिक चांगली राखण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत त्यांचे कौतुक केले आहे.गुवाहाटी येथे झालेल्या बिहू कार्यक्रमातील पंतप्रधानांचे भाषण
April 14th, 06:00 pm
आजचे हे दृश्य, टेलिव्हिजनवर बघणारा असो, इथे कार्यक्रमात हजर असणारे असो आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. हे अविस्मरणीय आहे, अद्भुत आहे, अभूतपूर्व आहे, हा आसाम आहे. आसमंतात घुमणारा ढोल, पेपा अरु गॉगोनाचा आवाज संपूर्ण हिंदुस्तान ऐकत आहे. आसामच्या हजारो कलाकारांची ही मेहनत, हे परिश्रम, हा समन्वय आज सगळं जग मोठ्या अभिमानाने बघत आहे. एक तर इतका मोठा क्षण आहे, उत्सव इतका मोठा आहे, दुसरं म्हणजे आपला उत्साह आणि आपली भावना याला तोड नाही. मला आठवतं, जेव्हा विधानसभा निवडणुकांच्या काळात मी इथे आलो होतो, तेव्हा म्हणालो होतो की तो दिवस दूर नाही, जेव्हा लोग A पासून Assam म्हणतील. आज खरोखरच आसाम, A-One प्रदेश बनत आहे. मी आसामच्या लोकांना, देशाच्या लोकांना बिहुच्या अनेक अनेक शुभेच्छा देतो.आसाममध्ये गुवाहाटी येथे सारुसजाई स्टेडियममध्ये पंतप्रधानांनी केली 10,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण
April 14th, 05:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममध्ये गुवाहाटी येथे सारुसजाई स्टेडियममध्ये 10,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण केले. या प्रकल्पांमध्ये पलाशभरी आणि सुआलकुची यांना जोडणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीवरील पुलाची पायाभरणी, शिवसागरमध्ये रंगघरच्या सुशोभीकरणाचा प्रकल्प यांची पायाभरणी, नामरुप येथील 500 टीपीडी मेन्थॉल प्रकल्पाचे उद्घाटन यांचा समावेश होता. यावेळी पंतप्रधानांनी दहा हजारांपेक्षा जास्त बिहू नर्तकांचा सहभाग असलेल्या बिहू नृत्याच्या रंगतदार सादरीकरणाचा देखील आनंद घेतला.नागा संस्कृती म्हणजेच गतीशीलता, शौर्य आणि निसर्गाप्रति आदर असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन
April 06th, 11:24 am
नागालँड सरकारमधील सार्वजनिक आरोग्य आणि अभियांत्रिकी विभाग (PHED) आणि सहकार मंत्री जेकब झिमोमी यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले, “G20 च्या एका कार्यक्रमादरम्यान प्रदर्शित करण्यात आलेल्या नागा संस्कृतीच्या नेत्रदीपक सादरीकरणाबद्दलचे चांगले ट्विट. नागा संस्कृती म्हणजेच चैतन्यदायी, शौर्य आणि निसर्गाप्रति आदर.”कर्नाटकमधील शिमोगा येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 27th, 12:45 pm
‘एक भारत श्रेष्ठ भारत’साठी असा समर्पण भाव ठेवणारे राष्ट्रकवी कुवेंपू यांच्या भूमीला मी आदरपूर्वक वंदन करतो. आज मला पुन्हा एकदा कर्नाटकच्या विकासाशी संबंधित हजारो कोटी रूपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करण्याचे सौभाग्य मिळाले आहे.पंतप्रधानांनी कर्नाटकातील शिवमोग्गा येथे 3,600 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन आणि पायाभरणी
February 27th, 12:16 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटक मधील शिवमोग्गा येथे 3,600 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. तसेच शिवमोग्गा विमानतळाचे उद्घाटनही त्यांनी केले आणि तिथल्या सुविधांची पाहणी केली. पंतप्रधानांनी शिवमोग्गा येथे दोन रेल्वे प्रकल्पांची पायाभरणीही केली, ज्यात शिवमोग्गा - शिकारीपुरा - राणेबेन्नूर नवीन रेल्वे लाईन आणि कोटेगांगरु रेल्वे कोचिंग डेपो यांचा समावेश आहे. तसेच 215 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध रस्ते विकास प्रकल्पांची पायाभरणीही त्यांनी यावेळी केली. त्यांनी जल जीवन मिशन अंतर्गत 950 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या बहु-ग्राम योजनांचे उद्घाटन आणि पायाभरणी देखील केली. शिवमोग्गा शहरात 895 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 44 स्मार्ट सिटी प्रकल्पांचे उद्घाटनही त्यांनी केले.नवी दिल्लीत मेजर ध्यानचंद स्टेडियमवर "आदि महोत्सवा"त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 16th, 10:31 am
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अर्जुन मुंडा जी, फग्गन सिंह कुलस्ते जी, रेणुका सिंह जी, डॉक्टर भारती पवार जी, बिशेश्वर टुडू जी, इतर मान्यवर आणि देशाच्या विविध राज्यातून आलेले माझे सगळे आदिवासी बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना आदि महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा!पंतप्रधानांनी दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा मैदानावर आदि महोत्सवाचे केले उद्घाटन
February 16th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा मैदानावर आदि महोत्सव या राष्ट्रीय आदिवासी महा- महोत्सवाचे उद्घाटन केले. आदि महोत्सव हा राष्ट्रीय मंचावर आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवण्याचा एक प्रयत्न आहे. या महोत्सवामध्ये आदिवासी संस्कृती, हस्तकला, पाककृती, वाणिज्य आणि पारंपरिक कला यांचे सादरीकरण केले आहे. आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ लिमिटेड (टीआरआयएफईडी – ट्रायफेड) चा हा वार्षिक उपक्रम आहे.अहमदाबादच्या फ्लॉवर शोचे पंतप्रधानांनी केले कौतुक
January 04th, 11:34 pm
अहमदाबादमध्ये भरलेल्या फुलांच्या प्रदर्शनाने फुले आणि निसर्गाची आवड असलेल्या अनेक लोकांना आकर्षित केले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.स्काय इज नॉट दि लिमिटः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
November 27th, 11:00 am
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. ‘मन कि बात’ मध्ये पुन्ह: एकदा तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. या कार्यक्रमाचा हा 95 वा भाग आहे. आपण जलदगतीने या कार्यक्रमाच्या 100 व्या भागाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहोत. हा कार्यक्रम माझ्यासाठी 130 कोटी देशवासीयांशी संवाद साधण्याचे आणखी एक माध्यम आहे.प्रत्येक भागाच्या आधी, गावांमधून तसेच शहरांमधून आलेली असंख्य पत्रे वाचणे, लहान मुलांपासून ते वयोवृद्धांनी पाठवलेले ऑडीओ ऐकणे, या सगळ्या बाबी माझ्यासाठी एक अध्यात्मिक अनुभवासारख्या आहेत.