पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा

February 24th, 10:35 pm

रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि युक्रेन संदर्भातील ताज्या घडामोडींविषयी माहिती केली. रशिया आणि नाटो समूहादरम्यानचे मतभेद प्रामाणिक आणि गांभीर्याने केलेल्या वाटाघाटींच्या माध्यमातूनच दूर करता येतील याबाबतचा आपल्या प्रदीर्घ काळापासून असलेल्या दृढविश्वासाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. हिंसाचार तातडीने थांबवण्याचे पंतप्रधानांनी आवाहन केले आणि राजनैतिक वाटाघाटी आणि विचारविनिमय या मार्गाचा अवलंब सर्व बाजूंनी करण्यासाठी प्रयत्न करण्याचा आग्रह धरला.