राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
May 11th, 11:00 am
आज 11 मे हा दिवस भारताच्या इतिहासातील सर्वात अभिमानास्पद दिवसांपैकी एक आहे. आज भारतातील शास्त्रज्ञांनी पोखरणमध्ये अशी कामगिरी केली होती, ज्यामुळे भारतमातेच्या प्रत्येक अपत्याची मान अभिमानाने उंचावली होती. अटलजींनी भारताच्या यशस्वी अणुचाचणीची घोषणा केली तो दिवस माझ्यासाठीही अविस्मरणीय आहे. पोखरण अणुचाचणीद्वारे भारताने आपली वैज्ञानिक क्षमता तर सिद्ध केलीच, पण जागतिक स्तरावर भारताला एक नवी उंचीही मिळवून दिली. अटलजींच्याच शब्दात सांगायचे तर, आम्ही आमच्या अथक प्रवासात कधी विश्रांती घेतली नाही. कोणत्याही आव्हानासमोर शरणागती पत्करली नाही. मी सर्व देशवासियांना आजच्या राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन 2023 निमित्त 11 मे रोजी नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
May 11th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन 2023 निमित्त नवी दिल्लीत प्रगती मैदान येथे आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. पंचविसाव्या राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त 11 ते 14 मे या कालावधीत आयोजित उत्सवाची सुरुवात देखील या कार्यक्रमात करण्यात आली. या ऐतिहासिक प्रसंगी, पंतप्रधानांच्या हस्ते देशाच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीशी संबंधित 5,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करण्यात आले. देशातील वैज्ञानिक संस्थांना बळकट करून आत्मनिर्भर भारताचा संकल्प सिद्धीस नेण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेशी हे अनुरूप आहे.पंतप्रधान 11 मे रोजी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन 2023 निमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन करणार
May 10th, 03:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 मे 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता प्रगती मैदान येथे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन 2023 निमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन करतील. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाचे यंदा 25 वे वर्ष असून त्यानिमित्त 11 ते 14 मे या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्याची सुरुवात या कार्यक्रमाद्वारे होईल.पंतप्रधानांनी, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त भारतीय शास्त्रज्ञांबद्दल व्यक्त केली कृतज्ञता
May 11th, 09:29 am
1998 मध्ये पोखरण चाचण्या यशस्वी होऊ शकल्या त्या आपल्या प्रतिभाशाली शास्त्रज्ञ आणि त्यांच्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त पंतप्रधानांचे वैज्ञानिकांना अभिवादन
May 11th, 11:59 am
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैज्ञानिक तसेच तंत्रज्ञानाची कास धरणाऱ्या सर्वांचे कौतुक केले आहे.Prime Minister pays tributes to scientists on the National Technology Day
May 11th, 04:35 pm
Prime Minister Shri Narendra Modi today paid tributes to all the scientists in the country who are using science and technology to bring a positive difference in the lives of others.PM greets citizens on National Technology Day
May 11th, 09:38 am