श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबत घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत पंतप्रधानांनी केलेले निवेदन

December 16th, 01:00 pm

अध्यक्ष दिसनायके यांचे मी भारतात अतिशय जिव्हाळ्याने स्वागत करतो. तुमच्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी तुम्ही भारताची निवड केली त्याबद्दल मला अतिशय आनंद झाला आहे. अध्यक्ष दिसनायके यांच्या भेटीमुळे आमच्या संबंधांमध्ये नव्या उर्जेचा आणि गतिशीलतेचा संचार झाला आहे. आमच्या भागीदारीमध्ये आम्ही भविष्यवेधी दृष्टीकोनाचा अंगिकार केला आहे. आमच्या आर्थिक भागीदारीत आम्ही गुंतवणूक-प्रणीत वृद्धीवर आणि संपर्कव्यवस्थेवर भर दिला आहे आणि भौतिक, डिजिटल आणि ऊर्जा कनेक्टिव्हिटी हे आमच्या भागीदारीचे प्रमुख स्तंभ असतील असा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांदरम्यान विद्युत ग्रीड कनेक्टिव्हिटी आणि बहु-उत्पादन पेट्रोलियम पाईपलाईन्स स्थापन करण्यासाठी आम्ही काम करू. सामपुर सौर ऊर्जा प्रकल्पाला गती दिली जाईल. त्याव्यतिरिक्त श्रीलंकेच्या ऊर्जा प्रकल्पांना एलएनजीचा पुरवठा केला जाईल. द्विपक्षीय व्यापाराला चालना देण्यासाठी दोन्ही बाजू ईटीसीए लागू करण्यासाठी पावले उचलतील.

पंतप्रधान पोलीस महासंचालक/महानिरीक्षकांच्या ५९व्या अखिल भारतीय परिषदेत सहभागी

December 01st, 07:49 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर 2024 रोजी भुवनेश्वर येथे पोलिस महासंचालक/महानिरीक्षकांच्या 59 व्या अखिल भारतीय परिषदेला उपस्थित होते.

पंतप्रधान भुवनेश्वर येथे 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या अखिल भारतीय पोलीस महासंचालक/महानिरीक्षकांच्या परिषदेला पंतप्रधान राहणार उपस्थित

November 29th, 09:54 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2024 या कालावधीत ओडिशा येथे आयोजित अखिल भारतीय पोलीस महासंचालक/महानिरीक्षक परिषद 2024 ला उपस्थित राहणार आहेत. भुवनेश्वरमधील लोकसेवा भवनातील राज्य संमेलन केंद्रात या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

जर्मनीच्या चॅन्सेलर सोबत संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य

October 25th, 01:50 pm

सर्वप्रथम, मी चॅन्सेलर शोल्झ आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळाचे भारतात हार्दिक स्वागत करतो. गेल्या दोन वर्षांत तिसऱ्यांदा भारतात आपले स्वागत करण्याची संधी आम्हाला मिळाली याचा मला आनंद आहे.

जमैकाच्या पंतप्रधानांबरोबर संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले निवेदन

October 01st, 12:00 pm

पंतप्रधान होलनेस आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे भारतात स्वागत करताना मला आनंद होत आहे. पंतप्रधान होलनेस प्रथमच भारताच्या द्विपक्षीय दौऱ्यावर आले आहेत. त्यामुळेच आम्ही या भेटीला विशेष महत्त्व देतो.पंतप्रधान होलनेस हे दीर्घकाळापासूनचे भारताचे मित्र आहेत. त्यांना भेटण्याची संधी मला अनेकवेळा मिळाली आहे. आणि प्रत्येक वेळी, त्यांच्या विचारांमध्ये मला भारतासोबतचे संबंध दृढ करण्याप्रति वचनबद्धता जाणवली आहे. मला विश्वास आहे की त्यांच्या या भेटीमुळे आमच्या द्विपक्षीय संबंधांना नवीन ऊर्जा मिळेल तसेच संपूर्ण कॅरिबियन प्रदेशासोबत आमचे संबंध वृद्धिंगत करेल.

क्वाड राष्ट्रसमूह प्रमुखांच्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्घाटनपर भाषण

September 22nd, 02:30 am

माझ्या तिसऱ्या कार्यकाळाच्या प्रारंभी, माझ्या मित्रांसोबत आजच्या क्वाड शिखर परिषदेत सहभागी होताना मला खूप आनंद होत आहे. क्वाड चा 20 वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या स्वतःच्या विल्मिंग्टन शहरापेक्षा चांगले ठिकाण असू शकत नाही. Amtrak Joe (एम-ट्रेक जो) म्हणून, तुम्ही या शहराशी आणि डेलावेर शी जसे निगडित आहात, तसाच काहीसा संबंध तुमचा क्वाड सोबत देखील राहिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तटरक्षक दलाच्या स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

February 01st, 09:43 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तटरक्षक दलाच्या स्थापना दिनानिमित्त, सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या भारत भेटीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांना दिलेले निवेदन

July 21st, 12:13 pm

राष्ट्रपती विक्रमसिंघे आणि त्यांच्यासोबत आलेल्या प्रतिनिधीमंडळातील सदस्यांचे मी भारतात हार्दिक स्वागत करतो. राष्ट्रपती विक्रमसिंघे त्यांचा एक वर्षांचा कार्यकाळ आज पूर्ण करत आहेत. यानिमित्ताने मी त्यांना आपणा सर्वांकडून हार्दिक शुभेच्छा देतो. मागील वर्ष, श्रीलंकेतील लोकांसाठी अत्यंत आव्हानात्मक होते.एक जवळचा मित्र या नात्याने, नेहमीप्रमाणेच, आम्ही या संकटकाळात सुद्धा श्रीलंकेतील लोकांच्या खांद्याला खांदा भिडवून उभे राहिलो. आणि श्रीलंकेच्या जनतेने ज्या साहसाने या आव्हानात्मक परिस्थितीचा सामना केला त्यासाठी मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो.

जप्त केलेले 1,44,000 किलो अमली पदार्थ नष्ट करण्याच्या ऐतिहासिक टप्प्याचे पंतप्रधानांकडून कौतुक

July 17th, 10:21 pm

जप्त करण्यात आलेले 1,44,000 किलो अमली पदार्थ नष्ट करत भारताने अंमली पदार्थांचे उच्चाटन करण्यात गाठलेल्या ऐतिहासिक टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.

मध्य प्रदेशातील भोपाळ इथे संयुक्त कमांडर्स परिषदेत पंतप्रधान सहभागी

April 01st, 08:36 pm

‘सज्ज, पुनरुत्थानक्षम आणि संबंधित’ ही सैन्य दलातील कमांडर्सच्या तीन दिवसीय परिषदेची संकल्पना होती. या परिषदेत राष्ट्रीय सुरक्षा, सैन्य दलांतील समन्वय आणि प्रत्येक दल प्रमुखाच्या अधिकारात लष्कर, नौदल आणि वायूदलाच्या तुकड्यांचा समावेश या विषयांशी संबंधित बाबींवर चर्चा झाली. ‘आत्मनिर्भरते’च्या दिशेने जाण्यासाठी सैन्य दलांची तयारी आणि प्रगतीचा आढावा या परिषदेत घेण्यात आला.

इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण

March 18th, 11:17 pm

इंडिया टुडे कॉन्क्लेव्हशी संबंधित सर्व मान्यवरांना नमस्कार. डिजिटल माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झालेल्या देश-विदेशातील प्रेक्षक आणि वाचकांचेही अभिनंदन. मला हे पाहून आनंद झाला की या कॉन्क्लेव्हची संकल्पना द इंडिया मोमेंट अशी आहे. आज जगातील आघाडीचे अर्थतज्ज्ञ, विश्लेषक, विचारवंत सर्वच म्हणतात आणि एका सुरात म्हणत आहेत की हा क्षण भारताचा आहे. मात्र जेव्हा इंडिया टुडे समूह हा आशावाद दाखवतो तेव्हा ते अधिकच खास आहे. तसे, मी 20 महिन्यांपूर्वी लाल किल्ल्यावरून सांगितले होते - हीच वेळ आहे, योग्य वेळ आहे. पण इथपर्यंत पोहोचायला 20 महिने लागले. तेव्हाही भावना हीच होती – हा क्षण भारताचा आहे.

इंडिया टूडे कॉनक्लेव्हला पंतप्रधानांनी केले संबोधित

March 18th, 08:00 pm

नवी दिल्लीत हॉटेल ताज पॅलेस मध्ये झालेल्या ‘इंडिया टूडे कॉनक्लेव्ह’ (परिषद) ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले.

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसमवेत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन

March 10th, 12:50 pm

सर्वप्रथम,पंतप्रधान अल्बानीस यांच्या पहिल्या भारत भेटीबद्दल मी त्यांचे हार्दिक स्वागत करतो. पंतप्रधान स्तरावर वार्षिक शिखर परिषद घेण्याचा निर्णय गेल्या वर्षी दोन्ही देशांनी घेतला आणि पंतप्रधान अल्बानीस यांच्या या भेटीने या मालिकेचा प्रारंभ झाला आहे. होळीच्या दिवशी त्यांचे भारतात आगमन झाले आणि त्यानंतर आम्ही क्रिकेटच्या मैदानावर काही वेळ एकत्र आलो. रंग, संस्कृती आणि क्रिकेट यांचा हा उत्सव म्हणजे उत्साह आणि भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या मित्रत्वाच्या भावनेचेच प्रतिक आहे.

2022-23 ते 2025-26 या आर्थिक वर्षांसाठी 4800 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीसह “व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम” या केंद्र पुरस्कृत योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी

February 15th, 03:51 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 2022-23 ते 2025-26 या आर्थिक वर्षांसाठी 4800 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीसह “व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम” या केंद्र पुरस्कृत योजनेला मंजुरी दिली आहे.

'अफगाणिस्तानवरील दिल्ली प्रादेशिक सुरक्षा चर्चासत्रात' सहभागी होण्यासाठी आलेल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी तसेच सुरक्षा परिषदेच्या सचिवांनी एकत्रितपणे पंतप्रधानांची भेट घेतली

November 10th, 07:53 pm

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज आयोजित केलेल्या अफगाणिस्थानशी संबंधित दिल्ली प्रादेशिक सुरक्षा चर्चासत्रासाठी आलेल्या सात देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रमुखांनी चर्चासत्रानंतर एकत्रितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

18 व्या भारत-आसियान शिखर परिषदेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाष्य

October 28th, 12:35 pm

या वर्षीही आपल्याला पारंपारिक कौटुंबिक छायाचित्र काढता आले नाही, पण आभासी माध्यमातून आपण आसियान-भारत शिखर परिषदेची परंपरा कायम ठेवली आहे. 2021 मध्ये आसीयानचे यशस्वी अध्यक्ष झाल्याबद्दल मी ब्रुनेईचे सुलतान यांचे अभिनंदन करतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्र प्रमुखांच्या 21 व्या बैठकीत दूरदृश्य प्रणाली द्वारे झाले सहभागी

September 17th, 05:21 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्र प्रमुखांच्या 21 व्या बैठकीत दूरदृश्य प्रणाली द्वारे आणि अफगाणीस्तानसंदर्भातल्या एससीओ- सीएसटीओ संयुक्त सत्रात व्हिडीओ संदेशाद्वारे सहभागी झाले.

अफगाणिस्तानवरील एससीओ-सीएसटीओ जनसंपर्क शिखर परिषदेमधील पंतप्रधानांचे भाषण

September 17th, 05:01 pm

अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर शांघाय सहकार्य संघटना आणि सामूहिक सुरक्षा करार संघटना यांच्यात विशेष बैठक आयोजित केल्याबद्दल मी अध्यक्ष रहमोन यांचे आभार मानतो.

75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी केलेल्या भाषणातील ठळक मुद्दे

August 15th, 03:02 pm

आज, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पवित्र उत्सवदिनी, देश आपल्या सर्व स्वातंत्र्य सैनिक आणि शूर वीरांना नमन करत आहे, जे राष्ट्राच्या संरक्षणासाठी अहोरात्र बलिदान देत आहेत. देश आज या प्रत्येक विभूतीचे स्मरण करत आहे. आदरणीय बापु, ज्यांनी स्वातंत्र्य ही एक लोक चळवळ बनवली , नेताजी सुभाषचंद्र बोस, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण केले, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, बिस्मिल आणि अशफाकुल्ला खान सारखे महान क्रांतिकारक; झाशीची राणी लक्ष्मीबाई, कित्तूरची राणी चेन्नम्मा किंवा राणी गायदिनलियू किंवा मातंगीनी हजराचे शौर्य; देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू जी, सरदार वल्लभभाई पटेल, ज्यांनी देशाला एकसंध राष्ट्र बनवले आणि बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी भारताची भावी दिशा ठरवली आणि मार्ग सुकर केला. देश या सर्व महान व्यक्तींचा सदैव ऋणी आहे.

15 ऑगस्ट, 2021रोजी, भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण

August 15th, 07:38 am

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या आपल्या सर्वांना आणि जगभरातील भारतावर प्रेम करणाऱ्या, लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !