पंतप्रधानांचा 17 सप्टेंबर रोजी मध्य प्रदेश दौरा
September 15th, 02:11 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशला भेट देणार आहेत. सकाळी सुमारे 10:45 वाजता, पंतप्रधान कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियातून आणलेले चित्ते सोडतील. त्यानंतर, दुपारी 12 च्या सुमारास, ते कराहल, श्योपूर येथे महिला बचतगट सदस्य/सामुदायिक संसाधन व्यक्तींसोबत बचतगट संमेलनात सहभागी होतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर नारीशक्तीबरोबर संवाद’ या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद
August 12th, 12:32 pm
आज ज्यावेळी देश आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे, त्यावेळी अशा कार्यक्रमाचे आयोजन अतिशय महत्वाचे ठरते. आगामी वर्षांमध्ये आत्मनिर्भर भारताला, आपली आत्मनिर्भर नारीशक्ती एक नवीन प्रेरणा देणारी आहे. तुम्हा सगळ्यांबरोबर संवाद साधून आज मलाही प्रेरणा मिळाली. आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी, राजस्थानचे आदरणीय मुख्यमंत्री जी, राज्य सरकारांचे मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषदांचे अध्यक्ष आणि सदस्य, देशातल्या जवळपास तीन लाख स्थानांवरून जोडल्या गेलेल्या स्वमदत समूहाच्या कोट्यवधी भगिनी आणि कन्या, इतर सर्व मान्यवर!पंतप्रधानांनी "आत्मनिर्भर नारीशक्तीशी संवाद " कार्यक्रमात महिला बचत गटांशी साधला संवाद
August 12th, 12:30 pm
पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांनी आज आत्मनिर्भर नारीशक्तीशी संवाद या कार्यक्रमात भाग घेतला. त्यांनी दीनदयाल अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियाना अंतर्गत महिला बचत गटांचे सदस्य, समुदाय, प्रतिनिधी यांच्याबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.पंतप्रधान 12 ऑगस्टला ‘आत्मनिर्भर नारीशक्तीशी संवाद’ कार्यक्रमात सहभागी होणार
August 11th, 01:51 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 ऑगस्टला ‘आत्मनिर्भर नारीशक्तीशी संवाद’ या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत प्रोत्साहन प्राप्त महिला स्वयं सहाय्यता गट,सामुदायिक विशेषज्ञ व्यक्ती यांच्याशी दुपारी 12:30 वाजता दूरदृश्य प्रणाली द्वारे संवाद साधणार आहेत.देशभरातल्या महिला स्वयंसहाय्यता गट सदस्यांच्या यशोगाथा त्याचबरोबर कृषी उपजीविका सार्वत्रीकरण यावरच्या एका पुस्तीकेचेही प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.