शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजनेला आणि स्वयंपूर्णतेसाठी अन्न सुरक्षा साध्य करण्यासाठी कृषीउन्नती योजनेला (KY) केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

October 03rd, 09:18 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज कृषी आणि शेतकरी मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व केंद्र पुरस्कृत योजना (CSS) चे दोन छत्री योजनांमध्ये-पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजना (पीएम-आरकेव्हीवाय) आणि कृषीउन्नती योजना मध्ये सुसूत्रीकरण करण्याच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

वर्ष 2024-25 ते 2030-31 साठी ‘राष्ट्रीय खाद्यतेल - तेलबिया अभियान’ ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

October 03rd, 09:06 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय खाद्यतेल (एनएमईओ) - तेलबिया अभियानाला मंजुरी दिली आहे. देशांतर्गत तेलबिया उत्पादनाला चालना देणे आणि खाद्यतेलामध्ये स्वयंपूर्णता (आत्मनिर्भर भारत) साध्य करण्याच्या उद्देशाने हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे . 2024-25 ते 2030-31 या सात वर्षांच्या कालावधीत 10,103 कोटी रुपये खर्चासह या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.