पंतप्रधान येत्या 23 जानेवारीला आसाम आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार
January 21st, 02:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 23 जानेवारी 2021 रोजी कोलकात्याला जाणार असून, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीवर्षानिमित्त होणाऱ्या ‘पराक्रम दिवसाच्या विशेष कार्यक्रमात ते आपले विचार मांडतील. तसेच, पंतप्रधान त्यानंतर, आसाममधील जीरांगा पठार या ठिकाणीही भेट देणार असून तिथे एक लाख सहा हजार भूमी पट्ट्यांचे वाटप लाभार्थ्यांना त्यांच्या हस्ते केले जाईल.