नवी दिल्लीत आयोजित भारत टेक्स 2024 मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 26th, 11:10 am
मंत्रिमंडळातील माझे सहकारी, पियूष गोयल जी, दर्शना जरदोश जी, विविध देशांचे राजदूत, वरिष्ठ राजनैतिक अधिकारी, केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकारी, फॅशन आणि वस्त्रोद्योग जगताशी संबंधित सर्व मित्र, तरुण उद्योजक, विद्यार्थी, आपले विणकर आणि आपल्या कारागीर मित्रांनो महोदया आणि महोदय! भारत मंडपम येथे आयोजित भारत टेक्समध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत ! आजचा हा कार्यक्रम खूप विशेष आहे. विशेष यासाठी आहे : कारण भारतातील दोन सर्वात मोठ्या प्रदर्शन केंद्रांमध्ये म्हणजेच भारत मंडपम आणि यशोभूमीमध्ये हा कार्यक्रम एकाच वेळी होत आहे. आज 3 हजाराहून अधिक प्रदर्शक... 100 देशांतील सुमारे 3 हजार खरेदीदार... 40 हजारांहून अधिक व्यापारी अभ्यागत... एकाचवेळी या कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत. हा कार्यक्रम वस्त्रोद्योग कार्यक्षेत्रामधील सर्व भागधारकांना आणि संपूर्ण मूल्य साखळीतील लोकांना एकत्र येण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारत टेक्स 2024 चे उद्घाटन
February 26th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम येथे देशातील सर्वात मोठ्या जागतिक वस्त्रोद्योग कार्यक्रमांपैकी एक अशा भारत टेक्स 2024 चे उद्घाटन केले. या कार्यक्रमादरम्यान आयोजित केलेल्या प्रदर्शनाची देखील पंतप्रधानांनी पाहणी केली.राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
August 07th, 04:16 pm
काहीच दिवसांपूर्वी 'भारत मंडपमचे' लोकार्पण झाले आहे. तुमच्यापैकी अनेकजण पूर्वीही इथे यायचे आणि तंबूत आपले जग उभारायचे. आता आज तुम्ही इथला बदललेला देश पाहिला असेल आणि आज आपण या 'भारत मंडपम'मध्ये राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करत आहोत. 'भारत मंडपम'च्या या भव्यतेमध्येही भारतातील हातमाग उद्योगाची महत्त्वाची भूमिका आहे. प्राचीन आणि नव्याचा हा संगम आजचा भारत काय आहे ते सांगतो. आजचा भारत केवळ स्थानिक वस्तूंचा आग्रह धरत नाही तर त्या जगभरात पोहोचाव्या यासाठी जागतिक मंचही पुरवत आहे. काही वेळापूर्वी मला आमच्या काही विणकर मित्रांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. देशभरातील अनेक हॅण्डलूम क्लस्टर्समध्ये आमचे विणकर बंधू-भगिनी आमच्याशी जोडले जाण्यासाठी दूरदूरवरून आले आहेत. या भव्य सोहळ्यासाठी मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो, मी तुमचे अभिनंदन करतो.नवी दिल्ली येथे राष्ट्रीय हातमाग दिन सोहळ्यात पंतप्रधानांनी केले मार्गदर्शन
August 07th, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे प्रगती मैदानात ‘भारत मंडपम’ मध्ये राष्ट्रीय हातमाग दिन सोहळ्यामध्ये आपले विचार व्यक्त केले आणि नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीने विकसित केलेल्या ‘भारतीय वस्त्र एवं शिल्प कोष’- या वस्त्र आणि कलाकुसरीच्या वस्तू भांडाराच्या पोर्टलचे उद्घाटन केले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाला देखील पंतप्रधानांनी भेट दिली आणि तिथल्या विणकरांशी संवाद साधला. यावेळी उपस्थितांसमोर आपले विचार व्यक्त करताना पंतप्रधानांनी ‘भारत मंडपम’चा उद्घाटन सोहळा होण्यापूर्वी प्रदर्शनातील सहभागी प्रगती मैदानात कशा प्रकारे एका तंबूमध्ये आपली उत्पादने प्रदर्शित करायचे त्याची आठवण करून दिली.Revamping cloth industry in Kashi
March 02nd, 06:50 pm
“We have to transform India’s economy. On one hand manufacturing sector is to be enhanced, while on the other side, we have to make sure it directly benefits the youth. They must get jobs so that lives of poorest of the poor stands transformed and they come out of the poverty line. Enhancing their purchasing power would increase the number of manufacturers, manufacturing growth, employment opportunities and expand the market.” –Narendra ModiPM’s interaction through PRAGATI
February 17th, 05:30 pm