विशेष गुणधर्म असलेल्या 35 प्रकारच्या पिकांच्या वाणांचे रायपूर, छत्तीसगड इथे लोकार्पण केल्यानंतरचे पंतप्रधानांचे भाषण
September 28th, 11:01 am
नमस्कार जी! केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्रीमान नरेंद्र सिंह तोमरजी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री श्रीमान भूपेश बघेलजी, मंत्रिमंडळातील माझे अन्य सहकार श्री पुरुषोत्तम रुपालाजी, श्री कैलाश चौधरीजी, भगीनी शोभाजी, छत्तीसगडचे माज मुख्यमंत्री श्री रमन सिंहजी, विरोधीपक्ष नेते श्री धर्म लाल कौशिकजी, कृषी शिक्षणासंबंधित सर्व कुलगुरु, संचालक, वैज्ञानिक सहकारी आणि माझ्या प्रिय शेतकरी बंधू आणि भगिनींनो !विशेष गुणधर्म असलेल्या 35 प्रकारच्या पिकांच्या वाणांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
September 28th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून कृषिपिकांच्या विशेष गुणधर्म असलेल्या वाणांचे राष्ट्रार्पण करण्यात आले. तसेच, रायपूर इथे विकसित करण्यात आलेल्या राष्ट्रीय जैविक तणाव व्यवस्थापन संस्थेच्या नव्या परिसराचेही पंतप्रधानांनी लोकार्पण केले.विशेष गुणधर्म असलेल्या 35 पिकांची वाणे 28 सप्टेंबर रोजी होणार पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्राला समर्पित
September 27th, 09:41 pm
हवामान बदलानुकुल तंत्रज्ञानाविषयी जनजागृती करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, म्हणजेच 28 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता आयसीएआर संस्था, राज्य आणि केंद्रीय कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रांद्वारे आयोजित कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे विशेष गुणधर्म असलेल्या पिकांच्या 35 वाणांचे लोकार्पण करतील. रायपूरच्या राष्ट्रीय बायोटीक स्ट्रेस टॉलरन्स संस्थेच्या नवीन परिसराचे लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते होईल.