महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांचे उद्घाटन, समर्पण आणि पायाभरणी प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

September 29th, 12:45 pm

महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन जी, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्रीमान एकनाथ शिंदे जी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, अजित पवार जी, पुण्याचे खासदार आणि मंत्रीमंडळातील माझे युवा सहकारी भाई मुरलीधर, दूरदृश्य प्रणालीमार्फत या कार्यक्रमाला उपस्थित असलेले केंद्रीय मंत्रिमंडळातील इतर मंत्री, महाराष्ट्रातील सर्व वरिष्ठ मंत्रीगण देखील मला समोर दिसत आहेत, खासदार, आमदार आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या बंधू आणि भगिनींनो!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे महाराष्ट्रातील 11,200 कोटी रुपयांहून जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण

September 29th, 12:33 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे महाराष्ट्रातील 11,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण झाले.

पंतप्रधान 29 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात करणार 11,200 कोटी रूपये खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण

September 28th, 07:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील 11,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण उद्या (29 सप्टेंबर रोजी) दुपारी 12:30 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे.

राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमांतर्गत 12 औद्योगिक नोड्स/शहरांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

August 28th, 05:46 pm

भारतात लवकरच मोठ्या प्रमाणात औद्योगिक स्मार्ट शहरे उभी राहिलेली पहायला मिळणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने या दिशेने आज एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाने राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रम (एनआयसीडीपी) अंतर्गत 28,602 कोटी रुपये गुंतवणुकीच्या 12 नवीन प्रकल्प प्रस्तावांना मंजुरी दिली आहे.या निर्णयामुळे देशाचे औद्योगिक परिदृश्य बदलणार असून औद्योगिक केंद्र आणि शहरांचे एक मजबूत जाळे तयार होईल, जे आर्थिक विकास आणि जागतिक स्पर्धात्मकतेला लक्षणीयरीत्या चालना देईल.