
भारत मंडपम, नवी दिल्ली येथे विकित भारत यंग लीडर्स डायलॉग 2025 मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 12th, 02:15 pm
भारताच्या युवाशक्तीच्या ऊर्जेमुळेच आज हा भारत मंडपमही ऊर्जेने व्यापून गेला आहे आणि ऊर्जामय झाला आहे. आज संपूर्ण देश स्वामी विवेकानंद यांचे स्मरण करत आहे, त्यांना अभिवादन करत आहे. स्वामी विवेकानंदांचा देशातील तरुणांवर प्रचंड विश्वास होता. स्वामीजी म्हणत, की माझा तरुण पिढीवर, नव्या पिढीवर विश्वास आहे. स्वामीजी म्हणत की, माझे कार्यकर्ते तरुण पिढीतून येतील, सिंहाप्रमाणे ते प्रत्येक समस्येवर तोडगा काढतील. विवेकानंदजींचा जसा तुमच्यावर विश्वास होता, तसाच माझा विवेकानंदजींवर विश्वास आहे, त्यांच्या प्रत्येक शब्दावर माझा विश्वास आहे. त्यांनी भारतातील तरुणांसाठी जे काही विचार केले आणि सांगितले, त्यावर माझी अंधश्रद्धा आहे. खरोखरच, आज स्वामी विवेकानंद असते, आणि त्यांनी एकविसाव्या शतकातील तरुणांमधील ही ऊर्जा, त्यांचे सक्रीय प्रयत्न पहिले असते, तर त्यांनी भारतासाठी नवा विश्वास, नवी ऊर्जा, आणि नव्या स्वप्नांचे बीज पेरले असते.
विकसित भारत युवा नेते संवाद 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी
January 12th, 02:00 pm
स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे विकसित भारत युवा नेते संवाद 2025 या कार्यक्रमात भाग घेतला. या कार्यक्रमात भारतभरातील 3,000 उत्साही तरुण नेत्यांनी सहभाग घेतला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी भारतातील तरुणांच्या चैतन्यपूर्ण उर्जेने भारत मंडपममध्ये आणलेले सळसळते चैतन्य अधोरेखित केले. देशातील तरुणांवर अपार विश्वास असलेल्या स्वामी विवेकानंदांचे संपूर्ण देश स्मरण करत आहे आणि त्यांना आदरांजली वाहतो आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. स्वामी विवेकानंदांचा असा विश्वास होता की तरुण पिढीतून येणारे त्यांचे शिष्य, सिंहांप्रमाणे निधड्या छातीने प्रत्येक समस्येचा सामना करतील, असे त्यांनी सांगितले. ज्याप्रमाणे स्वामीजींनी तरुणांवर विश्वास ठेवला त्याचप्रमाणे स्वामीजींवर माझी पूर्ण स्वामीजींवर, विशेषत: तरुणांबद्दलच्या त्यांच्या दृष्टिकोनावर पूर्ण श्रद्धा आहे, असेही ते म्हणाले. आज जर स्वामी विवेकानंद आपल्यामध्ये असते तर 21 व्या शतकातील तरुणांची जागृत शक्ती आणि सक्रिय प्रयत्न पाहून ते नव्या आत्मविश्वासाने भारले असते, असेही पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान 17 डिसेंबरला राजस्थानला भेट देणार
December 16th, 03:19 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 डिसेंबर 2024 रोजी राजस्थानला भेट देणार आहेत. एक वर्ष-परिणाम उत्कर्ष या राजस्थान सरकारच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होणार आहेत. यावेळी ते राजस्थानमध्ये जयपूर येथे ऊर्जा, रस्ते, रेल्वे आणि पाणी यांच्याशी संबंधित 46,300 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या 24 प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.नवी दिल्ली येथे अष्टलक्ष्मी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 06th, 02:10 pm
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा जी, मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा जी, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा जी, सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी ज्योतिरादित्य सिंधिया जी, सुकांता मुजूमदार जी, अरुणाचल प्रदेशचे उप-मुख्यमंत्री, मिजोरम आणि नागालँडच्या सरकारचे मंत्रीगण, अन्य लोकप्रतिनिधी, ईशान्य प्रदेशातून आलेले सर्व बंधू आणि भगिनी, स्त्री आणि पुरुषगण,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन
December 06th, 02:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात सर्व मान्यवरांचे स्वागत करताना मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस असल्याचे नमूद केले. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण झाली असून ती सर्व नागरिकांसाठी प्रेरणादायी आहे असे ते म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, 13 नोव्हेंबरला बिहार भेटीवर
November 12th, 08:26 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, 13 नोव्हेंबर रोजी बिहारला भेट देणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याचा प्रारंभ दरभंगा येथून होणार आहे.सकाळी पावणेअकराच्या सुमारास, बिहारमधील 12,100 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे उद्घाटन, पायाभरणी तसेच लोकार्पण कार्यक्रम होईल. त्या भागातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधांना मोठी चालना देत पंतप्रधान नरेंद्र मोदी दरभंगा येथे 1260 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह उभारण्यात येणाऱ्या एम्स संस्थेची ठेवणार आहेत. या ठिकाणी वैद्यकीय तज्ज्ञांची सुविधा असलेले सुसज्ज रुग्णालय/आयुष ब्लॉक, वैद्यकीय महाविदयालय, परिचारिका महाविद्यालय, रात्र निवारा तसेच निवासाच्या सुविधांसह इतर अनेक सोयी केल्या जाणार आहेत. बिहार आणि आसपासच्या प्रदेशातील लोकांना या एम्स मध्ये तृतीय स्तरावरील वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतील.Maharashtra needs a Mahayuti government with clear intentions and a spirit of service: PM Modi in Solapur
November 12th, 05:22 pm
PM Modi addressed a public gathering in Solapur, Maharashtra, highlighting BJP’s commitment to Maharashtra's heritage, middle-class empowerment, and development through initiatives that respect the state's legacy.PM Modi addresses public meetings in Chimur, Solapur & Pune in Maharashtra
November 12th, 01:00 pm
Campaigning in Maharashtra has gained momentum, with PM Modi addressing multiple public meetings in Chimur, Solapur & Pune. Congratulating Maharashtra BJP on releasing an excellent Sankalp Patra, PM Modi said, “This manifesto includes a series of commitments for the welfare of our sisters, for farmers, for the youth, and for the development of Maharashtra. This Sankalp Patra will serve as a guarantee for Maharashtra's development over the next 5 years.Those who looted rights of poor, gave slogan of poverty eradication: PM Modi in Palwal
October 01st, 07:42 pm
PM Modi, while initiating his address at the Palwal, Haryana rally, expressed his gratitude for the opportunity to visit various parts of Haryana in recent days. The PM shared his observation that a strong wave of support for the BJP is sweeping through every village, with one resonating chant: Bharosa dil se…BJP phir se!PM Modi addresses an enthusiastic crowd in Palwal, Haryana
October 01st, 04:00 pm
PM Modi, while initiating his address at the Palwal, Haryana rally, expressed his gratitude for the opportunity to visit various parts of Haryana in recent days. The PM shared his observation that a strong wave of support for the BJP is sweeping through every village, with one resonating chant: Bharosa dil se…BJP phir se!केंद्रीय मंत्रिमंडळाने 50,655 कोटी रुपये एकूण भांडवली खर्चाच्या 936 किमी लांबीच्या 8 महत्त्वाच्या राष्ट्रीय हाय-स्पीड रोड कॉरिडॉर प्रकल्पांना दिली मंजुरी, यामुळे लॉजिस्टिक कार्यक्षमता सुधारेल , वाहतूक कोंडी कमी होईल आणि देशभरातील कनेक्टिव्हिटी वाढेल
August 02nd, 08:42 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने देशभरात 50,655 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या 936 किमी लांबीच्या 8 महत्त्वाच्या राष्ट्रीय हायस्पीड कॉरिडॉर प्रकल्पांच्या विकासाला मंजुरी दिली आहे. . या 8 प्रकल्पांच्या अंमलबजावणीमुळे सुमारे 4.42 कोटी मनुष्यदिवस प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल.मुंबईमध्ये विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
July 13th, 06:00 pm
महाराष्ट्राचे राज्यपाल श्री रमेश बैस जी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी पीयूष गोयल जी, रामदास आठवले जी, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, अजितदादा पवार जी, राज्य सरकार मधील मंत्री मंगल प्रभात जी, दीपक केसरकर जी, इतर सर्व मान्यवर, महिला आणि पुरुषहो,पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्रात मुंबई येथे 29,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण
July 13th, 05:30 pm
उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी मुंबई आणि आसपासच्या प्रदेशांमधील रस्ते आणि रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी 29,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. महाराष्ट्रातील तरुणांसाठी विशाल कौशल्य विकास प्रकल्पाचा त्यांनी उल्लेख केला , ज्यामुळे राज्यात रोजगाराच्या संधींना आणखी चालना मिळेल. केंद्र सरकारने नुकतीच मंजुरी दिलेल्या वाढवण बंदराचा देखील पंतप्रधानांनी उल्लेख केला. 76,000 कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे 10 लाखांहून अधिक रोजगार निर्माण होतील असे ते म्हणाले.पंतप्रधान 13 जुलै रोजी मुंबई दौऱ्यावर
July 12th, 05:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जुलै 2024 रोजी मुंबईला भेट देणार आहेत. संध्याकाळी 5:30 च्या सुमाराला, पंतप्रधान मुंबईतील गोरेगाव स्थित नेस्को प्रदर्शन केंद्र येथे पोहोचतील. या कार्यक्रमात ते 29,400 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या रस्ते, रेल्वे आणि बंदर क्षेत्राशी संबंधित विविध प्रकल्पांचे उद्घाटन ,लोकार्पण आणि पायाभरणी करतील. त्यानंतर, संध्याकाळी 7 च्या सुमाराला पंतप्रधान, जी -ब्लॉक , वांद्रे कुर्ला संकुल, मुंबई येथे आयएनएस टॉवर्सचे उद्घाटन करतील.Under Yogi Ji’s government, riots and rioters have been stopped: PM Modi in Ghazipur, UP
May 25th, 04:45 pm
In the heart of Ghazipur, Prime Minister Narendra Modi assured the crowd of his transparent vision for a Viksit Bharat, pledging to thwart every obstruction posed by the opposition.पंतप्रधान मोदींची उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे भव्य प्रचार सभा
May 25th, 04:30 pm
गाझीपूरच्या मध्यवर्ती भागात झालेल्या सभेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताबद्दलच्या आपल्या पारदर्शी दृष्टीकोनाची ग्वाही दिली तसेच विरोधकांकडून आणला जात असलेला प्रत्येक अडथळा दूर करण्याचे आश्वासन दिले.फॅमिली फर्स्ट हा काँग्रेस आणि इंडी आघाडीचा एकमेव अजेंडा: पंतप्रधान मोदी पश्चिम दिल्लीतील द्वारका येथे
May 22nd, 06:20 pm
पश्चिम दिल्लीत द्वारका येथे झालेल्या प्रचंड सभेला संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या राजकीय परिदृश्याला आकार देण्यात दिल्लीची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार असल्याचे स्पष्ट करताना आताच्या निवडणुकांमध्ये मतदारांनी जाणीवपूर्वकपणे निवड करावी असे आवाहन केले.पंतप्रधान मोदींचे पश्चिम दिल्लीतील द्वारका येथील प्रचार सभेत भाषण
May 22nd, 06:00 pm
पश्चिम दिल्ली मतदारसंघाच्या द्वारका भागात झालेल्या प्रचंड सभेला संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या राजकीय परिदृश्याला आकार देण्यात असलेली दिल्लीची महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट करताना आताच्या निवडणुकांमध्ये जाणीवपूर्वकपणे निवड करण्याचे मतदारांना आवाहन केले.टीएमसीच्या लांगूलचालनामुळे बंगालमध्ये डेमोग्राफी विस्कळीत झाली आहे: पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालच्या मेदिनीपूरमध्ये
May 19th, 01:40 pm
पश्चिम बंगालमधील मेदिनीपूर येथे आपल्या तिसऱ्या जाहीर सभेत बोलताना पीएम मोदींनी टीएमसीच्या कृतींचा निषेध करत हा पक्ष भ्रष्टाचार, दहशतवाद आणि लांगूलचालन करत असल्याचा आरोप केला, ते म्हणाले, बंगालमध्ये टीएमसी म्हणजे दहशत, भ्रष्टाचार आणि लांगूूलचालन हे समीकरण झाले आहे. आपल्या व्होट बँकेला खूष ठेवण्यासाठी, ते सतत हिंदू समाजाचा अपमान करत असतात. साधु-संन्याशांनी टीएमसी नेत्यांनी या राजकारणात पडू नये असा सल्ला दिला आहे.त्यावर प्रतिसाद देताना मुख्यमंत्र्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या. त्यांनी संन्यासी वर्गाबद्दल अवमानकारक उद्गार काढून इस्कॉन, रामकृष्ण मिशन आणि भारत सेवाश्रमावर अश्लाघ्य आरोप केलेपश्चिम बंगालमधील पुरुलिया, बिष्णुपूर आणि मेदिनीपूर येथील जाहीर सभांमध्ये पंतप्रधान मोदींचे भाषण
May 19th, 12:45 pm
पुरुलिया, बिष्णुपूर आणि मेदिनीपूर, पश्चिम बंगाल येथे झालेल्या झंझावाती सभांमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विराट जनसमुदायाला संबोधित करताना INDI आघाडीचे अपयश आणि प्रदेशाच्या विकास आणि उन्नतीप्रती भाजप वचनबद्ध असल्याचे अधोरेखित केले. पंतप्रधानांनी विशेषत: पाणी टंचाई, आरक्षण आणि भ्रष्टाचार या मुद्द्यांवर भर देत टीएमसीने दिलेली आश्वासने आणि त्यांच्या कृतींमधील लक्षणीय फरक स्पष्ट केला.