हरित हायड्रोजनवरच्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेतला पंतप्रधानांचा व्हिडीओ संदेश

September 11th, 10:40 am

वैज्ञानिक वर्ग आणि नवप्रवर्तक , उद्योग जगतातले दिग्गज आणि माझ्या प्रिय मित्रांनो, मी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो.हरित हायड्रोजनवरच्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत आपणा सर्वांचे स्वागत करताना मला आनंद होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरित हायड्रोजनवरील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेला केले संबोधित

September 11th, 10:20 am

हरित हायड्रोजनवरील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेला उपस्थित सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत करून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले की जगभरात महत्त्वपूर्ण परिवर्तन होत आहे. हवामान बदल ही केवळ भविष्याची बाब नसून त्याचा प्रभाव आता जाणवू शकतो ही जाणीव आज वाढताना दिसत आहे यावर त्यांनी भर दिला. आता आणि हीच कृती करण्याची वेळ आहे , असे मोदी म्हणाले. ऊर्जा संक्रमण आणि शाश्वतता जागतिक धोरणात्मक चर्चेच्या केंद्रस्थानी असल्याचे त्यांनी नमूद केले.

इकॉनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरम या जागतिक नेतृत्व मंचावर पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद

August 31st, 10:39 pm

ईटी वर्ल्ड लीडर्स फोरमच्या या कार्यक्रमात येणं म्हणजे…कितीतरी जुने चेहरे दिसताहेत…तर ही एक आनंदाची बाब आहे. मला विश्वास आहे की इथे भारताच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने खूप चांगली चर्चा झाली असेल. आणि ही चर्चा अशावेळी झालीय जेव्हा संपूर्ण जगात भारताविषयी एक विश्वास निर्माण झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे इकॉनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरमला केले संबोधित

August 31st, 10:13 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे इकॉनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरमला संबोधित केले.

भारत-पोलंड धोरणात्मक भागीदारीच्या अंमलबजावणीसाठीची कृती योजना (2024-2028)

August 22nd, 08:22 pm

वॉर्सॉ येथे दिनांक 22 ऑगस्ट, 2024 रोजी भारत आणि पोलंड च्या पंतप्रधानांनी केलेल्या चर्चेतून गाठलेल्या सहमतीच्या आधारावर आणि धोरणात्मक भागीदारीच्या स्थापनेतून निर्माण झालेल्या द्विपक्षीय सहकार्याच्या गतीला मान्यता देऊन प्राधान्यक्रम म्हणून खालील क्षेत्रांमध्ये 2024-2028 या काळात द्विपक्षीय सहकार्याला दिशा देणारी पंचवार्षिक कृतीयोजना तयार करण्यास दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी संमती दिली:

भारत-पोलंड संयुक्त निवेदन "धोरणात्मक भागिदारीची स्थापना”

August 22nd, 08:21 pm

पोलंड प्रजासत्ताकाचे पंतप्रधान माननीय श्री डोनाल्ड टस्क यांच्या निमंत्रणावरून, भारतीय प्रजासत्ताकाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 21-22 ऑगस्ट 2024 या कालावधीत पोलंडला औपचारिक भेट दिली. दोन्ही राष्ट्रे आपल्या राजनैतिक संबंधांचा 70 वा वर्धापन दिन साजरा करत असताना ही ऐतिहासिक भेट झाली.

पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये पंतप्रधान मोदी यांनी दिलेले निवेदन

August 22nd, 03:00 pm

वॉर्सासारख्या सुंदर शहरामध्ये अतिशय उत्साहात केलेले स्वागत, भव्य आदरातिथ्य, सत्कार आणि मित्रत्वाच्या नात्याने भारलेले शब्द, यासाठी मी पंतप्रधान टस्क यांचे अगदी हृदयापासून आभार व्यक्त करतो.

पोलंडमधील वॉर्सा इथे भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

August 21st, 11:45 pm

हे दृश्य खरोखरच अद्भुत आहे आणि तुमचा उत्साह देखील अद्भुत आहे . मी इथं पाय ठेवल्यापासून पाहतो आहे तुम्ही थकतच नाही आहात. तुम्ही सर्व जण पोलंडच्या वेगवेगळ्या भागातून आला आहात, सर्वांची भाषा, बोली, खाण्याच्या सवयी भिन्न आहेत. मात्र प्रत्येकजण भारतीयत्वाच्या भावनेने जोडलेला आहे. तुम्ही माझे येथे इतके छान स्वागत केले आहे, या स्वागतासाठी मी तुम्हा सर्वांचा, पोलंडच्या जनतेचा खूप आभारी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले पोलंडमधील भारतीय समुदायाला संबोधित

August 21st, 11:30 pm

त्याआधी पोलंडमधल्या भारतीय समुदायाने पंतप्रधानांचे मोठ्या जल्लोष आणि उत्साहात स्वागत केले. सुमारे 45 वर्षांनंतर भारताचे पंतप्रधान पोलंडच्या भेटीवर आल्याची बाब पंतप्रधानांनी आपल्या संबोधनात नमूद केली. या भेटीत आपण पोलंडचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेज डुडा आणि पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांची भेट घेण्यासाठी, तसेच भारत आणि पोलंडमधली संबंध अधिक दृढ करण्यासाठी आतुर असल्याचे त्यांनी सांगितले. भारत ही लोकशाहीची जननी आहे, या नात्याने तसेच भारत आणि पोलंडमधली एकसामाईक मूल्ये दोन्ही देशांना

78 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून राष्ट्राला संबोधित केले

August 15th, 03:04 pm

त्यांच्या संबोधनातील काही ठळक मुद्दे:

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

August 15th, 01:09 pm

आज अत्यंत शुभ क्षण आहे, ज्या वेळी आपण देशासाठी बलिदान देणाऱ्या, देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचे जीवन समर्पित करणाऱ्या, आयुष्यभर त्यासाठी संघर्ष करणाऱ्या, फाशीच्या तख्तावर ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा देणाऱ्या, असंख्य स्वातंत्र्य प्रेमींना वंदन करण्याचा हा उत्सव आहे, त्यांचे पुण्यस्मरण करण्याचा हा प्रसंग आहे. स्वातंत्र्य सैनिकांनी आज आपल्याला ह्या प्रसंगी स्वातंत्र्यासह श्वास घेण्याचे भाग्य दिले आहे. हा देश त्यांचा ऋणी आहे. अशा प्रत्येक महान व्यक्तीप्रती आपण श्रद्धेची भावना व्यक्त करूया.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात भारताच्या भविष्यासाठी मांडला महत्त्वाकांक्षी दृष्टीकोन

August 15th, 10:16 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या आपल्या भाषणात, भारताच्या विकासाला आकार देणे, नवोन्मेषाला चालना देणे आणि विविध क्षेत्रांमध्ये देशाला जागतिक नेता म्हणून स्थापित करण्याच्या उद्देशाने भविष्यकालीन उद्दिष्टांची मालिका रेखाटली.

भारतात साजरा झालेला 78 वा स्वातंत्र्यदिन सोहळा

August 15th, 07:30 am

पंतप्रधान मोदींनी 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या आपल्या भाषणात भारताच्या भविष्याबद्दलच्या व्हिजनची रुपरेषा मांडली. 2036 च्या ऑलिम्पिकचे आयोजन करण्यापासून ते धर्मनिरपेक्ष नागरी संहिता अंमलात आणण्यापर्यंतच्या मुद्द्यांसह भारताची सामूहिक प्रगती आणि प्रत्येक नागरिकाचे सक्षमीकरण यावर पंतप्रधान मोदींनी प्रकर्षाने भर दिला. भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा नव्या जोमाने सुरू ठेवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. नवोन्मेष, शिक्षण आणि जागतिक नेतृत्व या गोष्टी केंद्रस्थानी ठेवल्यास 2047 पर्यंत भारताला विकसित भारत बनण्यापासून काहीही रोखू शकत नाही याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्प पश्चात भारतीय उद्योग महासंघाने नवी दिल्लीत आयोजित केलेल्या परिषदेला केलेले संबोधन

July 30th, 03:44 pm

सीआयआय चे अध्यक्ष संजीव पुरी जी, येथे उपस्थित असलेले सर्व उद्योग क्षेत्रातील दिग्गज सहकारी, वरिष्ठ मुत्सद्दी, दूरदृश्य प्रणालीद्वारे देशाच्या कानाकोपऱ्यातून सहभागी झालेले उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील सर्व प्रतिनिधी, इतर सर्व मान्यवर, बंधू आणि भगिनींनो!

भारतीय उद्योग महासंघाने (सीसीआय) ने आयोजित केलेल्या ‘विकसित भारताकडे वाटचाल’ या परिषदेच्या उद्‌घाटन सत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित

July 30th, 01:44 pm

नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे सीसीआय अर्थात भारतीय उद्योग महासंघाने ‘विकसित भारताच्या दिशेने वाटचाल’ या संकल्पनेवर आयोजित केलेल्या परिषदेच्या उद्‌घाटन सत्रात पंतपधान नरेंद्र मोदी यांनी आज संबोधित केले.अलीकडेच 2024-25 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आयोजित या परिषदेचा उद्देश विकासाबद्दलच्या सरकारच्या व्यापक दृष्टिकोनाची रूपरेषा आणि उद्योगाची भूमिका मांडणे हा होता.

लोकसभेतील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावाला पंतप्रधानांनी दिलेल्या उत्तराचा मजकूर

July 02nd, 09:58 pm

माननीय राष्ट्रपतीजींनी आपल्या अभिभाषणात विकसित भारताच्या संकल्पाचा विस्तार केला आहे. माननीय राष्ट्रपती महोदयांनी महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. राष्ट्रपतीजींनी आपल्या सर्वांना आणि देशाला मार्गदर्शन केले आहे, त्याबद्दल मी राष्ट्रपतीजींचे मनःपूर्वक आभार मानतो.

राष्ट्रपतींच्या लोकसभेतील अभिभाषणाविषयीच्या आभारप्रदर्शन प्रस्तावावर पंतप्रधानांचे उत्तर

July 02nd, 04:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शन प्रस्तावाला उत्तर दिले. सभागृहाला संबोधित करताना पंतप्रधानांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल त्यांचे आभार मानले आणि या भाषणाचा केंद्रबिंदू असलेल्या विकसित भारत संकल्पनेला अधोरेखित केले. राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात महत्त्वाचे मुद्दे मांडले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आणि त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल आभार मानले.

NDA formed on principles of 'Nation First', not for power: Shri Narendra Modi Ji

June 07th, 12:15 pm

Speaking at the NDA parliamentary meeting in the Samvidhan Sadan, Shri Narendra Modi Ji said the NDA was an organic alliance and said the group worked on the principle of 'Nation First'. He asserted that the alliance was the most successful in India's political history.

Shri Narendra Modi Ji addresses the NDA Parliamentary Meet in the Samvidhan Sadan

June 07th, 12:05 pm

Speaking at the NDA parliamentary meeting in the Samvidhan Sadan, Shri Narendra Modi Ji said the NDA was an organic alliance and said the group worked on the principle of 'Nation First'. He asserted that the alliance was the most successful in India's political history.

BJP's mantra is development, development & development and YSRCP mantra is corruption, corruption & corruption: PM Modi in Anakapalle

May 06th, 04:00 pm

In his second rally of the day in Anakapalle, PM Modi underlined the NDA government's dedication to the youth of Andhra Pradesh, showcasing significant developments in the state. Institutes like IIITDM Kurnool, IIT Tirupati, and ICAR Tirupati have been established, while Visakhapatnam now boasts an IIM. Also, a Petroleum University has been inaugurated, offering abundant opportunities for the state's youth. Furthermore, PM Modi announced the approval of a Green Energy Park in Pudimadaka, emphasizing the government's focus on sustainable development and creating opportunities for the youth.