विपणन हंगाम 2023-24 साठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीला (एमएसपी) केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

June 07th, 05:35 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) विपणन हंगाम 2023-24 साठी सर्व अनिवार्य खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमतींमध्ये (एमएसपी) वाढ करायला मंजुरी दिली आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला आणखी तीन महिन्यांची (ऑक्टोबर 2022-डिसेंबर 2022) मुदतवाढ देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

September 28th, 04:06 pm

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत सर्व लाभार्थींना दरमहा प्रति व्यक्ती 5 किलो मोफत धान्याचे वितरण डिसेंबर 2022 पर्यंत सुरू राहणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 साली लोकहितार्थ केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अतिरिक्त अन्न सुरक्षा बहाल करण्याच्या अनुषंगाने, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला, सातव्या टप्प्यांतर्गत आणखी तीन महिन्यांची (ऑक्टोबर ते डिसेंबर 2022) मुदतवाढ द्यायला केंद्रिय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

सर्व सरकारी योजनांमध्ये पोषणयुक्त तांदूळ वितरणास केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

April 08th, 03:58 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने आज राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA), एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS), प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण-पीएम पोषण [पूर्वीची मध्यान्ह भोजन योजना (MDM)] आणि भारत सरकारच्या इतर कल्याणकारी योजना (OWS) अंतर्गत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये (UTs) 2024 पर्यंत टप्प्याटप्प्याने संपूर्ण लक्ष्यीत सार्वजनिक वितरण प्रणाली (TPDS) मध्ये पोषणयुक्त तांदुळाचा पुरवठा करण्यास मान्यता दिली आहे.

पंतप्रधान गुजरातमधील प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या लाभार्थ्यांशी 3 ऑगस्ट रोजी साधणार संवाद

August 01st, 09:28 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या लाभार्थ्यांशी 3 ऑगस्ट रोजी दुपारी 12:30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.