भारताच्या काही भागात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी परिस्थितीचा घेतला आढावा
July 10th, 04:37 pm
देशाच्या काही भागात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला.पंतप्रधानांनी 'अॉपरेशन दोस्त' या तुर्कीए आणि सिरियातील भूकंपग्रस्त क्षेत्रात काम करून मायदेशी परत आलेल्या राष्ट्रीय आपत्ती निवारण आणि बचाव दलाच्या जवानांशी साधलेल्या संवादाचे मराठी भाषांतर
February 20th, 06:20 pm
तुम्ही सर्व जण मानवतेसाठी एक खूप मोठे कार्य करून परतले आहात. ऑपरेशन दोस्तशी संबंधित संपूर्ण टीम, मग ते एनडीआरएफ असो, लष्कर असो, हवाई दळ असो किंवा आमचे इतर सेवा भागीदार असोत, त्यांनी अप्रतिम काम केले आहे. आणि एवढेच नव्हे तर आमच्या मुक्या मित्रांनी, श्वान पथकातील सदस्यांनीही अद्भुत क्षमता दाखवली आहे. देशाला तुम्हा सर्वांचा अभिमान आहे.भूकंपग्रस्त तुर्किए आणि सीरियामधील ‘ऑपरेशन दोस्त’ मध्ये सहभागी असलेल्या एनडीआरएफच्या जवानांशी पंतप्रधानांनी साधला संवाद
February 20th, 06:00 pm
भूकंपग्रस्त तुर्किए आणि सीरियामधील ‘ऑपरेशन दोस्त’मध्ये सहभागी असलेल्या एनडीआरएफ म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांशी पंतप्रधानांनी संवाद साधला.देवघर बचावकार्यात सहभागी झालेल्यांशी पंतप्रधानांचा संवाद
April 13th, 08:01 pm
आमच्या सोबत या मोहिमेत सहभागी असलेले गृहमंत्री अमित शाह महोदय, खासदार निशिकांत दुबे जी, गृह सचिव, लष्कर प्रमुख, हवाई दल प्रमुख, डीजीपी झारखंड, डीजी एनडीआरएफ, डीजी आयटीबीपी, स्थानिक प्रशासनातील सहकारी, आमच्या सोबत या मोहिमेत सहभागी झालेले सर्व धाडसी जवान, कमांडो, पोलीस कर्मचारी आणि इतर सहकारी,देवघर बचाव कार्यात सहभागी झालेल्यांशी पंतप्रधान मोदींनी साधला संवाद
April 13th, 08:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवघर येथे केबल कार अपघातासंबंधी बचाव कार्यात सहभागी झालेल्या भारतीय हवाई दल, भारतीय लष्कर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, इंडो-तिबेटियन सीमा पोलीस, स्थानिक प्रशासन यांचे कर्मचारी आणि नागरीकांशी आज संवाद साधला. केंद्रीय मंत्री, अमित शहा, खासदार निशिकांत दुबे, गृह मंत्रालयाचे सचिव, लष्करप्रमुख, हवाई दल प्रमुख, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे महासंचालक, इंडो-तिबेटियन सीमा पोलीस महासंचालक यावेळी उपस्थित होते.पंतप्रधानांनी एनडीआरएफच्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या
January 19th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीआरएफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या स्थापना दिनानिमित्त दलातील कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.हिमाचल प्रदेशातील आरोग्यसेवा कर्मचारी आणि कोविड प्रतिबंधक लसीकरण लाभार्थींबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेला संवाद
September 06th, 11:01 am
हिमाचल प्रदेशाने आज एका प्रधानसेवकाच्या नात्यानेच नाही तर, परिवारातल्या एका सदस्याच्या नात्यानेही, मला अभिमानाच्या क्षणाची संधी दिली आहे. छोट्या-छोट्या सुविधांसाठी संघर्ष करणारा हिमाचलही मी पाहिला आहे आणि आज विकासाची गाथा लिहीत असलेला हिमाचलही पाहत आहे. हे सगळं देवी देवतांच्या आशीर्वादाने, हिमाचल सरकारच्या कार्यकौशल्याने आणि हिमाचलच्या जनतेच्या जागरूकतेमुळे शक्य होऊ शकलं आहे. मी पुन्हा एकदा, ज्या प्रत्येकाशी संवाद साधण्याची संधी मिळाली आणि ज्या प्रकारे सगळ्यांनी आपलं म्हणणं सांगितलं त्यांचे आभार व्यक्त करतो. मी संपूर्ण संघाचे आभार व्यक्त करतो. हिमाचलने एका संघाच्या रूपात काम करण्याची अद्भुत सिद्धि प्राप्त केली आहे. माझ्याकडून आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा !!पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशमधील कोविड लसीकरण मोहिमेच्या आरोग्य कर्मचारी आणि लाभार्थ्यांशी साधला संवाद
September 06th, 11:00 am
पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशमधील कोविड लसीकरण मोहिमेत सहभागी आरोग्य कर्मचारी आणि लाभार्थ्यांशी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. राज्यपाल, मुख्यमंत्री, जे पी नड्डा, केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर, खासदार, आमदार, पंचायत नेते या समारंभास उपस्थित होते.IPS Probationers interact with PM Modi
July 31st, 11:02 am
PM Narendra Modi had a lively interaction with the Probationers of Indian Police Service. The interaction with the Officer Trainees had a spontaneous air and the Prime Minister went beyond the official aspects of the Service to discuss the aspirations and dreams of the new generation of police officers.सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी येथील प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले मार्गदर्शन
July 31st, 11:01 am
आपल्या सर्वांशी संवाद साधून मला खूप छान वाटले. दरवर्षी माझा असा प्रयत्न असतो, की आपल्यासारख्या तरुण मित्रांशी संवाद साधावा, आपले विचार जाणून घ्यावे. आपण सांगितलेल्या गोष्टी आपले प्रश्न, आपली उत्सुकता, हे सगळे मला भविष्यातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी उपयुक्त ठरतात.पंतप्रधानांनी सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये आयपीएस प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला
July 31st, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी येथे आयपीएस प्रशिक्षणार्थींना संबोधित केले. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी प्रशिक्षणार्थींशी संवाद देखील साधला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि गृह राज्य मंत्री नित्यानंद राय उपस्थित होते.गेल्या 7 वर्षात आपण सर्वांनी टीम इंडिया म्हणून काम केले: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
May 30th, 11:30 am
माझ्या प्रिय देशवासियांनो, आव्हान कितीही मोठं असो, भारतानं केलेला विजयाचा संकल्पही नेहमी तितकाच मोठा असतो. देशाची सामूहिक शक्ती आणि आपल्याकडे असलेली सेवा भावना, यांच्यामुळे देश प्रत्येक वादळातून बाहेर पडला आहे. अलिकडेच्या दिवसातूच आपण पाहिलं की, आमचे डॉक्टर्स, नर्स आणि आघाडीच्या फळीवर कार्यरत असलेले योद्धे, यांची स्वतःची चिंता न करता, रात्रंदिवस काम केलं आणि आजही ही मंडळी काम करीत आहेत. या सर्वांमध्ये कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये लढा देताना खूप मोठी भूमिका बजावणारेही काही लोक आहेत. या योद्ध्यांविषयी ‘मन की बात’ मध्ये चर्चा करावी, असा आग्रह मला ‘नमोअॅप’वर आणि पत्राच्या माध्यमातून केला गेलाय.“तौ ते” चक्रीवादळाला तोंड देण्यासाठीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी घेतली उच्च स्तरीय आढावा बैठक
May 15th, 06:54 pm
ज्या राज्यांमध्ये “तौ ते” चक्रीवादळामुळे विपरीत परिस्थिती निर्माण होऊ शकते अशा राज्यांच्या सरकारांनी आणि त्यासंदर्भात केंद्रीय मंत्रालयांनी/संस्थांनी चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे उच्च स्तरीय बैठक घेतली.दुसऱ्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाच्या समारोप समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 12th, 10:36 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुसऱ्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले. सेन्ट्रल हॉल मध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधानांनी महोत्सवाच्या तीन युवा राष्ट्रीय विजेत्यांचे विचार जाणून घेतले. लोक सभा अध्यक्ष, युवा कल्याण आणि क्रीडा राज्य मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते.दुसऱ्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाच्या समारोपाला पंतप्रधानांनी केले संबोधित
January 12th, 10:35 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुसऱ्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले. सेन्ट्रल हॉल मध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधानांनी महोत्सवाच्या तीन युवा राष्ट्रीय विजेत्यांचे विचार जाणून घेतले. लोक सभा अध्यक्ष, युवा कल्याण आणि क्रीडा राज्य मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते.आयपीएस प्रोबेशनरच्या ‘दीक्षांत संचलनाच्या वेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधानांचे संबोधन
September 04th, 11:07 am
दीक्षांत संचलन समारंभासाठी उपस्थित केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अमित शाह जी, डॉक्टर जितेंद्र सिंह जी, जी. किशन रेड्डी जी, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीतील अधिकारी आणि सळसळत्या उत्साहाने भारलेल्या, भारतीय पोलीस सेवेचे नेतृत्व करण्यास उत्सुक 71 आर मधील माझ्या सर्व युवा सहकाऱ्यांनो,पंतप्रधानांनी साधला आयपीएस प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद
September 04th, 11:06 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सरदार वल्लभाई पटेल पोलीस अकादमी येथे भारतीय पोलीस दलाच्या प्रशिक्षणार्थ्यांसमवेत दीक्षांत परेड सोहळ्याप्रसंगी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला.जर तुम्ही कुत्रा पाळण्याचा विचार करणार असाल, तर स्थानिक प्रजातीच्या श्वानाला आपल्या घरी घेऊन या, पंतप्रधानांचे मन की बात कार्यक्रमात प्रतिपादन
August 30th, 04:34 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात सोफी आणि विदा या भारतीय लष्करातील ‘चीफ ऑफ आर्मी स्टाफ कंमेंडेशन कार्डस’ या पुरस्काराने सन्मानित श्वानांचा उल्लेख केला. ते म्हणाले, आपल्या लष्करामध्ये, आपल्या सुरक्षा दलांकडे, असे कितीतरी बहादूर श्वान आहेत त्यांनी अनेक बॉम्बस्फोट आणि दहशतवादी कारवायांना रोखण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे, आयईडी आणि दारुगोळा शोधून काढल्याची त्यांनी अनेक उदाहरणे दिली. बीड पोलिसांनी साथीदार सदस्य श्वान रॉकी याला संपूर्ण सन्मानाने अखेरचा निरोप दिला, रॉकीने 300 पेक्षा अधिक गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना मदत केली होती, याचादेखील पंतप्रधानांनी उल्लेख केला.पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील रायगड येथे इमारत कोसळून झालेल्या जीवितहानी बद्दल दुःख व्यक्त केले
August 25th, 10:59 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील महाड, रायगड येथे इमारत कोसळून झालेल्या जीवितहानी बद्दल दुःख व्यक्त केले आहे. “महाराष्ट्रातील महाड, रायगड येथे इमारत कोसळण्याची घटना दुःखद आहे. या दुर्घटनेत आपल्या नातेवाईकांना गमावलेल्या कुटुंबांप्रती मी सहवेदना प्रकट करतो. दुर्घटनेतील जखमींना लवकरच बरे वाटावे ही प्रार्थना. आवश्यक ते सर्व सहाय्य करण्यासाठी स्थानिक पथके आणि एन डी आर एफ टीम घटनास्थळी हजर आहेत.” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.During Kargil War, Indian Army showed its might to the world: PM Modi during Mann Ki Baat
July 26th, 11:30 am
During Mann Ki Baat, PM Modi paid rich tributes to the martyrs of the Kargil War, spoke at length about India’s fight against the Coronavirus and shared several inspiring stories of self-reliant India. The Prime Minister also shared his conversation with youngsters who have performed well during the board exams this year.