कायदा मंत्री आणि सचिवांच्या अखिल भारतीय परिषदेच्या उद्घाटन सत्रामध्ये पंतप्रधानांनी केलेले संबोधन

October 15th, 12:42 pm

देशाच्या आणि सर्व राज्यांच्या कायदा मंत्री आणि सचिवांची ही महत्वाची बैठक, स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या भव्य पार्श्वभूमीवर होत आहे. देश आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना, लोकहितासाठी सरदार पटेल यांनी दिलेली प्रेरणा, आपल्याला योग्य दिशेला घेऊन जाईल आणि आपल्या उद्दिष्टापर्यंत देखील पोचवेल.

गुजरातच्या एकता नगर इथे होत असलेल्या विधी मंत्री आणि विधीसचिवांच्या अखिल भारतीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधन

October 15th, 12:16 pm

देशभरातील विधिमंत्री आणि विधिसचिवांच्या अखिल भारतीय परिषदेची सुरुवात आज गुजरातमध्ये झाली. या परिषदेच्या उद्घाटन सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन केले.

केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 संदर्भात पंतप्रधानांचे भाषण

February 01st, 02:23 pm

हा अर्थसंकल्प 100 वर्षातून एकदा उद्भवणाऱ्या महामारीच्या पार्श्वभूमीवर विकासाचा नवा विश्वास घेऊन आला आहे. हा अर्थसंकल्प अर्थव्यवस्थेला बळ देण्याबरोबरच सामान्य माणसासाठी अनेक नव्या संधी निर्माण करेल. हा अर्थसंकल्प अधिक पायाभूत विकास, अधिक गुंतवणूक आणि अधिक रोजगाराच्या नव्या संधींनी युक्त अर्थसंकल्प आहे. आणखी एक नवीन क्षेत्र खुले झाले आहे, आणि ते आहे हरित रोजगाराचे. हा अर्थसंकल्प तत्कालीन गरजा देखील पूर्ण करतो आणि देशातील युवकांचे उज्ज्वल भविष्य देखील सुनिश्चित करतो.

“लोकांसाठीच्या आणि प्रगतीशील अर्थसंकल्पाबद्दल पंतप्रधानांनी केले अर्थमंत्र्यांचे अभिनंदन”

February 01st, 02:22 pm

शतकातून एकदाच येणाऱ्या नैसर्गीक संकटकाळातही या वर्षीचा अर्थसंकल्प विकासाचा नवा विश्वास घेउन आला आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. हा अर्थसंकल्प अर्थव्यवस्थेला समर्थ बनवेल व सामान्यांसाठी नव्या संधींचेही निर्माण करेल. असे त्यांनी म्हटले आहे.

भारतात अर्धवाहक चकत्या(सेमीकंडक्टर चिप) आणि दृश्यपडदा (डीस्प्ले) निर्मिती परिसंस्था विकसित करण्यासाठीच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

December 15th, 04:23 pm

उद्योग 4.0 अंतर्गत डिजिटल परिवर्तनाच्या पुढच्या पायरीवर जाण्यासाठी अर्धवाहक चकत्या आणि दृश्यपडदा हे आधुनिक इलेक्ट्रॉनिक क्षेत्राचे पायाचे दगड आहेत. अर्धवाहक चकत्या आणि दृश्यपडदा ही अत्यंत गुंतागुंतीची आणि तंत्रज्ञान-केंद्रित क्षेत्रे आहेत ज्यामध्ये प्रचंड भांडवली गुंतवणूक, मोठी जोखीम, दीर्घ प्रक्रिया आणि परतावा कालावधी आणि तंत्रज्ञानात वेगाने होणारे बदल अंतर्भूत असणारी आणि लक्षणीय प्रमाणात शाश्वत गुंतवणूक करावी लागणारी प्रक्रिया आहे. हा कार्यक्रम भांडवली पाठबळ आणि तंत्रज्ञानविषयक भागीदारी यांच्या सुविधा उपलब्ध करून देऊन अर्धवाहक चकत्या आणि दृश्यपडदा निर्मिती क्षेत्राला मोठी चालना देईल.

आयुष्मान भारत डिजिटल अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

September 27th, 11:01 am

कार्यक्रमाला उपस्थित असलेले मंत्रिमंडळामधले माझे सहकारी आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया जी, मंत्रिमंडळातले माझे इतर सहकारी, वरिष्ठ अधिकारीवर्ग, देशभरातून जोडले गेलेले सरकारी आणि खासगी रूग्णालयांमधले आरोग्य अधिकारी, रूग्णालय व्यवस्थापनाशी जोडले गेलेले लोक, कार्यक्रमाला उपस्थित असलेले इतर सर्व मान्यवर आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनिंनो!

पंतप्रधानांच्या हस्ते आयुष्मान भारत डिजिटल अभियानाचा शुभारंभ

September 27th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ‘आयुष्मान भारत-डिजिटल अभियाना’चा शुभारंभ झाला.

पंतप्रधान 27 सप्टेंबर रोजी आयुषमान भारत डिजिटल मिशनचा प्रारंभ करणार

September 26th, 02:42 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयुषमान भारत डिजिटल मिशनचा शुभारंभ करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानाच्या प्रगतीची आढावा बैठक

May 27th, 03:35 pm

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक झाली.