नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे पहिल्या 'राष्ट्रीय सर्जक पुरस्कार ' वितरण प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

March 08th, 10:46 am

या कार्यक्रमाला उपस्थित माझे मंत्रिमंडळातील सहकारी अश्विनी वैष्णव जी, परीक्षक मंडळातील सदस्य प्रसून जोशी जी, रुपाली गांगुली जी, देशाच्या कानाकोपऱ्यातून येथे उपस्थित असलेले सर्व आशय निर्माते , देशातल्या काना - कोपऱ्यात हा कार्यक्रम पाहणारे माझे सर्व तरुण मित्र. आणि इतर सर्व मान्यवर, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे, तुम्हा सर्वांचे अभिनंदन. आणि तुम्ही ते लोक आहात ज्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले आहे आणि म्हणूनच तुम्ही आज त्या ठिकाणी आहात – भारत मंडपम. आणि बाहेरील चिन्ह देखील सर्जनशीलतेशी निगडीत आहे आणि हे ते ठिकाण आहे जिथे जी -20 चे सर्व प्रमुख नेते येथे जमले होते, आणि यापुढे जगाला दिशा कशी दाखवायची यावर चर्चा करत होते. आणि आज तुम्ही लोक आहात जे भारताचे भविष्य कसे घडवायचे यावर चर्चा करायला आले आहात.

पंतप्रधानांनी पहिल्या राष्ट्रीय सृजक पुरस्कार विजेत्यांशी साधला संवाद

March 08th, 10:45 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे पहिला राष्ट्रीय सृजक पुरस्कार प्रदान केला. विजेत्यांशीही त्यांनी संवाद साधला. सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सर्जनशीलतेचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली आहे.