उत्तर प्रदेशातील मेरठ येथे मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाच्या पायाभरणी प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 02nd, 01:01 pm
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल जी, येथील लोकप्रिय आणि उत्साही मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ जी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री संजीव बाल्यान जी, व्ही के सिंहजी, मंत्री श्री दिनेश खटीकजी , श्री उपेंद्र तिवारीजी, श्री कपिल देव अग्रवालजी , संसदेतील माझे सहकारी श्री सत्यपाल सिंहजी , राजेंद्र अग्रवालजी , विजयपाल सिंह तोमरजी , श्रीमती कांता कर्दमजी , आमदार भाई सोमेंद्र तोमरजी , संगीत सोमजी , जितेंद्र सतवालजी, सत्य प्रकाश अग्रवालजी, मेरठ जिल्हा परिषद अध्यक्ष गौरव चौधरीजी, मुझफ्फरनगर जिल्हा परिषद अध्यक्ष वीरपालजी, इतर सर्व लोकप्रतिनिधी आणि मेरठ-मुझफ्फरनगर, दूरदूरवरून आलेल्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, तुम्हा सर्वांना 2022 च्या खूप खूप शुभेच्छा.उत्तर प्रदेशात मेरठ येथे मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी
January 02nd, 01:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात मेरठ येथे मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी केली.अंदाजे 700 कोटी रुपये खर्चून या क्रीडा विद्यापीठाची स्थापना करण्यात येईल आणि सिंथेटिक हॉकी मैदान, फुटबॉल मैदान, बास्केटबॉल/व्हॉलीबॉल/हँडबॉल/कबड्डी मैदान, लॉन टेनिस कोर्ट, जिम्नॅशियम हॉल, सिंथेटिक रनिंग स्टेडियम, जलतरण तलाव, बहुउद्देशीय सभागृह आणि सायकल शर्यतीसाठी असणारे रिंगण यासह आधुनिक आणि अत्याधुनिक क्रीडा पायाभूत सुविधांनी हे विद्यापीठ सुसज्ज असेल. विद्यापीठात नेमबाजी, स्क्वॉश, जिम्नॅस्टिक्स, भारोत्तोलन, तिरंदाजी, कॅनोईंग आणि कयाकिंग इत्यादी सुविधाही उपलब्ध असतील.या विद्यापीठात 540 महिला आणि 540 पुरुष खेळाडूंसह 1080 खेळाडूंना प्रशिक्षण देण्याची क्षमता असेल.Cabinet approves National Mineral Exploration Policy
June 29th, 06:27 pm