ऑपरेशन सिंदूरवरील विशेष चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केलेले भाषण

ऑपरेशन सिंदूरवरील विशेष चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केलेले भाषण

July 29th, 05:32 pm

संसदेचे पावसाळी सत्र सुरू होत असताना जेव्हा मी प्रसार माध्यम प्रतिनिधींशी बोलत होतो तेव्हा मी सर्व माननीय संसद सदस्यांना आवाहन करताना एका गोष्टीचा उल्लेख केला होता. संसदेचे हे सत्र भारताच्या विजयोत्सवाचे सत्र आहे. संसदेचे हे सत्र भारताचे गौरव गान करण्याचे सत्र आहे.

ऑपरेशन सिंदूर संदर्भातील विशेष सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेला संबोधित केले

ऑपरेशन सिंदूर संदर्भातील विशेष सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेला संबोधित केले

July 29th, 05:00 pm

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताने राबवलेल्या मजबूत, यशस्वी आणि निर्णायक ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भातील विशेष चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेला संबोधित केले. सभागृहाला संबोधित करताना पंतप्रधानांनी या अधिवेशनाचे वर्णन भारताच्या विजयांचा उत्सव आणि भारताच्या गौरवाला आदरांजली असे करावे असे आवाहन संसदेच्या सर्व मान्यवर सदस्यांना केले आहे असे सांगत सत्राच्या सुरुवातीला माध्यमांच्या प्रतिनिधींशी साधलेल्या संवादाचे स्मरण केले.

Monsoon Session is a symbol of India’s rising stature, and democratic strength: PM Modi

Monsoon Session is a symbol of India’s rising stature, and democratic strength: PM Modi

July 21st, 10:30 am

PM Modi has addressed the media during the commencement of the Monsoon Session of Parliament. In his remarks, he touched upon the horrific Pahalgam massacre and lauded the unified voice of India’s political leadership in exposing Pakistan’s role. The PM also noted the global recognition of Digital India, particularly UPI. He affirmed that Naxalism and Maoism are on the decline and also hailed the success of Operation Sindoor.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आरंभापूर्वी पंतप्रधान मोदींनी प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन

July 21st, 09:54 am

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी माध्यमांशी संवाद साधला. आपल्या या प्रास्तिविकात, त्यांनी पहलगाम येथील भीषण हत्याकांडाच्या मुद्द्याला स्पर्श करत पाकिस्तानच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी भारतातील राजकीय नेतृत्वाने एकमुखाने आवाज उठविल्याची त्यांनी प्रशंसा केली. डिजिटल इंडिया, विशेषत: यूपीआयला जगभरात मान्यता मिळत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. नक्षलवाद आणि माओवादाचे प्रमाण कमी होत असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला तसेच ऑपरेशन सिंदूरच्या यशाची प्रशंसा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हिरोज एकर’ स्मारकाला भेट देऊन नामिबियाचे संस्थापक राष्ट्रपिता आणि पहिले राष्ट्राध्यक्ष ,डॉ.सॅम नुजोमा यांना वाहिली आदरांजली

July 09th, 07:42 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हिरोज एकर’ स्मारकाला भेट देऊन, नामिबियाचे संस्थापक राष्ट्रपिता आणि पहिले राष्ट्राध्यक्ष, डॉ. सॅम नुजोमा यांना आदरांजली वाहिली.

India and Trinidad & Tobago share a relationship rooted in centuries-old bonds: PM Modi in Parliament of Trinidad & Tobago

July 04th, 09:30 pm

At the invitation of the President of the Senate, H.E. Wade Mark and the Speaker of the House, H.E. Jagdeo Singh, Prime Minister Shri Narendra Modi today addressed the Joint Assembly of the Parliament of Trinidad & Tobago [T&T]. He is the first Prime Minister from India to address the T&T Parliament and the occasion marked a milestone in India-Trinidad & Tobago bilateral relations.

PM Modi addresses joint session of parliament of Trinidad & Tobago

July 04th, 09:00 pm

PM Modi addressed the Joint Assembly of the Parliament of Trinidad & Tobago. He noted that India was privileged to stand in solidarity with the people of Trinidad & Tobago on their path to freedom. He further emphasised that the deep-rooted bonds between the two countries as modern nations have gone from strength to strength.

घाना प्रजासत्ताकाच्या संसदेला पंतप्रधानांनी केलेले संबोधन

July 03rd, 03:45 pm

भूमीवर येणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाचा प्रतिनिधी म्हणून मी माझ्या समवेत 140 कोटी भारतीयांच्या सद्भावना आणि शुभेच्छा घेऊन आलो आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घानाच्या संसदेला केले संबोधित

July 03rd, 03:40 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज घानाच्या संसदेत आयोजित विशेष अधिवेशनाला संबोधित केले आणि असे करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. घानाच्या संसदेचे अध्यक्ष अल्बन किंग्सफर्ड सुमाना बॅगबिन यांच्या अध्यक्षतेखाली हे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. या अधिवेशनाला, घाना आणि भारताचे संसद सदस्य, शासकीय अधिकारी यांच्यासह निमंत्रित मान्यवर पाहुणे उपस्थित होते.

नवी दिल्ली येथे विज्ञान भवनामध्ये आयोजित आचार्य श्री विद्यानंद महाराज यांच्या शताब्दी कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

June 28th, 11:15 am

परम श्रध्देय आचार्य प्रज्ञ सागर महाराज जी, श्रवण बेळगोळच्या मठाचे मठाधिपती स्वामी चारूकीर्ती जी, माझे सहकारी गजेंद्रसिंह शेखावत, संसदेतील माझे सहकारी नवीन जैन, भगवान महावीर अहिंसा भारती न्यासाचे अध्यक्ष प्रियंक जैन, सचिव ममता जैन, विश्वस्त पीयूष जैन आणि उपस्थित असलेले सर्व सन्माननीय, संतवर्ग, भगिनी आणि सद्गृहस्थ हो, जय जिनेंद्र!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचार्य श्री विद्यानंदजी महाराज यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याला संबोधित केले

June 28th, 11:01 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, 28 जून 2025 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आचार्य श्री विद्यानंदजी महाराज यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याला संबोधित केले.

श्री नारायण गुरु आणि गांधीजी यांच्यातील संवादाच्या शताब्दीनिमित्त आयोजित समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

June 24th, 11:30 am

आज हा परिसर देशाच्या इतिहासातील एका अभूतपूर्व घटनेचे स्मरण करण्याचा साक्षीदार होतो आहे. ती एक अशी ऐतिहासिक घटना होती, ज्या घटनेने आपल्या स्वातंत्र्य चळवळीला केवळ एक नवीन दिशा दिली नाही तर स्वातंत्र्याच्या उद्दिष्टाला, स्वतंत्र भारताच्या स्वप्नाला ठोस अर्थ दिला. शंभर वर्षांपूर्वीची श्री नारायण गुरु आणि महात्मा गांधी यांची ती भेट आजही तितकीच प्रेरणादायी आणि प्रासंगिक आहे. शंभर वर्षांपूर्वी झालेली ती भेट आजही सामाजिक सौहार्द आणि विकसित भारताच्या सामूहिक उद्दिष्टांसाठी उर्जेचा एक मोठा स्रोत आहे. या ऐतिहासिक प्रसंगी, मी श्री नारायण गुरुंच्या चरणी प्रणाम करतो. गांधीजींनाही मी आदरांजली वाहतो.

श्री नारायण गुरू आणि महात्मा गांधी यांच्यातील ऐतिहासिक संवादाच्या शताब्दी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित

June 24th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवनात भारताचे दोन महान आध्यात्मिक आणि नैतिक नेते श्री नारायण गुरू आणि महात्मा गांधी यांच्यातील ऐतिहासिक संवादाच्या शताब्दी समारंभाला संबोधित केले. या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी आदरपूर्वक अभिवादन केले आणि सांगितले की आज हे ठिकाण देशाच्या इतिहासातील एका अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार आहे. आपल्या स्वातंत्र्यचळवळीला नवी दिशा देणारी ही एक ऐतिहासिक घटना होती, स्वतंत्र भारताच्या स्वप्नाला आणि स्वातंत्र्याच्या उद्दिष्टांना तिने ठोस अर्थ दिला,असे त्यांनी सांगितले. श्री नारायण गुरू आणि महात्मा गांधी यांच्यात 100 वर्षांपूर्वी झालेली ही भेट आजही प्रेरणादायी आणि प्रासंगिक आहे, आणि सामाजिक सलोखा आणि विकसित भारताच्या सामूहिक उद्दिष्टांसाठी उर्जेचा एक शक्तिशाली स्रोत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. या ऐतिहासिक प्रसंगी, त्यांनी श्री नारायण गुरूंच्या चरणी वंदन केले आणि महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना त्यांच्या बलिदान दिनानिमित्त आदरांजली वाहिली

June 23rd, 09:02 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना त्यांच्या बलिदान दिनानिमित्त आदरांजली वाहिली आहे.

भारतातील तरुणांनी जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला आहे, आमची युवा शक्ती गतिमानता, नवोन्मेष आणि दृढनिश्चयाचे प्रतीक आहे: पंतप्रधान

June 06th, 10:42 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या युवकांच्या जागतिक कामगिरीवर प्रकाश टाकला आणि सांगितले की, भारताच्या युवकांनी जागतिक स्तरावर एक ठसा उमटवला आहे. स्टार्टअप्स, विज्ञान, क्रीडा, सामुदायिक सेवा आणि संस्कृती यासह विविध क्षेत्रांमध्ये तरुण भारतीयांनी दिलेल्या असाधारण योगदानाची दखल मोदी यांनी घेतली. गेल्या 11 वर्षांत, आपण अशा अनेक उल्लेखनीय घटना पाहिल्या आहेत ज्यामध्ये आपल्या युवकांनी अकल्पनीय कामगिरी केली आहे, असे ते म्हणाले.

भोपाळ येथील देवी अहिल्याबाई महिला सशक्तिकरण महासंमेलनात विविध प्रकल्पांच्या शुभारंभाच्या वेळी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणातील मजकूर

May 31st, 11:00 am

मध्य प्रदेशचे राज्यपाल श्री मंगूभाई पटेल, आमचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री मोहन यादव जी, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आमच्याशी जोडलेले केंद्रीय मंत्री इंदूरचे तोखन साहू जी, दतियाहून राम मोहन नायडू जी, सतना इथून मुरलीधर मोहोळ जी, राज्याचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा जी, राजेंद्र शुक्ला जी, लोकसभेतील माझे सहकारी व्ही. डी. शर्मा जी, इतर मंत्री महोदय, लोकप्रतिनिधी आणि येथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो….

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशात भोपाळ येथे लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त आयोजित महिला सशक्तीकरण महासंमेलनाला केले संबोधित

May 31st, 10:27 am

लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशात भोपाळ येथे लोकमाता देवी अहिल्याबाई महिला सशक्तीकरण महासंमेलनात सहभागी झाले. यावेळी त्यांनी भोपाळमध्ये अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी देखील केली. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी 'माँ भारती'ला अभिवादन केले आणि भारतातील महिलांच्या सामर्थ्याचे महत्त्व विशद करत आपल्या संबोधनाची सुरूवात केली. या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या भगिनी आणि कन्यांच्या मोठ्या संख्येतील उपस्थितीबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर यांची आज असलेली 300 वी जयंती म्हणजे 140 कोटी भारतीयांसाठी प्रेरणादायी दिवस आहे आणि राष्ट्रउभारणीच्या उल्लेखनीय प्रयत्नांमध्ये योगदान देण्याचा क्षण आहे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. देवी अहिल्याबाई यांचे विचार उद्धृत करत, खरे शासन म्हणजे लोकांची सेवा करणे आणि त्यांचे जीवनमान सुधारणे हे आहे, असे त्यांनी सांगितले. आजचा कार्यक्रम त्यांच्या दृष्टीकोनाला सामावून घेणारा आणि त्यांच्या सिद्धांतांना पुढे नेणारा आहे, असे त्यांनी नमूद केले. दतिया आणि सतनासाठी एयर कनेक्टिव्हिटीच्या समावेशाबरोबरच इंदूर मेट्रोचा शुभारंभ होत असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पांमुळे मध्य प्रदेशातील पायाभूत सुविधांमध्ये वाढ होईल, विकासाला चालना मिळेल आणि नव्या रोजगार संधी निर्माण होतील यावर त्यांनी भर दिला.

गुजरातमधील दाहोद येथे विविध विकास कामांच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

May 26th, 11:45 am

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र भाई, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, गुजरात सरकारच्या मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी, खासदार, आमदार आणि इतर सर्व मान्यवर आणि दाहोदचे माझे प्रिय बंधू आणि भगिनी, कसे आहात आपण? जरा मोठय़ा आवाजात उत्तर द्या, आता दाहोदचा प्रभाव वाढला आहे. आज 26 मे आहे. 2014 मध्ये आजच्याच दिवशी मी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. तिरंगा झेंडा हवा आहे, तुम्ही गुजरातच्या जनतेने मला भरभरून आशीर्वाद दिला आणि नंतर देशातील कोट्यवधी जनतेनेही मला आशीर्वाद देण्यात कोणतीही कसर सोडली नाही. तुमच्या आशीर्वादाच्या बळावर मी दिवसरात्र देशवासीयांच्या सेवेत आहे. या वर्षांमध्ये देशाने असे निर्णय घेतले, जे अकल्पनीय होते, ते अभूतपूर्व आहेत. या वर्षांमध्ये देशाने अनेक दशकांच्या गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या, देश प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहे. आज देश निराशेच्या अंधारातून बाहेर येऊन श्रद्धेच्या प्रकाशात तिरंगा झेंडा फडकवत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील दाहोद येथे 24,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण

May 26th, 11:40 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील दाहोद येथे 24,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण केले. उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की, 26 मे या दिवसाला विशेष महत्व आहे कारण 2014 मध्ये आजच्याच दिवशी त्यांनी पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. देशाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवणाऱ्या गुजरातच्या जनतेच्या अढळ पाठिंब्याचा आणि आशीर्वादाचा त्यांनी उल्लेख केला. या विश्वासाने आणि प्रोत्साहनाने देशाची दिवसरात्र सेवा करण्याप्रति त्यांच्या समर्पणाला बळ दिले आहे असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. गेल्या काही वर्षांमध्ये भारताने असे काही निर्णय घेतले आहेत जे अभूतपूर्व आणि अकल्पनीय होते, दशकांच्या जुन्या बंधनांमधून मुक्त होत आज देश प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे. आज, देश निराशेच्या आणि अंधाराच्या युगातून आत्मविश्वास आणि आशावादाच्या नवीन युगात उदयाला आला आहे, असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (122 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

May 25th, 11:30 am

आज संपूर्ण देश दहशतवादाविरुद्ध एक झाला आहे, संतापानं क्रुद्ध आहे, संकल्पसिद्ध आहे. आज प्रत्येक भारतीयाचा एकच निर्धार आहे, की 'आपल्याला दहशतवाद संपवायचाच आहे.'