आयआयटी चेन्नई येथे आयोजित सिंगापूर-भारत हॅकाथॉनमध्ये पंतप्रधानांचे भाषण
September 30th, 11:46 am
काम उत्तमपणे पार पडल्याचं समाधान मला दिसत आहे. मला असे वाटते की, चेन्नईचा विशेष ब्रेकफास्ट – इडली, डोसा, वडा – सांभार यातून देखील हे समाधान मिळाले आहे. चेन्नई शहराने केलेलं आदरातिथ्य असामान्य आहे. मला विश्वास आहे की, इथे आलेली प्रत्येक व्यक्ती आणि सिंगापूरहून आलेले पाहुणे इथल्या वास्तव्याचा नक्कीच आनंद घेतील.देशातल्या समस्या सोडविण्यासाठी उपाय सुचवण्याचे पंतप्रधानांचे विद्यार्थ्यांना आवाहन
September 30th, 11:45 am
भारतासमोरच्या समस्यांवर विद्यार्थ्यांनी सोपे उपाय शोधावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. 36 अवर सिंगापूर इंडिया हॅकेथॉनची आज आयआयटी चेन्नई इथे सांगता झाली. त्यावेळी पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. हे उपाय भारत संपूर्ण जगाला विशेषत: गरीब राष्ट्रांना देऊ इच्छितो, असे ते म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. इथे जमलेल्या प्रत्येक युवा मित्राचे विशेषत: विद्यार्थी मित्रांचे अभिनंदन. आव्हानांना सामोरे जाण्याची आणि त्यावर सहज साध्य उपाय शोधण्याची आपली इच्छा, चैतन्य आणि उत्साह, केवळ स्पर्धा जिंकण्यापेक्षा अधिक मोलाचा आहे, असे पंतप्रधान म्हणाले.नानयांग तंत्रज्ञान विद्यापीठाला दिली पंतप्रधानांनी भेट
June 01st, 01:32 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिंगापूरमधील नानयांग तंत्रज्ञान विद्यापीठाला भेट दिली. विद्यार्थ्यांबरोबर साधलेल्या संवादात त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर दौऱ्याआधी पंतप्रधानांचे वक्तव्य
May 28th, 10:05 pm
‘मी 29 मे ते 2 जून 2018’ या कालावधीत इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर जात आहे. या तिन्ही देशांबरोबर भारताची मजबूत धोरणात्मक भागीदारी आहे.