पंतप्रधान 24 एप्रिल रोजी स्वामित्व योजनेंतर्गत ई-मालमत्ता कार्डचे वितरण करणार

April 23rd, 07:07 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 एप्रिल 2021 रोजी (राष्ट्रीय पंचायती राज दिन ) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दुपारी 12 वाजता स्वामित्व योजनेंतर्गत ई-मालमत्ता कार्डचे वितरण करणार आहेत. यावेळी 4.09 लाख मालमत्ताधारकांना ई-मालमत्ता कार्ड दिली जातील, याद्वारे देशभरात स्वामित्व योजनेची देशभरात अंमलबजावणी देखील सुरु होईल. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.