देशातील महिला विकसित भारत संकल्प यात्रेच्या प्रमुख भागीदार

November 30th, 01:26 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विकसित भारत संकल्प यात्रेतील लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. त्यांनी प्रधानमंत्री महिला किसान ड्रोन केंद्राचेही उदघाटन केले. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी एम्स, देवघर येथील 10,000 जनौषधी केंद्राचे लोकार्पण केले. यावेळी, मोदींनी देशातील जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत नेण्याच्या कार्यक्रमासही आरंभ केला.महिला बचत गटांना ड्रोन पुरवणे आणि जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत वाढवणे या दोन्ही उपक्रमांची घोषणा पंतप्रधानांनी वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात केली होती. या आश्‍वासनांची पूर्ती या कार्यक्रमाने झाली आहे.