नवी दिल्लीत एनसीसी/एनएसएस छात्रसैनिकांशी संवाद साधताना पंतप्रधानांच्या संबोधनातील मजकूर
January 24th, 03:26 pm
तुम्ही नुकतेच येथे जे सांस्कृतिक सादरीकरण केले ते पाहून मला अभिमानास्पद वाटले. राणी लक्ष्मीबाईंचे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व आणि इतिहासातील घटना तुम्ही अवघ्या काही क्षणांत साकारल्या. आपण सर्वच या घटनांशी परिचित आहोत, परंतु तुम्ही ज्या प्रकारे ते सादर केले ते खरोखर मनोहारी आहे. तुम्ही प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होणार आहात आणि यावेळी तो दोन कारणांमुळे अधिक खास झाला आहे. हा 75 वा प्रजासत्ताक दिन आहे आणि दुसरे म्हणजे, पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाचे संचलन देशाच्या स्त्री शक्तीला समर्पित आहे. आज मी देशाच्या विविध भागातून एवढ्या मोठ्या संख्येने मुली येथे येताना पाहत आहे. तुम्ही इथे एकट्या आलेल्या नाहीत, तर तुम्ही सर्वांनी तुमच्या राज्यांचा दरवळ, वेगवेगळ्या चालीरीतींचा अनुभव आणि तुमच्या समाजाची समृद्ध विचारसरणी तुमच्यासोबत आणली आहे. आज तुमची भेट हा एक खास प्रसंग आहे. आज राष्ट्रीय बालिका दिन आहे. आजचा दिवस मुलींच्या धैर्याची, भावनेची आणि कर्तृत्वाची प्रशंसा करण्याचा आहे. समाज आणि देश सुधारण्याची क्षमता मुलींमध्ये असते. इतिहासाच्या वेगवेगळ्या कालखंडात भारताच्या मुलींनी त्यांच्या दृढ हेतूने आणि समर्पणाच्या भावनेने अनेक मोठ्या बदलांचा पाया रचला आहे. काही वेळापूर्वी तुम्ही केलेल्या सादरीकरणातूनही ही भावना प्रतीत होते.पंतप्रधानांनी एनसीसी छात्रसैनिक आणि एनएसएसच्या स्वयंसेवकांना केले संबोधित
January 24th, 03:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) छात्रसैनिक आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) स्वयंसेवकांना संबोधित केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनाचे चित्रण करणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा अभिमानाने उल्लेख केला . ते म्हणाले की या कार्यक्रमामुळे आज भारताचा इतिहास जिवंत झाला आहे.The devotion of the people is unparalleled, and their love is my good fortune: PM Modi
January 17th, 01:55 pm
Prime Minister Narendra Modi addressed the Shakthikendra Incharges Sammelan in Kochi, Kerala. He expressed his heartfelt gratitude for the love and warmth received from the people of Kerala. He acknowledged the overwhelming response, from the moment he landed at Kochi Airport to the thousands who blessed him along the way.PM Modi addresses the Shakthikendra Incharges Sammelan in Kochi, Kerala
January 17th, 01:51 pm
Prime Minister Narendra Modi addressed the Shakthikendra Incharges Sammelan in Kochi, Kerala. He expressed his heartfelt gratitude for the love and warmth received from the people of Kerala. He acknowledged the overwhelming response, from the moment he landed at Kochi Airport to the thousands who blessed him along the way.मन की बात, डिसेंबर 2023
December 31st, 11:30 am
नमस्कार, माझ्या प्रिय देशवासियांनो. ‘मन की बात’ म्हणजे तुम्हां सगळ्यांना भेटण्याची एक शुभ संधीच, आणि जेव्हा आपण आपल्या कुटुंबियांना भेटतो तो क्षण खूपच आनंददायी आणि समाधानकारक असतो. ‘मन की बात’ च्या माध्यमातून मी जेव्हा तुम्हाला भेटतो तेव्हा मला देखील हाच अनुभव येतो, आणि आज आपल्या एकत्रित प्रवासाचा हा 108 वा भाग आहे. आपल्याकडे 108 या अंकाचे महत्व, त्याचे पावित्र्य हा एक सखोल अध्ययनाचा विषय आहे. जपमाळेतील 108 मणी, 108 वेळा होणारा जप, 108 दिव्य क्षेत्र, मंदिरांच्या 108 पायऱ्या, 108 घंटा, 108 हा आकडा अपार श्रद्धेशी निगडीत आहे. म्हणूनच ‘मन की बात’ चा हा 108 वा भाग माझ्यासाठी अजूनच खास झाला आहे. या 108 भागांमध्ये आपण लोकसहभागाची अनेक उदाहरणे पहिली आहेत, त्यांच्याकडून प्रेरणा घेतली आहे. आता या टप्प्यावर पोहोचल्यानंतर, आपल्याला नवीन जोमाने, नवीन उर्जेसह आणि अधिक वेगाने आगेकूच करण्याचा संकल्प केला पाहिजे. उद्याचा सूर्योदय हा 2024 चा पहिला सूर्योदय असणार आहे हा किती सुखद योगायोग आहे; आपण 2024 मध्ये प्रवेश केला असेल. तुम्हां सर्वाना 2024 च्या हार्दिक शुभेच्छा.विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 09th, 12:35 pm
मोदींची हमी देणाऱ्या वाहनांसाठी प्रत्येक गावात जो उत्साह दिसतो आहे तो भारताच्या कानाकोपऱ्यात दिसतो आहे. मग ते उत्तर असो, दक्षिण असो, पूर्व असो, पश्चिम असो किंवा अगदी लहान गाव किंवा मोठे गाव असो आणि काही गोष्टी समजल्यानंतर मी पाहिले आहे की, या वाहनाचा मार्ग जरी नसला तरीही लोक येऊन गावाच्या रस्त्यावर वाहन उभे करतात आणि सर्व माहिती घेतात, हे विलक्षण आहे. आणि मी काही लाभार्थींशी संवाद साधला आहे मला सांगण्यात आले की, या यात्रे दरम्यान 1.5 लाखाहून अधिक लाभार्थींना त्यांचे अनुभव कथन करण्याची संधी मिळाली आणि हे अनुभव नोंदवलेही गेले आहेत. आणि गेल्या 10-15 दिवसात गावातील लोकांच्या भावना काय आहेत, योजनांचे लाभ मिळाले आहेत का, त्यांची पूर्ण अंमलबजावणी झाली आहे की नाही हे मी वेळोवेळी पाहिले आहे. त्यांना सर्व तपशील माहीत आहेत. जेव्हा मी तुमच्या चित्रफिती पाहतो, तेव्हा माझ्या गावातील लोक त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या सरकारी योजनांचा योग्य प्रकारे उपयोग कसा करतात हे पाहून मला खूप आनंद होतो.आता बघा कुणाला कायमस्वरूपी घर मिळाले तर त्याला असे वाटते की आयुष्याची एक नवीन सुरुवात झाली आहे. एखाद्याला नळाद्वारे पाणी मिळाले तर त्याला वाटते की आजपर्यंत आपण पाण्यासाठी त्रासात जगत होतो, आज आपल्या घरात पाणी पोहोचले आहे.एखाद्याला शौचालय मिळाले तर त्याला इज्जत घर मिळाले असे वाटते.आणि जुन्या काळी केवळ प्रथितयश लोकांच्या घरात शौचालय असायचे, आता आमच्या घरात शौचालय आहे. त्यामुळे तो सामाजिक प्रतिष्ठेचाही विषय बनला आहे.आता तर आपल्या घरात शौचालये असतात. त्यामुळे तो सामाजिक प्रतिष्ठेचाही विषय बनला आहे.कुणाला मोफत उपचार मिळाले आहेत, कुणाला मोफत रेशन मिळाले आहे, कुणाला गॅस जोडणी मिळाली आहे, कुणाला वीज जोडणी मिळाली आहे, कुणी बँक खाते उघडले आहे, कुणाला पीएम किसान सन्मान निधी,कुणाला पीएम पीक विम्याचा लाभ मिळाला आहे, काहींना पीएम स्वानिधी योजनेद्वारे मदत मिळाली आहे, काहींना पीएम स्वामित्व योजनेद्वारे मालमत्ता कार्ड मिळाले आहेत, म्हणजे मी योजनांची नावे सांगितली तर, मी पाहत होतो, भारताच्या कानाकोपऱ्यात गोष्टी पोहोचल्या आहेत. देशभरातील खेड्यापाड्यातील कोट्यवधी कुटुंबांना आपल्या सरकारच्या कोणत्या ना कोणत्या योजनेचा नक्कीच फायदा झाला आहे. आणि जेव्हा हा लाभ मिळतो तेव्हा एखाद्याचा विश्वास वाढतो. आणि जेव्हा या विश्वासाने जेव्हा छोटासा लाभ जरी मिमिळाला तरी जीवन जगण्यासाठी एक नवे बळ मिळते. आणि त्यासाठी त्यांना वारंवार कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज पडली नाही. भीक मागण्याची जी मनःस्थिती असायची ती आता गेली आहे. सरकारने लाभार्थ्यांची ओळख निश्चित केली आणि नंतर त्यांना लाभ देण्यासाठी पावले उचलली. म्हणूनच आज लोक म्हणतात मोदींची हमी म्हणजे हमी, पूर्णत्वाची हमी.पंतप्रधानांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थींशी साधला संवाद
December 09th, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. या योजनांचा लाभ सर्व लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत कालबद्ध रीतीने पोहचेल हे सुनिश्चित करून सरकारच्या प्रमुख योजना तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा देशभरात सुरु करण्यात आली आहे.नमो ऍपवरील 'विकसित भारत सदिच्छादूत' प्रारुपामध्ये प्रभावी कामे करण्याचे 100 दिवसांचे आव्हान स्वीकारण्याचे पंतप्रधानांचे नागरिकांना आवाहन
December 07th, 04:47 pm
नमो ऍपवरील 'विकसित भारत सदिच्छादूत'' प्रारुपामध्ये प्रभावी कामे करण्याचे 100 दिवसांचे आव्हान स्वीकारण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना केले आहे.विकसित भारताचे सदिच्छादूत असणे हा सामर्थ्य एकवटण्याचा,विकासाचा अजेंडा पसरवण्याचा आणि विकसित भारताचे आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्या उर्जेचा वापर करण्याचा एक आदर्श मार्ग आहे असेही ते म्हणाले.PM invites citizens to become Viksit Bharat Ambassadors
November 30th, 06:00 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi has urged citizens to become Viksit Bharat Ambassadors and amplify the message of development.विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
November 30th, 12:00 pm
या कार्यक्रमाशी जोडल्या गेलेल्या विविध राज्यांचे राज्यपाल, या राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्र आणि राज्य सरकारांतील मंत्री, संसद सदस्य तसेच आमदार आणि गावागावांतून या कार्यक्रमात सहभागी झालेले माझे प्रिय बंधू-भगिनींनो, मातांनो, माझ्या शेतकरी बंधू-भगिनींनो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या तरुण सहकाऱ्यांनो,विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद
November 30th, 11:27 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. प्रधानमंत्री महिला किसान ड्रोन केंद्राचाही त्यांनी प्रारंभ केला. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी एम्स, देवघर येथे ऐतिहासिक 10,000 व्या जन औषधी केंद्राचे लोकार्पण केले.देशातील जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत वाढवण्याचा कार्यक्रमही मोदी यांनी यावेळी सुरू केला. यापूर्वी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान, महिला बचत गटांना ड्रोन पुरवणे आणि जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत वाढवणे या या दोन्ही उपक्रमांची घोषणा पंतप्रधानांनी केली होती. या आश्वासनांची पूर्तता झाल्याची साक्ष आजचा हा कार्यक्रम आहे. . झारखंडमधील देवघर, ओदीशातील रायगढ़, आंध्र प्रदेशातील प्रकाशम, अरुणाचल प्रदेशातील नामसाई आणि जम्मू-काश्मीरमधील अरनिया येथील लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी संवाद साधला.पंतप्रधानांनी नागरिकांना 'व्होकल फाॅर लोकल' होण्याचे केले आवाहन
November 08th, 01:49 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनतेला डिजिटल माध्यमांचा वापर करत स्थानिक प्रतिभावान उत्पादकांच्या वस्तूंची खरेदी करून भारताच्या उद्योगशीलता आणि सर्जनशीलतेला समर्थन देण्याचे आवाहन केले आहे.PM Modi’s Mega Election Rallies in Damoh, Guna & Morena, Madhya Pradesh
November 08th, 11:30 am
The campaigning in Madhya Pradesh has gained momentum as Prime Minister Narendra Modi has addressed multiple rallies in Damoh, Guna and Morena. PM Modi said, Today, India's flag flies high, and it has cemented its position across Global and International Forums. He added that the success of India's G20 Presidency and the Chandrayaan-3 mission to the Moon's South Pole is testimony to the same.देशभरात व्होकल फॉर लोकल चळवळीला मोठी चालना: पंतप्रधान
November 06th, 06:24 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात व्होकल फॉर लोकल चळवळीला मोठी चालना मिळत असल्याचे सांगत, स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणारा एक प्रेरणादायी व्हिडिओ सामायिक केला आहे. मोदींनी नागरिकांना नमो अॅपवर स्वदेशी उत्पादनांसह सेल्फी सामायिक करण्याचे आणि यूपीआय द्वारे पेमेंट करण्याचे आवाहन केले.मीराबाई आपल्या देशातील महिलांसाठी प्रेरणा: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये
October 29th, 11:00 am
माझ्या प्रिय कुटुंबियांनो, नमस्कार ! ‘मन की बात’ मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. हा भाग, देशभरात सर्वत्र सणांचा उत्साह असताना होत आहे. आपणा सर्वांना येणाऱ्या सर्व सणांसाठी खूप खूप शुभेच्छा!नमो अॅपमध्ये असा एक विशिष्ट विभाग आहे जो जनतेला स्थानिक खासदारांशी संपर्क साधण्यात मदत करतो- पंतप्रधानांनी दिली माहिती
October 16th, 09:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे की, नमो अॅपमध्ये असलेला एक विशिष्ट विभाग जनतेला स्थानिक खासदारांशी जोडून ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतो. ते म्हणाले की हा विभाग आपल्या लोकशाहीवादी प्रेरणेला आणखी चालना देण्यासाठी दीर्घकाळ मदत करेल. ते पुढे म्हणाले की हा विभाग लोकांना त्यांच्या भागातील स्थानिक खासदाराशी असलेला संपर्क अधिक दृढ करणे शक्य करून देतो, या खासदारांसोबत काही बाबी ठरवणे सुलभ होण्यासाठी उपयुक्त ठरतो आणि सरकारतर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांमध्ये भाग घेण्यात मदत देखील करतो.I consistently encourage our dedicated karyakartas to incorporate Deendayal Ji's seven sutras into their lives: PM Modi
September 25th, 07:31 pm
Addressing the BJP karyakartas on the birth anniversary of Pandit Deendayal Upadhyaya in New Delhi, Prime Minister Narendra Modi expressed, I am honored to inaugurate his statue at 'Pt. Deendayal Upadhyaya Park' in Delhi, and it's truly remarkable that we are witnessing this wonderful and happy coincidence moment. On one side, we have Deendayal Upadhyaya Park, and right across stands the headquarters of the Bharatiya Janta Party. Today, the BJP has grown into a formidable banyan tree, all thanks to the seeds he sowed.PM Modi pays tribute to Pt. Deendayal Upadhyaya in Delhi
September 25th, 07:09 pm
Addressing the BJP karyakartas on the birth anniversary of Pandit Deendayal Upadhyaya in New Delhi, Prime Minister Narendra Modi expressed, I am honored to inaugurate his statue at 'Pt. Deendayal Upadhyaya Park' in Delhi, and it's truly remarkable that we are witnessing this wonderful and happy coincidence moment. On one side, we have Deendayal Upadhyaya Park, and right across stands the headquarters of the Bharatiya Janta Party. Today, the BJP has grown into a formidable banyan tree, all thanks to the seeds he sowed.नमो अॅपवर प्रकाशित गरिब कल्याणासाठी समर्पित गेल्या नऊ वर्षातील तपशीलवार माहिती पंतप्रधानांनी केली सामायिक
June 01st, 10:22 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमो अॅपवर प्रकाशित गरिब कल्याणासाठी समर्पित गेल्या नऊ वर्षातील तपशीलवार माहिती सामायिक केली आहे.नमोअॅप अभियानाच्या साथीने अमृत महोत्सव साजरा करताना
August 16th, 08:00 am
आपण स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात पदार्पण करत असल्याने आपण सर्वांनी मिळून राष्ट्रउभारणीमध्ये योगदान देऊया. #NaMoAppAbhiyaan मध्ये सहभागी होऊन तुमचा पाठिंबा दर्शवा.