ब्रह्मपुत्रा नदीखाली एचडीडी पद्धतीने बांधण्यात आलेली 24 इंच व्यासाची नैसर्गिक वायू पाइपलाइन या ईशान्य गॅस ग्रीड प्रकल्पातील महत्त्वाचा टप्प्याची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
April 26th, 02:53 pm
ब्रह्मपुत्रा नदीखाली एचडीडी पद्धतीने बांधण्यात आलेली 24 इंच व्यासाची नैसर्गिक वायू पाइपलाइन हा ईशान्य गॅस ग्रीड प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.गुवाहाटी येथे झालेल्या बिहू कार्यक्रमातील पंतप्रधानांचे भाषण
April 14th, 06:00 pm
आजचे हे दृश्य, टेलिव्हिजनवर बघणारा असो, इथे कार्यक्रमात हजर असणारे असो आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. हे अविस्मरणीय आहे, अद्भुत आहे, अभूतपूर्व आहे, हा आसाम आहे. आसमंतात घुमणारा ढोल, पेपा अरु गॉगोनाचा आवाज संपूर्ण हिंदुस्तान ऐकत आहे. आसामच्या हजारो कलाकारांची ही मेहनत, हे परिश्रम, हा समन्वय आज सगळं जग मोठ्या अभिमानाने बघत आहे. एक तर इतका मोठा क्षण आहे, उत्सव इतका मोठा आहे, दुसरं म्हणजे आपला उत्साह आणि आपली भावना याला तोड नाही. मला आठवतं, जेव्हा विधानसभा निवडणुकांच्या काळात मी इथे आलो होतो, तेव्हा म्हणालो होतो की तो दिवस दूर नाही, जेव्हा लोग A पासून Assam म्हणतील. आज खरोखरच आसाम, A-One प्रदेश बनत आहे. मी आसामच्या लोकांना, देशाच्या लोकांना बिहुच्या अनेक अनेक शुभेच्छा देतो.आसाममध्ये गुवाहाटी येथे सारुसजाई स्टेडियममध्ये पंतप्रधानांनी केली 10,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण
April 14th, 05:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममध्ये गुवाहाटी येथे सारुसजाई स्टेडियममध्ये 10,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण केले. या प्रकल्पांमध्ये पलाशभरी आणि सुआलकुची यांना जोडणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीवरील पुलाची पायाभरणी, शिवसागरमध्ये रंगघरच्या सुशोभीकरणाचा प्रकल्प यांची पायाभरणी, नामरुप येथील 500 टीपीडी मेन्थॉल प्रकल्पाचे उद्घाटन यांचा समावेश होता. यावेळी पंतप्रधानांनी दहा हजारांपेक्षा जास्त बिहू नर्तकांचा सहभाग असलेल्या बिहू नृत्याच्या रंगतदार सादरीकरणाचा देखील आनंद घेतला.जागतिक शांततेसाठी आयोजित कृष्णगुरु एकनाम अखंड कीर्तनातील पंतप्रधानांचे भाषण
February 03rd, 07:48 pm
कृष्णगुरु सेवाश्रमात जमलेल्या सर्व संत-ऋषीजनांना आणि भक्तांना माझे विनम्र अभिवादन. कृष्णगुरु एकनाम अखंड कीर्तनाचा हा कार्यक्रम गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. मला आनंद आहे की कृष्णगुरुजींनी पुढे नेलेली ज्ञान, सेवा आणि मानवतेची प्राचीन भारतीय परंपरा आजही अखंडपणे गतीमान आहे. गुरुकृष्ण प्रेमानंद प्रभूजींच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सहकार्याने तसेच कृष्णगुरुंच्या भक्तांच्या प्रयत्नांमुळे या कार्यक्रमात ती दिव्यता स्पष्टपणे दिसून येते. या निमित्ताने आसाममध्ये येऊन तुम्हा सर्वांसह या कार्यक्रमात सहभागी व्हावे अशी माझी इच्छा होती! कृष्णगुरुजींच्या पवित्र तपोभूमीत येण्यासाठी मी यापूर्वी अनेकदा प्रयत्न केले आहेत. पण कदाचित माझ्या प्रयत्नातच काही कमतरता होती की इच्छा असूनही मी आत्तापर्यंत तिथे येऊ शकलो नाही. कृष्णगुरुंच्या आशीर्वादाने मला येणाऱ्या काळात तिथे येऊन तुम्हा सर्वांना नमन करण्याची, तुमचे दर्शन घेण्याची संधी मिळावी अशी माझी मनोकामना आहे.जागतिक शांततेसाठी कृष्णगुरु एकनाम अखंड कीर्तनाला पंतप्रधानांनी केले संबोधित
February 03rd, 04:14 pm
आसाममधील बारपेटा येथील कृष्णगुरु सेवाश्रम येथे आयोजित जागतिक शांततेसाठी कृष्णगुरु एकनाम अखंड कीर्तनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केले. जागतिक शांततेसाठी कृष्णगुरु एकनाम अखंड कीर्तन हे महिनाभर चालणारे कीर्तन 6 जानेवारीपासून कृष्णगुरु सेवाश्रम इथे आयोजित करण्यात आले आहे.पंतप्रधान उद्या आसाम दौऱ्यावर
May 25th, 06:41 pm
आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात आलेल्या 9.15 किलोमीटरच्या देशातल्या सर्वात लांब पुलाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उद्घाटन केले. या पुलामुळे आसाम आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातले दळणवळण सुलभ होणार असून प्रवासाचा मोठा वेळही वाचणार आहे. पुलाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधानांनी काही मिनिटे पुलावरुन पायी प्रवास केला.सोशल मीडिया कॉर्नर ( समाज माध्यमे कट्टा) 31 मार्च 2017
March 31st, 06:23 pm
तुमची प्रशासकीय कामगिरीबाबतची माहिती समाजमाध्यमांवरुन पाहता येईल. प्रशासनावरचे तुमचे ट्विट्स दररोज इथे पाहता येतील. वाचा आणि शेअर करा !“नमामि ब्रम्हपुत्रा” उत्सवाला पंतप्रधानांच्या शुभेच्छा
March 31st, 12:47 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “नमामि ब्रम्हपुत्रा” या उत्सवाला शुभेच्छा दिल्या आहेत. आसाम सरकारने सुरु केलेला हा उत्सव, अतिशय अभिमानास्पद आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.