अरूणाचल प्रदेशमध्ये इटानगर येथे विविध विकास प्रकल्पांच्या देशार्पण प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन

अरूणाचल प्रदेशमध्ये इटानगर येथे विविध विकास प्रकल्पांच्या देशार्पण प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन

February 15th, 12:38 pm

जेव्हा भारताला उगवता सूर्य पाहायचा असतो तेव्हा संपूर्ण भारताला आधी अरुणाचलकडे पाहावे लागते. आमच्या संपूर्ण देशाला, सव्वाशे कोटी देशवासियांना सूर्योदय पाहायचा असेल तर अरुणाचलकडे दृष्टीक्षेप न टाकता सूर्योदय पाहताच येणार नाही. आणि ज्या अरुणाचलमधून अंधाराचे जाळे फिटत जाते, प्रकाश पसरत जातो, येत्या काही दिवसात येथेही विकासाचा इतका प्रकाश पसरेल, जो अवघ्या भारतालाही प्रकाशमान करेल.

पंतप्रधानांनी दिली अरुणाचल प्रदेशला भेट, इटानगर येथे संमेलन केंद्राचे उद्‌घाटन

पंतप्रधानांनी दिली अरुणाचल प्रदेशला भेट, इटानगर येथे संमेलन केंद्राचे उद्‌घाटन

February 15th, 12:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अरुणाचल प्रदेशला भेट दिली. इटानगर येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी दोरजी खंडू राज्य संमेलन केंद्राचे उद्‌घाटन केले. या केंद्रात प्रेक्षागृह, सभागृह आणि प्रदर्शन गृह आहे.