हॉर्नबिल महोत्सवाला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले नागालँडच्या जनतेचे अभिनंदन
December 05th, 11:10 am
नागालँडमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या हॉर्नबिल महोत्सवाला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागालँडच्या जनतेचे अभिनंदन केले आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महोत्सवासाठी नागालँडवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. यंदाच्या महोत्सवात कचरा व्यवस्थापन आणि शाश्वततेच्या संकल्पनेवर भर दिला गेला असल्याबद्दलही पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आहे. काही वर्षांपूर्वी आपण या महोत्सवाला भेट दिल्याच्या आठवणींनांही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उजाळा दिला असून, इतरांनी देखील या महोत्सवाला भेट द्यावी आणि नागा संस्कृतीचे चैतन्य आणि विविधता अनुभवण्याचे आवाहन केले आहे.पंतप्रधानांनी नागालँडला राज्य दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा
December 01st, 12:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागालँडच्या राज्य दिनानिमित्त नागालँडच्या जनतेला शुभेच्छा दिल्या. त्यांनी नमूद केले की नागा संस्कृती कर्तव्य आणि करुणेच्या भावनेसाठी ओळखली जाते.